Jump to content

पाव भाजी

विकिबुक्स कडून
पाव भाजी
वेळ मिनिटे
चविष्ट पाव भाजी

पाव भाजी हा एक महाराष्ट्रीय/मराठी खाद्यप्रकार आहे .महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांत (विशेषतःमुंबई,नाशिक आणि पुण्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी पहावयास मिळते) हा प्रकार खावयास मिळतो तसेच त्याची लोकप्रियता आता संपूर्ण भारतभर पसरल्याने तो सर्वच मोठ्या शहरांत खानावळीत/उपहारगृहात पहावयास मिळतो.पाव किंवा पावाची जोडी (इंग्रजीत: ब्रेड /बन)आणि विविध प्रकारच्या भाज्यांचे मिश्रण करून केलेली भाजी सोबत कोथिंबीर,कांदा आणि लिंबाची फोड असे ह्या प्रकाराचे स्वरूप असते.पाव भाजी हा एक लोकप्रिय नाष्ट्याचा प्रकार बनला आहे,सहसा संध्याकाळच्या खाण्यात ह्याचा समावेश होतो.

पावभाजीचा इतिहास

[संपादन]

अमेरिकेतील युद्धाच्या वेळी मुंबईतील कापड गिरणीतील कामगारांना अधिक वेळ काम करावे लागे.त्यांना अमेरिका येथे कापड पुरवठा करण्यासाठी सतत काम करावे लागत असे. या दरम्यान पोळी किंवा भाकरी ऐवजी पाव या पदार्थाचा वापर वाढला आणि पातळ भाजी किंवा आमटी याऐवजी वेगळ्या प्रकारची भाजी त्यांच्या आहाराचा भाग झाली असे मानले जाते.

पावभाजी पद्धत-प्रकार

[संपादन]

पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो,बटाटे,कांदा,लसूण आल्याची चटणी,तिखट,मसाले,तसेच ढोबळी मिरची,फूलकोबी,मटार ह्या भाज्यांचा देखील समावेश होतो.पाव भाजीचे त्याच्या प्रकारावरून इतर नामकरण करण्याची देखील प्रथा आहे जसे भाज्या कुस्करून न घालता मोठ्या फोडींच्या स्वरूपात केल्या तर त्यास खडा-पावभाजी (खड्याप्रमाणे मोठ्या आकाराचे भाजीचे तुकडे)असे म्हणतात.तसेच भाजीत लोणी अधिक प्रमाणात वापरल्यास त्यास बटर/लोणी/मस्का(हिंदीत) पावभाजी,तसेच चिझ-पावभाजी,ड्रायफ्रुट (सुकामेवा)पावभाजी इ.असे प्रकार करण्यात येतात.

साहित्य

[संपादन]

चित्रदालन

[संपादन]