सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न/लैंगिकता

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

गे, हिजडे वगैरे हे लोक ऐड्ससारखे आजार पसरवतात[संपादन]

-> गे, हिजडे, वेश्या व्यवसाय करणारे सर्व जण हे एड्स सारखे आजार पसरवण्यात मोठे कारण नाहीत मुळात, एड्स सारखे रोग पसरतात ते असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे आणि ते सर्व ठिकाणी फिरणारे आणि सर्वांबरोबर लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष हेच या आजारांचे मोठे वाहक आहेत. असुरक्षित लैंगिक संबंध हे अनेक पुरुषांना पुरुषत्वाचे लक्षण वाटते, त्यामुळे गे, हिजडे, वैश्याव्यवसाय करणारे इतर सर्व स्त्रीया आणि पुरुष हे एड्स सारख्या आजारांना पसरवण्याचे कारण नाहीत. किंबहुना अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की, या लैंगिक आजारांना/लैंगिक संबंधांद्वारे पसरणार्या आजारांना नियंत्रणात ठेवण्यात निरोधाचा वापर वाढवण्यात या सर्व गटांचा खूप मोठा वाटा आहे.

तुम्ही काहीही म्हणा या विषयावर बोलणं म्हणजेच अश्लिल[संपादन]

-> अश्लिल म्हणा किंवा काहीही म्हणा, एड्स आणि तत्सम आजारांनी हे दाखवून दिल आहे की, जर आपण लैंगिकतेवर बोललो नाही तर त्यातून होणारे नुकसान खूप मोठे आहे. अगदी अनेकदा जिवावर बेतणारे आजार आणि आयुष्यभर सोसावे लागणारे परिणाम करणारे आहे. त्यामुळे लैंगिकता, लैंगिक आजार, लैंगिक कल, लैंगिक आरोग्य या विषयी मोकळेपणाने बोलणे, लिहणे खूप आवश्यक आहे.

३७७ आता काढलं आहे, मग आता तर गे लोकं लग्न करु शकतात ना?[संपादन]

-> ३७७ हे भारतीय दंड संहितेच कलम, भारतातील पुरुषांच्या लिंग-गुदामार्ग आणि लिंगाचा स्त्री-योनीशिवाय कोणत्याही शारिरीक पोकळीमध्ये प्रवेश करून केलेला संभोग अनैसर्गिक ठरवला गेला होता. या नुसार भारताच्या भूभागात कोणीही पुरुष लिंग-स्त्री योनी या व्यतिरिक्त संभोगाचा कोणताही पर्याय वापरल्यास तो संभोग अनैसर्गिक मानला जाईल. तसेच त्या दोघांना अनैसर्गिक संभोगाबद्दल शिक्षा ठोठावली जाईल. हा कायदा आता नव्याने व्याख्या करून त्याची व्याप्ति फक्त बाल लैंगिक अत्याचारा पुरतीच ठेवून आता या कायद्याचा वापर फक्त बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येच केला जाईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे . शिवाय दोन प्रौढ व्यक्ती, खाजगीत एकमेकांच्या संमतीने जर समलिंगी संभोग करत असतील तर त्याबद्दल त्यांना गुन्हेगार गृहित धरले जाणार नाही.

गेंना मुल होत नाहीत त्यामुळे ते अनैसर्गिक आहेत[संपादन]

-> अनेक विषमलिंगी जोडप्यांनाही मुले होत नाहीत, म्हणून ती जोडपी अनैसर्गिक होत नाहीत. किंबहुना लैंगिकता संदर्भात अनैसर्गिक अस काहीच नसतं. कारण मानवी लैंगिकता हीच पूर्णपणे कृत्रिम आहे. .

गे लैंगिक सुख मिळवतात तो मार्ग/क्रिया अनैसर्गिक आहे[संपादन]

अनेक समलिंगी जोडपी गुदामैथुन करुन, म्हणजेच पुरुष लिंग आपल्या जोडीदाराच्या गुदामार्गात घालून आनंद मिळवतात. ही प्रक्रिया भादवी ३७७ प्रमाणे गुन्हा होती. आता गुदामैथुन गुन्हा नाही. पण त्या विषयी खूप मोठ्या प्रमाणात हीनपणाची भावना आहे.

