सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न

25% developed
विकिबुक्स कडून

सामाजिक शास्त्रज्ञांना, समाजविज्ञान, लिंगभाव अभ्यास, स्त्री-अभ्यास, समाजकार्य, संस्कृती अभ्यास या क्षेत्रात काम करणारे आणि हे विषय शिकणारे यांना नेहमी काही मोजके प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात आणि त्या प्रश्नांना उत्तरे नाहीत असा समज विचारणारे पसरवत असतात. मला खटकलेले आणि नोंद करण्यास आवश्यक वाटलेले काही प्रश्न एकत्र करुन त्याचा एकुणच सर्वांना उपयोग होईल असे वाटल्यानी मी हा लेखन प्रपंच हातात घेतला. सध्याच्या लिखाणाच्या सोयीसाठी आणि विस्तार भयास्तव मी प्रत्येक विषयाचे मुख्य एकवीस प्रश्नच घेईन, पुढे जर कुणाला यात भर घालावीसी वाटली तर ते त्यात भर घालु शकतील.