आमटी

विकिबुक्स कडून

तुरीच्या किंवा मुगाच्या डाळीच्या वरणाला फोडणी देऊन, वर भरपूर पाणी घालून जो पातळ पदार्थ बनतो त्याला आमटी म्हणतात. आमटीसाठी या पातळ पदार्थात चिंचेचा कोळ/आमसूल/आमचूर+गूळ, ओले खोबरे, मसाल्याची पूड, मीठ इत्यादींपैकी काही किंवा सर्व जिन्नस चवीप्रमाणे टाकून भरपूर उकळतात.

घट्ट वरणावर पळीने फोडणी ओतून केलेल्या वरणास पळी-फोडणीचे वरण म्हणतात. फोडणीच्या वरणात चिंचेचा कोळ/आमसूल/आमचूर+गूळ, ओले खोबरे, मसाल्याची पूड, पाणी यांपैकी काहीही नसते, फारतर मूळ वरणात नसेल तर मीठ असते..