विकिबुक्स:मदतीचा लेख
शुद्धलेखन आणि व्याकरण
[संपादन]मराठी व्याकरण या लेखामध्ये मराठी व्याकरण आणि त्यासंबधीची माहिती आहे. मराठी शुद्धलेखन हा लेखदेखील उपयोगी ठरावा. अशुद्धलेखन हा अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण कसे करावे अथवा करवून घ्यावे या संबधीचा प्रकल्प आहे.
विकिबुक्स लेखनशैली
[संपादन]अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. विकीबुक्सची लेखनशैली अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिबुक्ससाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बर्याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द पारिभाषिक संज्ञा या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता.
नमुना मांडणीचे लेख
[संपादन]विकिबुक्समधील सर्वोत्तम लेख मुखपृष्ठावरील मासिक सदर विभागात प्रदर्शित केला जातात. त्या लेखांचा नीट अभ्यास करुन आपण विकिबुक्सवर लेख कसे लिहावेत याचा अभ्यास करू शकता. विकिबुक्समध्ये संपादन करताना काही शंका आल्यास विकिबुक्स:चावडी येथे संपर्क साधणे. विकिपीडियावरील काही उत्तम लेख पुढील प्रमाणे-
विकिभाषेद्वारे संपादन
[संपादन]विकिभाषेद्वारे संपादन
विकिला स्वतःची विशिष्ट लेखन शैली नसली तरी वाचक,लेखक व संपादकांच्या सोयीनुसार काही संकेत आणि विकिसंज्ञा हळू हळू रूढ होत आहेत. उदाहरणार्थ, शीर्षक लेखनाचे संकेत, शुद्धलेखन इत्यादी ; तसेच विकिमध्ये सर्वसामान्यपणे कुणालाही संपादन करता यावे म्हणून संगणकाच्या कळफलकावर सहज उपलब्ध असलेल्या चिन्हांची एक सोपी चिन्हांकित भाषाप्रणाली बनवलेली आहे तिला विकि मार्कअप लँग्वेज असेही म्हणतात.
उदाहरणार्थ
तरंगचिन्ह ~ सामान्यपणे कळफलकावरील १ या आकड्याच्या डावीकडे असते. शिफ्टकळ आणि '~' चिन्हाची कळ दाबली असता उपलब्ध होते.
उपयोग- मुख्यत्वे सही करण्याकरता तरंग चिन्ह चारवेळा ~~~~ दाबून वापरले असता सदस्याची डिजिटल(डिजिटल शब्दाचा उपयोग येथे बरोबर आहे का नाही याची खात्री करा!) विकिसही आपोआप बनते.
तारकाचिन्ह * आठ या अंकाच्या डोक्यावरील हे चिन्ह आठ हा अंक आणि शिफ्ट कळ सोबत दाबले असता मिळते. ==== | {{}} [[]] : <> ''' '''
शीर्षक
[संपादन]उदाहरण
[संपादन]विकिबुक्समध्ये कसे दिसते | जेव्हा तुम्ही असे लिहिता |
---|---|
नवीन विभाग उपविभाग उप-उपविभाग
|
==नवीन विभाग== ===उपविभाग=== ====उप-उपविभाग==== |
केवळ एका नव्या ओळीचा आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही. त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणार्या वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक शोधण्यात उपयोगाचे आहे (विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी). परंतु एखाद्या रिकाम्या ओळीमुळे नवीन परिच्छेद सुरू होतो.
|
केवळ एका नव्या ओळीचा आखणीवर सहसा काही परिणाम होत नाही. त्यांचा उपयोग एखाद्या परिच्छेदामध्ये येणार्या वाक्यांना विलग करण्यासाठी केला जाऊ शकतो. काही संपादन-प्रणालींना हे दोन पाठ्यांमधील फरक शोधण्यात उपयोगाचे आहे (विशेषतः एका पाठ्याच्या दोन आवृत्तींमधील फरक पाहण्यासाठी). परंतु एखाद्या रिकाम्या ओळीमुळे नवीन परिच्छेद सुरू होतो. |
तुम्ही ओळींना तोडू शकता
|
तुम्ही ओळींना तोडू शकता<br> अगदी परिच्छेद न बदलता. |
त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो.
