झुणका
Appearance
झुणका हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. हा डाळीचे पीठ खरपूस व घट्ट शिजवून बनवतात. पातळ बनवल्यास त्याला पिठले म्हणतात. पिठले किंवा झुणक्यात कांदा व मिरची हमखास असते. झुणका बहुधा भाकरीसोबत तर पिठले भाताबरोबर खातात. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. काही वेळा झुणक्यामध्ये लाल किवा काळे तिखट व कांदा घालतात तर काही वेळेस हिरवी मिरची वाटून घालतात.
तो गोवा व उत्तर कर्नाटकमध्ये जेव्हा बनतो तेव्हा त्याला पिठले म्हणतात. उत्तर भारतात बेसन म्हणतात.