पोळी

विकिबुक्स कडून
एक यात्रेकरु मुलगी मंदिराजवळ चपात्या भाजताना, महुकुट्टा, कर्नाटक

चपाती हा गव्हापासून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे . दळलेल्या गहू पिठास मराठी भाषेत कणिक म्हणतात. कणिक पिण्याचे पाणी व किंचित तेल वापरुन भिजवली जाते. कणिकेचे छोटे छोटे गोळे बनवुन हे गोळे लाटण्याच्या साहाय्याने पोळपाटावर गोल आकारात लाटले जातात. चपाती छान पदर सुटावे व मुलायम व्हावी याकरिता लाटलेली चपाती दोनदा घडी करून पुन्हा गोल आकारात लाटली जाते व तव्यावर अथवा तंदुर मधे भाजली जाते.

चपाती विविध भाज्या, विविध गोड पदार्थ, चटण्या, ठेचा, भुरका, झुणका, कोशिंबीर इत्यादी सोबत खाल्ली जाते.

चपातीचे तुकडे फोडणी देउन खातात या पदार्थास तुकडे/कोल्हापुरी चिवडा/माणिक पैंजण नावे आहेत.

भाजण्याच्या ऐवजी तळण्याची क्रिया केल्यास लहान आकारास पुरी व मोठ्या आकारास भटुरा असे म्हणतात.

कणिक भाजण्याच्या ऐवजी उकडुन तळ्ल्यास बिट्ट्या व वरणात घालुन उकडल्यास वरणफळे हे पदार्थ बनतात.

गोड चवीचे सारण अर्धगोलाकार आकारात तळल्यास करंजी; संपूर्ण गोलाकार आकारास मोदक असे म्हणतात.

चपातीस हिंदी भाषा भाषेत रोटी असे संबोधतात. पराठा, दशमी, नान, रुमाली, पुरी हे पोळीचे उपपदार्थ आहेत. पाण्या ऐवजी दुधात भिजवलेल्या कणिकेच्या चपातीस 'दशमी' असे म्हणतात. चपातीत विविध सारण प्रकारचे सारण भरता येते जसे गुळपोळी, तिळ-गुळ पोळी, पुरण पोळी, खवा पोळी, बटाटा पोळी, मेथी पोळी इत्यादी. अलिकडे चपाती महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक बनली आहे.सारणाप्रमाने नाव बदलते जसे तिळ-गुळ पोळी, पुरण पोळीस महाराष्ट्रात मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. पारंपारीक दृष्ट्या ज्वारी/बाजरी/नाचणीपासून बनवलेली भाकरी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक आहे.

चपातीस महाराष्ट्रातील काहीच शहरी (नागर भागातील) लाेक पोळी म्हणतात, मात्र ज्या कणकेत ज्याचे सारण असते त्यास तसे संबोधतात. उदा.गुळ असेल तर गुळपोळी इ.

चपाती[संपादन]

चपाती (flat bread) हा भारतीयांच्या रोजच्या आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे. भारतात प्रामुख्याने गव्हाच्या पिठापासून चपाती बनते. पीठ पाण्यात भिजवून, त्याचा छोटा गोळा करतात. हा गोळा लाटून सपाट केल्यावर गरम तव्यावर शेकून चपाती बनवली जाते. जगात इतरत्रही अनेक प्रकारे चपाती बनवण्यात येते.

अशा चपात्या विविध पद्धतींनी खाल्ल्या जातात.

  1. पातळ रश्श्यात बुडवून किंवा भाजीचा घास भाकरीने उचलून (स्कूपिंग). उदा. भाकरी, पोळी, पुरी
  2. भाजी/ सारण चपातीवर पसरवून उदा. पिझ्झा
  3. भाजी/ सारण चपातीत गुंडाळून उदा. मेक्सिकन बरिटो, इटालियन स्ट्रॉम्बोली किंवा कॅलझोन
  4. भाजी किंवा सारण चपातीच्या आत भरून उदा. आलू पराठा, पनीर पराठा, पुरणपोळी, पिटा.