गे, लेस्बियन हे सगळं मोकळ ते पाश्चात्य जगातलं आहे, आपल्या भारतीय संस्कृतीत असलं काहीही नाही.[संपादन]

--> सगळ्या संस्कृतिंमध्ये नेहमीच समलिंगी आणि एकूणच विषमलिंगीपेक्षा वेगळी लैंगिकता असणारे लोक नेहमीच अस्तित्वात होते. भारताही अनेक ऐतिहासिक उदाहरणे आपल्याला सापडतात ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, भारतातल्या संस्कृतीमध्ये तर तृतीय पंथी समाजाला वेगळे स्थान आहे, त्यांना देवीच्या पुजेचा मान आहे, त्यांना नवजात शिशूच्या जन्म, लग्न या प्रसंगाना आशिर्वाद देण्यासाठी खास आमंत्रण असते. त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये लैंगिक हक्कांविषयीच्या चळवळी मोठ्या प्रमाणात उदयाला आल्या ह्या पेक्षा भारतीय आणि पाश्चात्य देश यांमध्ये फार फरक नाही.

गे म्हणजे नक्की काय असत?[संपादन]

-> गे म्हणजेच समलिंगी लैंगिकता असलेले पुरुष ज्यांना ते स्वत: पुरुष म्हणून ओळख सांगतात आणि त्यांना लैंगिकदृष्ट्या पुरुषच आवडतात. त्यांच्यामध्ये आणि इतर विषमलिंगी पुरुषांमध्ये कोणताही इतर फरक नसतो. गे पुरुषांच्या शरीरात आणि विषमलिँगी पुरुषांच्या शरिरात कोणताही फरक नसतो. गे पुरुषांना त्यांच्या बायकी वागण्या-बोलण्या बद्दल वेगळे मानले जाते पण जैविक/शारिरीक पातळीवर कोणताही बदल त्यांच्यात झालेला नसतो.

हिजडा काय असते?[संपादन]

--> हिजडा भारतीय आणि दक्षिण आशीयाई देशातील संस्कृतीचा भाग आहे. ज्यां व्यक्तिंना जन्माच्या वेळी पुरुष म्हणून मानले गेले आणि त्यांना समज आल्यावर त्यांनी स्वत:ची ओळख स्त्री म्हणून सांगायला सुरूवात केली. अशा व्यक्तिंना हिजडा म्हणतात. हिजडा समाजाने तृतीय पंथी किंवा इतर कोणत्याही शब्दापैक्षा हिजडा हाच शब्द त्यांची ओळख सांगण्यासाठी वापरण्याचा आग्रह धरला आहे. हिजड्यांनी त्यांच्या शरीरात बदल करून घेतला असेलच असे नाही. बहुतांश हिजडे साडी किंवा तत्सम स्त्री पोशाख वापरणे पसंत करतात. तसेच स्वत:साठी स्त्रीचे नाव आणि वागणूक पसंत करतात.

गे आणि हिजडा एकच असत का?[संपादन]

-> गे आणि हिजडे हे दोन वेगवेगळे गट आहेत, त्यांचा एकमेकांशी तसा संबंध नाही. मुख्यत: गे ही लैंगिक ओळख आहे तर हिजडा ही लिंगभावाची/जेंडर ओळख आहे. गे फक्त त्यांचे समलैंगिक असणे सांगते तर हिजडा हे त्यांचे पुरुषाचे स्त्री झालेला लिंगभाव सांगतो. बहुतांश गे पुरुष हे स्वत:ला पुरुष म्हणतात तर हिजडा स्वत:ला बाई म्हणतात.

