Jump to content

गच्चीवरील बाग/बागकाम आणि सुरुवातीची माहिती

विकिबुक्स कडून

शहरातील अनेकांना आपल्या गच्चीवर/गैलरीमध्ये शहरातील लहान घरांमध्ये बाग सुरु करताना येणार्र्या अडचणी, शंका, आणि सुरुवातीची माहिती मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व संसाधने या पुस्तकात एकत्र करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामध्ये अगदी जागेच्या उपलब्धतेपासून सुरुवात करुन त्यानुसार तुम्हांला काय काय शक्य आहे याचा विचार केला गेलेला आहे. शहरातील अगदी कमीत कमी जागेमध्ये आपण आपली बागकामाची हौस कशी भागवू शकतो, यासाठी जागा, सुर्यप्रकाश, हवा आणि तुमच्या गावच्या हवामानाचा थोडासा आढावा आवश्यक आहे. त्यानुसार तुम्ही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त उपयोग करुन आपले स्वत:चे छोटेखानी जंगल आपल्या स्वत:साठी नक्की तयार करू शकाल.

सुरुवातीची तयारी[संपादन]

जागेची उपलब्धता आणि त्यानूसार झाडांची निवड[संपादन]

 • कोणत्या झाडाला किती सुर्यप्रकाशाची आवश्यकता आहे हे झाडांच्या संदर्भ यादीमध्ये उल्लेखलेले आहे. त्यानुसार तुम्ही कोणती झाडे लावू शकाल याचा विचार करावा.
 • पुर्ण गच्ची - तुमच्याकडे नक्की किती जागा उपलब्ध आहे, त्यानुसार तुम्ही कोणती झाडे लावायची याचा विचार करावा, जर तुमच्याकडे पुर्ण गच्ची उपलब्ध असेल तर गच्चीवर दिवसाचा बहुतांश काळ पुर्ण सुर्यप्रकाश मिळेल त्यामुळे तुम्हांला बहुतांश प्रकारची झाडे लावता येतील. उलटपक्षी त्यातही सावलीत वाढणारी झाडे जपून इतर झाडांच्या सावलीत लावावी लागतील किंवा त्यांच्यासाठी सावलीची काही वेगळी व्यवस्था करणे भाग पडेल. जागेच्या मुबलक उपलब्धतेमुळे तुम्ही बहुतांश प्रकारची झाडे लावू शकाल, त्यातही बाहेरच्या बाजूने मोठी व गच्चीच्या मधल्या बाजूला लहान, कमी सुर्यप्रकाश असलेल्या झाडांची रचना तुम्ही करू शकाल. भिंतीच्या बाजूला वेली ठेवता येतात जेणेकरून त्या भिंतींवर किंवा भिंतीला बांबू किंवा धातूचे मंडप उभे करणे सहज शक्य होते. शक्यतो मधला भाग मोकळा ठेवावा जेणे करून तुम्हांला सर्व झाडांकडे एकाच वेळी बघता येते. आणि स्वच्छता ठेवणे सोपे होते.
 • छोटी गैलरी - तुमच्याकडे छोटीशी गैलरी असेल तर मात्र तुम्हांला दिवसातील काहीच काळच सुर्यप्रकाश उपलब्ध असेल आणि गैलरीच्या दिशेनुसार तुम्हांला झाडांची निवड, खासकरून कमी सुर्यप्रकाशात किंवा काहीवेळाच्या सुर्यप्रकाशातही जी झाडे टिकू शकतील अशीच झाडे लावणे शक्य असेल. उदा, मसाले, निवडूंग जातीतील झाडे, गवत प्रकारातील झाडे.
  • लहान जागेमध्ये तुम्ही, नेहमी लागणारी घरगुती औषधे, मसाले, शोभेची झाडे लावू शकता, त्यात औलस्पाईस, मायाळू, अळू, गवतीचहा, तुळस, पुदीना, पेपरमिंट, खाऊचे पान, अशी रोजच्या उपयोगाची झाडे लावू शकता ज्यांचा रोजच्या आहारात वापर केला जाऊ शकतो आणि त्यांना फ़ार काळजी घ्यायची गरजही नसते. शिवाय कमी सुर्यप्रकाशातही ही झाडे आरामशिर वाढतात.
 • फ़क्त भिंती किंवा गैलरीची जाळी - तुमच्या जागेत खाली जमिनीवर झाडे ठेवण्यास जागा नसल्यास तुम्ही लटकत्या कुंड्यांचा वापर करून त्यात काही लहान झाडे लावू शकाल, म्हणजेच यामध्ये तुम्हांला लटकणार्या वेली, तुळस, पुदीना, गवतीचहा, आले, ओफ़िस टाईम किंवा इतर शोभेची झाडेच लावणे शक्य असेल. किंवा भिंतीत ठोकून लावता येईल अशा स्टेंडचा वापर करून त्यावर कुंड्या ठेवता येतील. किंवा आता नव्याने उपलब्ध असलेला उभ्या बागेचा पर्यायही तुम्हांला उपलब्ध आहेच. यामध्ये तुम्हांला अगदी कमीत कमी सुर्यप्रकाशात जगणारी झाडेच निवडता येईल.
  • अगदी लहान जागेत म्हणजेच फ़क्त भिंती किंवा कठडे किंवा गैलरीची/खिडकीची जाळीच जिथे उपलब्ध असेल त्याठिकाणी तुम्ही लहान लहान झाडे जसे कि, मधुकामीनी, तुळस, पुदीना, पेपरमिंट किंवा एक दोन वेली पांढरा थंनबर्जीया, खाऊचे पान, मनी प्लांट, रानजाई, गणेश वेल इ. लावू शकता. त्यातही लटकणार्या कुंड्या लहान व पाण्याचा निचरा न करणाऱ्या अश्या असल्याने झाडांची निवड तशीच करणे भाग आहे. या प्रकारे लटकत्या कुंड्यांमध्ये झाडे लावताना शक्यतो पाण्यासाठी छिद्रे असलेल्या कुंड्या वापरू नयेत. किंबहुना जास्तीचे पाणी चालेल अशाच झाडांची निवड करावी, नाहीतर त्या लटकत्या कुंड्या खालची जागा तुम्हांला वापरणे शक्य होणार नाही.