|
* विकिभाषेत यादी/सूची करणे अतिशय सोपे आहे.: ** प्रत्येक ओळ एका तारकेने सुरू करा. *** अधिकची प्रत्येक तारका नवीन पातळी सुरू होते. **** यादीमध्ये आलेल्या एक नवीन ओळीनंतर त्या यादीमधील एक नग पूर्ण होतो. * एक नवीन ओळ नवीन यादीला सुरूवात करते. |
|
# क्रमांकित याद्यादेखील बनविल्या जाऊ शकतात ## पद्धतशीर आणि नेटकेपणाने ## सोप्यारीतीने ### आणि कमीतकमी प्रयत्नांमध्ये |
|
; व्याख्या-यादी : व्याख्यांची यादी ; नग : आणि त्याची व्याख्या ; आणखी एक नग : त्याचीदेखील व्याख्या या पद्धतीने |
|
* मिश्र-याद्यादेखील बनविता येतात *# आणि त्यांना एकमेकांमध्ये गुंफता येते *#* जसे की... *#*; आणि व्याख्या-यादी देखील... *#*: हे सर्व *#*; अतिशय *#*: सोप्या पद्धतीने बनवा *#*:* अ *#*:* ब *#*:* क |
आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते. |
: एक अपूर्णविराम (:) एका ओळीला किंवा परिच्छेदाला प्रमाणबद्ध करतो. आणि एक नवीन ओळ नव्या परिच्छेदाला सुरूवात करते. |
When there is a need for separating a block of text
This is useful for (as the name says) inserting blocks of quoted (and cited) text. |
<blockquote> The '''blockquote''' command will indent both margins when needed instead of the left margin only as the colon does. </blockquote> |
(See formula on right):
|
IF a line starts with a space THEN it will be formatted exactly as typed; in a fixed-width font; lines will not wrap; ENDIF |
|
<center>Centered text.</center> |
ही रेषेवरची ओळ आणि ही रेषेखालची
|
ही रेषेवरची ओळ ---- आणि ही रेषेखालची |
सारणी
[संपादन]विकीभाषेत सारणी बनविणे सोपे आहे. काही उदाहरणे खाली दिलेली आहेत आणि ही उदाहरणे केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. यापेक्षा कितीतरी मोठ्या, वेगळ्या आणि चांगल्याप्रकारे सारणी वापरल्या जाऊ शकतात.
सोपे उदाहरण
[संपादन]{| |पहिले घर, पहिली रांग |दुसरे घर, पहिली रांग |- |पहिले घर, दुसरी रांग |दुसरे घर, दुसरी रांग |}
and
{| |पहिले घर, पहिली रांग || दुसरे घर, पहिली रांग |- |पहिले घर, दुसरी रांग || दुसरे घर, दुसरी रांग |}
ही दोन्ही विकीभाषेतील उदाहरणे खालील मजकूर दाखवितात -
पहिले घर, पहिली रांग | दुसरे घर, पहिली रांग |
पहिले घर दुसरी रांग | दुसरे घर दुसरी रांग |
सध्या अतिशय गरजेची गोष्ट म्हणजे चित्रे होत. चित्रांची कमतरता जाणवत आहे. चित्रे संकेतस्थळावर चढविताना ते विकिकॉमन्स या संकेतस्थळावर (किंवा मराठी विकिबुक्सवर) चढवावे. मराठी विकिबुक्सचा चेहरा आणि एकंदरीत बाज मराठमोळा बनविण्यासाठी मराठी संस्कृतीशी संलग्न चित्रे हवी आहेत. ती चित्रे फक्त सर्वसामान्यांसाठी खुली किंवा सार्वजनिक स्वरूपात असावीत (खाजगी असल्यास मूळ मालकाच्या परवानगीने आपण ती चित्रे उपलब्ध करू शकता).
नवा लेख कसा सुरू करावा
[संपादन]मराठी विकिवर सुरुवात करण्याच्या दोन पद्धती आहेत.
१. संदर्भित पानावरून दुवा तयार करून. एखाद्या पानावरील एखाद्या शब्दाबद्दल लेख लिहायचा असल्यास --
जर संदर्भित पानावर तो शब्द लाल रंगात व अधोरेखित (underlined) असेल, तर त्या शब्दावर टिचकी देताच लेख संपादित करावयाचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. जर लाल रंगात नसेल, तर संदर्भित लेख संपादन करून त्या पानावरील इच्छित शब्द दुहेरी चौकटी कंसात ([[]]) लिहिल्यास असा दुवा तयार होईल. त्यावर टिचकी देता 'असा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!
२. शोध करून. ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील. त्याबरोबर 'No page with this exact title exists, trying full text search.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख आधीच लिहिला गेला असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वर टिचकी देताच इच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.
या माहितीचा उपयोग होऊन तुमच्याकडूनही मराठी विकिमध्ये मोलाची भर पडेल अशी आशा आहे.
जर अजून काही प्रश्न असल्यास विकिबुक्स चावडीवर विचारावेत.
नवीन लेख लिहिण्याचा सोपा उपाय
[संपादन]विकिबुक्समध्ये नवीन लेखांची भर घालणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या.
हे सुद्धा पहा
[संपादन]- मदतकेंद्र
- विकिबुक्स संदर्भ सूची
- विकिबुक्स मदत सूची
- मराठीत कसे लिहाल आणि वाचाल?
- मराठी विकिबुक्स प्रकल्प पाने