Jump to content

महाजालावरील मराठी साधने

विकिबुक्स कडून

मराठी भाषेशी संबंधित विविध साधने आता महाजालावर उपलब्ध होत आहेत. ही साधने विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. अशा साधनांची एक सूची हे ह्या विकिपुस्तकाचे स्वरूप आहे.

विकिपुस्तक तयार करण्याचा उद्देश[संपादन]

महाजालावरील साधने सहजगत्या सापडावीत. त्यांच्याविषयीची माहिती थोडक्यात उपलब्ध व्हावी हा हेतू ह्या विकिपुस्तकाच्या निर्मितीमागे आहे.

साधनांची व्याप्ती आणि मर्यादा[संपादन]

ह्या विकिपुस्तकात ज्या साधनांची सूची करायची आहे, त्याविषयी खालील निकष विचारात घेण्यात येतील.

 • साधन मराठी भाषेशी संबंधित असावे. उदा. मराठी शब्दकोश, मराठी ज्ञानकोश, मराठीच्या अभ्यासासाठी वा उपयोजनासाठी आवश्यक अशी साधने इ.
 • साधन द्वैभाषिक वा बहुभाषिक असल्यास त्यांपैकी एक भाषा मराठी ही असावी.
 • साधन महाजालावर उपलब्ध असावे.
 • साधन प्रतिमुद्राधिकारमुक्त (कॉपिराइटच्या मर्यादेत नसलेले) असावे किंवा प्रतिमुद्रिधिकार-धारकाने अथवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने वापरासाठी उपलब्ध करून दिलेले असावे.

साधनांचे प्रकारानुसारी वर्गीकरण[संपादन]

ह्या पुस्तकात नोंदी कशा करायच्या?[संपादन]

 • प्रत्येक साधनाच्या नोंदीसाठी एक स्वतंत्र पान तयार करावे.
 • पान तयार करताना ते उचित वर्गाखाली यावे. उदा. जर शब्दकोश असेल आणि तो एकभाषिक शब्दकोश असेल तर त्याच्या पानाच नाव महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/<शब्दकोशाचे नाव> असे असेल. (< > असा टोकेरी कंस वगळून शब्दकोशाचे नाव लिहावे)
 • प्रत्येक संदर्भसाधनाच्या पानावर त्या संदर्भसाधनांचे शक्य तितके तपशील नोंदवावे.
 • संदर्भसाधनाचा महाजालावरील दुवा जोडावा.
 • अशा प्रकारे तयार केलेले पान वर्गीकरणातील उचित विभागात दुवा देऊन जोडावे. उदा. एकभाषिक शब्दकोश ह्या वर्गांतर्गत विविध एकभाषिक शब्दकोशांचे यादीच्या स्वरूपात दुवे लिहावे.

ह्या विकिपुस्तकात काही चुका/ त्रुटी आढळल्या तर काय करायचे?[संपादन]

 • ज्या अर्थी तुम्हाला चूक/ त्रुटी दिसून येते आहे त्या अर्थी तुम्ही जाणकार आहात हे स्पष्ट आहे. विकिप्रकल्पांत चूक किंवा त्रुटी सुधारणे अतिशय सुकर आणि जलद करता येते.
 • चूक किंवा त्रुटी आहे ह्याची एकदा पुन्हा तपासून निश्चिती करून घ्या.
 • तुमची निश्चिती झाली असेल तर तुम्ही पुढीलप्रकारे गोष्टी करू शकाल.
  • तुम्ही स्वतःच ती चूक/ त्रुटी दूर करा.
   • संपादन ह्या विभागावर टिकटिकवा.
   • नोंदीत सुधारणा करा.
   • संपादन करण्यासाठी तुमचे विकिबुक्स ह्या संकेतस्थळावर खाते असण्याची आवश्यकता नाही. मात्र तुमचे संपादन तुमच्या नावे नोंदले जावे अशी तुमची इच्छा असेल तर सदस्यखात्यात प्रवेश करून संपादन करावे.
  • तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही पुढील गोष्टी करू शकता.
   • नोंदीच्या चर्चा ह्या विभागावर टिकटिकवा.
   • तुमचे म्हणणे तिथे नोंदवा.
   • आवश्यकता भासल्यास इतिहास पाहा ह्या विभागात जाऊन तुम्हाला अपेक्षित असलेले बदलांशी संबंधित नोंदी कुणी केल्या आहेत ते पाहून त्या व्यक्तीला साद घाला. (त्यासाठी {{साद|<सदस्यनाम>}} असे लिहून साद घालता येईल)