महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश

विकिबुक्स कडून

शब्दकोश म्हणजे शब्दांचे अर्थ स्पष्ट करून देणारे संदर्भसाधन. शब्दकोशाला विशिष्ट रचना असते. शब्दकोशांचे रचनेनुसार विविध प्रकार असू शकतात. उदा. शब्दकोशातील नोंदीचा शब्द आणि त्या शब्दाचे स्पष्टीकरण जर एकाच भाषेत असेल तर तो एकभाषिक शब्दकोश ठरेल. ह्याउलट नोंदीचा शब्द एका भाषेत आणि शब्दाचे स्पष्टीकरण दुसऱ्या भाषेत असे असेल तर तो द्वैभाषिक शब्दकोश होईल. मराठी शब्दाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा शब्दकोश हा एकभाषिक शब्दकोश असेल तर मराठी शब्दाचा अर्थ हिन्दी वा इंग्लिश अशा अन्य भाषेत स्पष्ट करणारा शब्दकोश हा द्वैभाषिक शब्दकोश असेल.

काही वेळा शब्दकोश हे बहुभाषिकही असू शकतात. म्हणजे नोंदींचा शब्द एका भाषेत आणि त्याचे स्पष्टीकरण दोन वा अधिक भाषांत असेही शक्य आहे.

मराठी शब्दकोशांचे वर्गीकरण[संपादन]

भाषाधारित वर्गीकरण[संपादन]

कालाधारित वर्गीकरण[संपादन]