सामाजिक शास्त्रज्ञांना नेहमी विचारले जाणारे प्रश्न/जात

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

जात नक्की काय असते?[संपादन]

-> आंतर्विवाही गट म्हणजे जात, फ़क्त आपल्याच गटातील सदस्यांशी विवाह करणारा गट म्हणजे जात. जात हा एकाच व्यावसायातील, एकाच भुभागात वास्तव्यास असलेले, एकाच जनुकीय जडण-घडणीचे असू शकतात. अशी व्याख्या आधीच्या समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञांनी केली आहे. पण जेव्हा प्रत्यक्षात दलित जातींमधून लिखाण आणि संशोधन होऊ लागले तेव्हा, बाबासाहेब आंबेडकर, पेरीयार, महात्मा फुले यांनी जातीची किंबहुना जात पाळण्याची इतर अनेक महत्वाची लक्षणे उघड केली.

  • त्यात महत्वाचे म्हणजे अस्पृश्यता पाळणे, ज्याची सुरूवात मुळातच पवित्र आणि अपवित्र, शुध्द-अशुध्द, उच्च-निच्च अशा फरकांच्या धारणांमध्ये आहे. ज्या व्यक्ती ह्या कल्पना मानातात ते जात पाळतात.
  • जातिनिहाय व्यवसाय अबाधित ठेवणे, ज्या व्यक्तिंना अजुनही असे वाटते की बालाजी मंदिर, सिद्धीविनायक मंदिर, किंवा अशा मोठ्या मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजारी असू शकत नाही, किंवा मंदिराच्या गाभार्यात सर्वांना प्रवेश देणे चुकीचे आहे. ते जात पाळतात.

जातीनिहाय आरक्षण योग्य की अयोग्य[संपादन]

-> जातीनिहाय आरक्षणाची भारतात सुरूवात शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात अवघे ५०% जागा समाजातील दुर्लक्षित गटाला देऊन केली. संस्थानातील नोकरदार आपल्या वर्गांमध्ये ब्राह्मण, मराठा या व्यतिरिक्त कोणत्याही इतर जातीच्या लोकांना सामावून घेण्यास तयार नव्हते तरीही त्यांचा विरोध पत्करून शाहू महाराजांनी इतर जातींना सहभागी करून घेतले. त्यावेळी त्यांचे म्हणणे होते की, जो पर्यंत आपण मागास जातीच्या लोकांना सन्मानाच्या जागांवर आणत नाही/ते येत नाहीत, तो पर्यंत ही सामाजिक दरी कशी कमी होणार. आणि त्यांना शिक्षण असूनही, योग्यता असूनही त्यांना फक्त जातीमुळे नोकरी नाकारणे चुकिचे आहे असे त्यांचे मत होते. त्यामुळे समाजात जो पर्यंत जात पाळली जाईल, जाती मूळे नोकरी, शिक्षण नाकारले जाईल तो पर्यंत जाती निहाय आरक्षण आवश्यक आहे.

आंतर जातीय विवाह योग्य की अयोग्य[संपादन]

-> आंतर जातीय विवाहाने वेगवेगळ्या जनुकीय आणि जिवशास्त्रीय वैविध्यांचा मिलाफ होऊन चांगली सुदृढ पुढची पिढी निर्माण होते. या उलट जाती अंतर्गत आणि नातेवाईकांमध्येच विवाह झाल्याने अशक्त, कुरूप निर्माण होते. त्यामुळे सामाजिक फायदे तर आहेच पण आपल्या मानव जातीच्या विकासासाठी सुद्धा जाती पाळणे चुकीचे आहे.

जात नष्ट का होत नाही[संपादन]

-> जात किंवा कोणतीही पूर्वनिर्धारित नियमावली पाळण्याने अनेक फायदे होतात. ते म्हणजे तुम्हाला काहीच करावे लागत नाही, सर्व काही आधिच ठरलेले असते. वास्तविक पूर्वनिर्धारित बाबींना पूर्वनिर्धारित नियम आणि बंधने असतात.

आता कुठे जात पाळली जाते[संपादन]

-> अनेक जण हा प्रश्न विचारतात की आपण आता कुठे जात पाळतो? आणि जात पाळणे म्हणजे नक्की काय?

मी जात मानत नाही, पण ते लोक सारख त्यांच्या जातीचा उल्लेख करतात मग जात कशी जाईल[संपादन]

-> तुम्ही जात मानत नाही म्हणजे नक्की काय करता? मी एक यादी तयार केली आहे ती तुम्हांला जात मानता कि नाही हे समजुन घ्यायला मदत करेल.

  • तुम्ही तुमच्या जातीतच विवाह केला आहे/तुमच्या प्रियकर/प्रेयसीची जात तुमच्या जातीशी मिळती जुळती आहे.
  • तुमचे जास्तीत जास्त मित्र/मैत्रिणी तुमच्याच जातीचे आहेत.
  • तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी तुमच्या जातीतल्याच लोकांसारख्याच आहेत.
  • तुम्ही पवित्र-अपवित्र, शुद्ध-अशुद्ध, असे सर्व मानता.
  • तुम्ही जाति निहाय व्यावसायांचा पुरस्कार करता.

अट्रोसिटी कायदा काय आहे? या कायद्याचा गैरवापर होतो का?[संपादन]

-> अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ हा कायदा अनुसूचित जाती आणि जमातींवर होत असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अन्यायाच्या विरुद्ध तसेच अशा सामाजिक प्रथांवर बंदी आणण्यासाठी ज्यांमूळे अनुसूचित जाती आणि जमातींना अपमान, अमानविय वागणूक सहन करावी लागते. मुळात या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोक या कायद्या अंतर्गत गुनाह दाखल करुन घ्यायला तयार नसतात. त्यामुळे या कायद्याचा गैरवापर होणे दुरापास्त आहे.

आशियातील उत्पादनाची व्यवस्था काय असते?[संपादन]

--> आशियाई देशात, गावातल्या गावात सर्व गरजा पुर्ण होतील अशी समाज आणि आर्थिक व्यवस्था निर्माण केली गेली आहे. ती गेली काही शतके आशियाई देशात ह्या प्रकारच्या समाज आणि अर्थ व्यवस्थेमुळे स्वयंपूर्ण खेडी निर्माण झाली होती. नव्या भांडवली आणि कारखानदारी व्यवस्थांमुळे ही जुनी व्व्यवस्था मोडीत निघाली.

जातीच्या चारित्र्यात इतिहासात झालेले बदल[संपादन]