Jump to content

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/2

विकिबुक्स कडून
  • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना.

मराठी

[संपादन]

सूचना: खालील गोष्ट प्र. के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.


एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन." त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले, "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या." ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे: "अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'