मराठी प्रमाणलेखनाचे संकेत

विकिबुक्स कडून


साचा:कामचालू

  मराठी प्रमाणलेखनाचे (शुद्धलेखनाचे) संकेत सोपे करुन अभ्यासू

मराठी प्रमाणलेखन संकेतांचे मुख्य उद्देश १) उचारानुसारी लेखनाचा अवलंब अथवा लेखनावरून उच्चारण (उद्देश अंशत:च साध्य होतो, काही वेळा तुमची उच्चारणे वेगळी असू शकतात आणि प्रमाण लेखन वेगळे असू शकते) २) मराठी भाषेच्या स्वरुपास अनुकूल लेखन (मराठी व्याकरणास अनुसारुन लेखन व्हावे हा उद्देश; पण प्रत्यक्षात इंग्रजी आणि संस्कृत व्याकरणांच्या प्रभावाने मराठीचेमूळ स्वरूप बाजूस ठेऊनही आदेशात्मक पद्धतीने लेखनाचा आग्रह धरलेला आढळतो) ३) लेखन पद्धतीत प्रमाणीकरण ४) प्रमाण भाषेची उपलब्धता ( भाषा वैज्ञानिकांचा हेतु व्यवहार आणि विज्ञान विषयक संज्ञांमध्ये प्रमाण भाषेची उपलब्धता असा मर्यादीत असला तरीही विशीष्ट सामाजिक गटांकडून त्यांच्या शब्दांचा वापर तेवढाच प्रमाण बाकी अशुद्ध असा चुकीचा प्रचार बरीच दशके केला गेला आणि बहुजनांच्या मराठीस दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले.


पद्धती अ) अनुनासिके आणि अनुस्वार आ) ऱ्हस्व-दीर्घ उच्चारणांचे लेखन

Brief Index

विकिबुक्स:Marathi language portal/brief index

 अनुनासिके आणि अनुस्वार विषयक संकेत

विकिबुक्स:Marathi language portal/audiance

 ऱ्हस्व दीर्घ विषयक संकेत

विकिबुक्स:Marathi language portal/Learn with pictures

विकिबुक्स:Marathi language portal/miscellaneous

  विराम चिन्ह विषयक संकेत :

आपल्याला माहित आहे का की
  • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना.

मराठी

सूचना: खालील गोष्ट प्र. के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.


एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन." त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले, "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या." ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे: "अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'(किंवा इथे विरामचिन्हे संकेतांची पूर्ण यादी पहा)


विकिबुक्स:Marathi language portal/translations