गच्ची, गैलरी मधील जमिन[संपादन]

 • आपण येथे गृहित धरले आहे की, ही बाग कोणत्यातरी बांधलेल्या जागेत उभी केली जाणार आहे त्यामुळे तेथे कुंड्या ठेवण्याच्या जागी खाली जमिन/माती नसेल.
 • शिवाय आपण रहातो, झोपतो, वावरतो ती जागा या कुंड्यांपासून काही फ़ुटांच्या अंतरावरच असणार आहे, त्यामुळे माती आणि पालापाचोळा यांच्या कचऱ्याची सतत काळजी घेणे आपल्याला भाग पडते.
 • या सर्वांचा विचार करता, खाली फ़रशी असलेली सर्वात उत्तम, सर्व कुंड्यांना खाली प्लेट्स लावणे म्हणूनच आवश्यक आहे. जेणेकरून जास्तीचे पाणी जेव्हा कुंडीमधून बाहेर पडेल तेव्हा ते प्लेट मध्ये जमा होईल आणि हळूहळू कुंडीतील माती ते परत वर ओढून घेईल.
 • कोणत्याही परिस्थीतीत प्लेट्स न लावता कुंडी डायरेक्ट स्लेबवर ठेवणे टाळा. शक्यतो कुंड्या स्लेबपासून थोड्या उंचीवर स्टेंडवर ठेवल्यास उत्तम.
 • स्लेबला वॉटर प्रुफ़ींग करुन घेणे आवश्यक आहे.
 • अनेकदा झाडांना घातलेले पाणी ओघळून खाली येते तेव्हा जिथे तुम्ही झाडे ठेवत आहात तिथे पाण्याचा निचरा करण्याची निट व्यवस्था आहे याकडे लक्ष द्या. शक्यतो सर्व कुंड्यांना प्लेट्स लावल्यास ही समस्या येतच नाही.

गच्ची, गैलरी यांचे छत आणि भिंती/जाळ्या[संपादन]

 • शक्यतो छताला हिरवी जाळी लावल्यास, झाडांना उन पावसाचा त्रास होत नाही. जरी संपुर्ण उऩ्हात राहणारी झाडे असतील तरी ती हिरव्या जाळी खाली सुंदर वाढतात. जास्तीचे उन आणि जास्तीचे पावसाचे पाणी या दोऩ्हीपासून संरक्षण मिळवता येते.
 • शक्यतो बाजूच्या भिंतींना वेली लावता येतात, जेथे चौकोनी गच्ची उपलब्ध आहे तिथे पॅराफ़िट वॉलवर आणि हिरव्या जाळीच्या छताखाली अशा कमरेपासून वरच्या उंचीच्या भागात वेली चढवता येतील अशा विरळ प्लास्टीकच्या किंवा काथ्याच्या जाळ्या तयार कराव्यात जेणे करून, त्यांचा वेलींची भिंतही तयार होते आणि वेलींना सगळीकडून सुर्यप्रकाश मिळतो. शिवाय आतील झाडांना जास्तीचा वाराही लागत नाही.