सगळे बायकी पुरुष गे असतात का?[संपादन]

सगळे बायकी पुरुष गे नसतात, मूळातच गे असण्याचा आणि बायकी असण्याचा काहीही संबंध नाही. काही गे पुरुष बायकी असतीलही. पण अनेक गे पुरुष बायकी नसतात. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, बायकी असणे हा वर्तनाचा प्रकार आहे. गे किंवा विषमलिंगी असणे हा लैंगिकतेचा प्रकार आहे तर हिजडा असणे हा लिंगभावाचा प्रकार आहे त्यामुळे हे सर्व वेगवेगळे मुद्दे आहेत.

हिजड्यांना नक्की कोणती गुप्तांग असतात?[संपादन]

-> हिजड्यांना जर त्यांनी निर्वाणी केली नसेल तर त्यांना पुरुषाचेच लिंग असते. पण जर निर्वाणी/लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली असेल तर त्यांना योनीसारखी रचना असलेले बाह्यलिंग असते. लिंगबदलाची शस्त्रक्रिया किती कुशल डोक्टर कडून करून घेतली आहे त्यानुसार त्याचे योनी/स्त्री गुप्तांगाशी असलेले साधर्म्य बद्लात जाते. बहुतांश हिजडे कोणताही शारिरीक बदल करून घेत नाहीत आणि त्यांना वाटेल तसे पुरुषाचे किंवा हिजड्याचे/स्त्रीचे आयुष्य जगतात.

हिजडे एवढा आरडा ओरडा का करतात?[संपादन]

-> हिजड्यांना त्यांच्या पेहराव, त्यांच्या वेगळेपणामुळे, लोकांमध्ये असलेल्या अनेक गैरसमजांमुळे समाजात वावरताना नेहमी हिंसा, नाकारलेपणा, घृणास्पद वागणूक सहन करावी लागते. त्या वागणूकीला उत्तर म्हणून त्यांच्यामध्ये सतत चिडचिडेपणा आणि रागावून बोलणे-वागणे येते. वास्तविक जिथे त्यांना सन्मानाने वागणूक मिळते तिथे त्यांचे असे वागणे दिसून येत नाही. त्यामुळे तुम्ही जर शांतपणे वागलात तर नक्कीच त्यांचे वागणेही तुमच्याशी तसेच असेल.

हिजड्यांना काम करुन पैसे मिळवायला काय हरकत आहे?‌ ते भिक का मागतात?[संपादन]

-> नक्कीच त्यांना काम करायला आवडतेही, पण त्यांच्या बद्दल असलेल्या गैरसमजांमुळे त्यांना कुणीही कोणत्याही प्रकारचे काम द्यायला तयार होत नाही. त्यांमुळे हा प्रश्न विचारताना तुम्ही स्वत: त्यांना कामावर ठेवयला तयार आहात का, हा प्रश्न विचारावा. अलिकडच्या काळात २०१८ पासून आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांमध्ये हिजडा समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी नोकरी देण्यात आली आहे.

लेस्बियन नक्की काय करतात?[संपादन]

--> हा प्रश्न नेहमीच विचारला जातो, गे आणि हिजडे यांच्या संदर्भातल्या शिव्यांमध्ये लैंगिक कृतीचेच वर्णन आहे त्यामुळे ते लैंगिक आनंद मिळवण्यासाठी नक्की काय करतात हा प्रश्न सहसा लोकांना पडत नाही. वास्तविक लैंगिक आनंद घेण्यासाठी प्रत्यक्षात लिंग आणि योनी यांच्या क्रियेचा विचार मुख्य म्हणून केला जातो. हा गैरसमज आहे, वास्तविक अनेकदा लैंगिक आनंद घेण्यासाठी लिंग आणि योनीची क्रिया ही आवश्यक नाही. त्या व्यतरिक्त अनेक मार्गांनी म्हणजेच, आलिंगने, चुंबने आणि एकमेकांच्या अंगाला मालिश करणे सारख्या अनेक क्रिया लैंगिक आनंद घेण्यासाठी केल्या जातात. ज्यातून अनेकांना लैंगिक गरजांची पुर्तता होते.

गे लेस्बिअन लोक कायम फक्त संभोग विषयीच विचार करतात त्यांना सामान्य आयुष्य जगायचे नसते[संपादन]