भात
Jump to navigation
Jump to search

पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्रात , गोव्यात काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.
भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात गोव्यातील लोकांना पेेज (पाण्यातला भात )जेवायला अजून ही आवडतात. भाता बरोबर वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. पदार्थ खाल्ले जातात. खिचडी, चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्यानी,मसाले भात, गोळाभात हे भातापासून केलेले वेगवेगळे पदार्थ आहेत. भाताची शेती पावसाळ्यात केेली जाते.तकलकककके
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.
भातापासून खीर,लाडू पण बनवले जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |