मोदक
मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो.[१] उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत.[२] अनंत चतुर्दशीला किंवा संकष्टी चतुर्थीला तळणीचे मोदक करण्याची प्रथा आहे. याचप्रमाणे खव्याचे, सुकामेव्याचे, पुरणाचे सारण भरूनसुद्धा मोदक तयार केले जातात. तळणीच्या मोदकांना उकडीच्या मोदकाला असते तसे सारण करतात. हे सारण काही वेळा सुके खोबरे आणि गूळ यांचेही मिश्रण असते. तांदळाच्या पिठाऐवजी हे मोदक कणकेचे करतात आणि सारण भरून मोदक तयार केल्यावर ते तळून घेतात.[३] मोदक या यामध्ये मोद असा शब्द आहे.[४] जो पदार्थ खाऊन आनंद मिळतो त्याला "मोदक" असे म्हटले जाते.[५]गणपतीला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याचे संदर्भ पुराण साहित्यात सापडतात.[६]
उकडीचे मोदक
[संपादन]भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थीला गणपतीच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक करण्याची परंपरा आहे.[७] महाराष्ट्रात कोकण विभागात उकडीचे मोदक या प्रकारास महत्त्व असते.हे मोदक तांदळाच्या पिठापासून केले जातात.
पाककृती
[संपादन]साहित्य-
तांदुळाची पिठी
मैदा
मीठ,
तेल
सारणासाठी -
- आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन (साधारण पिठीच्या निम्म्या प्रमाणात) ते उकळवतात.
- उकळी आल्यावर त्यात पिठी, आवश्यक वाटल्यास मैदा आणि किंचित मीठ व तेल घालून एकजीव करतात. गुठळ्या राहू देत नाहीत.
- हे मिश्रण थंड झाल्यावर मळून घेतात. खोबरे आणि गूळ यांचे सारण शिजवून थंड होऊ देतात.
(सुकामेवा किंवा अन्य पौष्टिक पदार्थही या सारणात मिसळता येतात.)
- पिठाच्या गोळ्याची पारी करून तिला पाकळ्या करतात. पारीच्या आत खोबऱ्याचे सारण भरतात.
- हा कच्चा मोदक. पाकळ्या बंद करून असे सर्व मोदक भांड्यात किंवा कुकरमध्ये चाळणी ठेवून त्यावर वाफवून घेतात.
- मोदकपात्त्र असल्यास त्याचा वापर करता येतो.[३]
चित्रदालन
[संपादन]-
मोदक गणपती
-
मोदक
-
मोदक
-
मोदक उभा काप
-
मोदक उभा काप
-
तळलेले मोदक
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- "उकडीचे मोदक पाककृती आणि व्हिडीओ".
- उकडीचे मोदक
- उकडीचे मोदक
- खव्याचे मोदक
- आंब्याचे मोदक
- मोदक माहिती
- "उकडीचे मोदक प्रकार १".
संदर्भ
[संपादन]- ↑ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 9781610694124.
- ↑ "मिसळ महोत्सवानंतर ठाण्यात भरणार मोदक महोत्सव (१. ८. २०१८)".
- ↑ ३.० ३.१ CHANGEDE, RIMAL (2012-08-01). AAJACHA MENU. Mehta Publishing House. ISBN 9788177666922.
- ↑ Monier-Williams, Monier (1872). A Sanskrit-English Dictionary: ...with Special Reference to Greek, Latin, Gothic, German, Anglo-saxon... (इंग्रजी भाषेत). Clarendon.
- ↑ "संस्कृत-हिन्दी शब्दकोश (पवर्ग) - विकिशब्दकोशः". sa.wiktionary.org (संस्कृत भाषेत). 2018-09-08 रोजी पाहिले.
- ↑ Kabootar, Kaue Aur Tote (हिंदी भाषेत). Bhartiya Jnanpith. ISBN 9788126313938.
- ↑ Guides, Fodor's Travel (2015-03-31). Fodor's Essential India: with Delhi, Rajasthan, Mumbai & Kerala (इंग्रजी भाषेत). Fodor's Travel. ISBN 9781101878682.
- ↑ Godbole, Nandita (2014-09-09). A Dozen Ways to Celebrate: Twelve Decadent Feasts for the Culinary Indulgent (इंग्रजी भाषेत). Nandita Godbole. ISBN 9781940957173.