Jump to content

स्त्रीवाद, संकल्पना आणि सिध्दांकन

विकिबुक्स कडून

स्त्रीवाद म्हणजे स्त्री केंद्रित व्यवस्था आणण्यास कार्यरत असलेली चळवळ असे म्हणता येईल. स्त्रीवादाचे ध्येय स्त्री-पुरुष समानतेच्या अंतिमत्वाकडे वाटचाल करण्याचे असते.

पाश्चात्त्य स्त्रीवाद[संपादन]

जागतिक वाङ्मयात सॅण्ड्रा गिल्बर्ट, हेलन सिझू, एलेन शोवाल्टर, सिमॉन दि बोव्हा आदी विदुषींनी स्त्रीवादी वाङ्मयविचाराची मांडणी केली. वाङमयातील स्त्रीशरीरनिष्ठ अनुभव, मनोविश्लेषण, शब्दसंग्रह आदींचे चित्रण व छुपे पुरूषवर्चस्व यांचा शोध घेण्यावर स्त्रीवादी वाङ्मयाचा भर असतो.[१]

मार्क्सवादी स्त्रीवाद[संपादन]

अभिजात मार्क्सवाद आणि स्त्रीवाद् यांच्यातील परस्पर संबंधाबाबत विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. अर्थात मार्क्सवादातील पुढील काही आशय सुत्रांनी स्त्रीवादी आकलनात भर पाडली आहे : १. ऐतिहासिक विकासक्रम समजून घेण्यासाठी विचारांवर वा संकल्पनांवर नव्हे, तर लोकांच्या भौतिक कृतीवर विशेषतः उत्पादनाच्या क्रियेवर भर दिला आहे. २. माणूस स्वतः आपला इतिहास घडवत असतो. या संकल्पनांचा स्त्रीवादी आकलनावर प्रभाव पडला आहे. प्रामुख्याने कुटुंबातील शोषण ऐतिहासिक संदर्भात समजून घेणे शक्य झाले. [२]


== आधुनि कोत्तर (पोस्ट मॉडर्निझम) == उत्तर आधुनिकता

सामाजिक वर्जितता(परिघीकरण)[संपादन]

सामाजिक वर्जितता(परिघीकरण)w:Social exclusion ही संकल्पना ही प्रामुख्याने सामाजिक उपेक्षितता किंवा सामाजिक स्तर अधोगीतीकरण या अर्थाने वापरली जाते. हा शब्द युरोप मध्ये सर्रासपणे हा वापरला जातो,परंतु हा कल्याणकारी धोरण म्हणून प्रथम फ्रान्स या देशामध्ये 1974 साली अनेक वंचित समुहांना जसे बेघर, गरीब, बेकार, व्यसनाधीन, वेश्या ई. समूहांना राज्याच्या धोरणात समविष्ट करण्यास पुढे आली. सामाजिक वर्जितता ही अशी एक गतिशील आणि बहुआयामी संकल्पना मानली जाते की ज्यातून व्यक्ति किंवा समूह हे समाजाच्या आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय जीवनात पूर्णपणे किंवा अंशतः सहभागी होण्यास अडचणी निर्माण होतात व परिणामी असे समूह किंवा व्यक्ति यातून समजाच्या सर्व परीक्षेत्रातून बाहेर फेकले जातात[३]

भारतीय स्त्रीवाद[संपादन]

भारतीय समाजव्यवस्थेत स्त्री-पुरुषांची निखळ मैत्री, निरामय प्रेमसंबंध धारणेत अडथळे आहेत. असे समान पातळीवरचे स्त्री-पुरुष संबंध, प्रेमासारख्या अस्सल जिवंत, उत्कट संवेदना ठरावीक सत्तासंबंधाच्या प्रदूषित पर्यावरणामुळे अ-वास्तव ठरतात.[४]

दलित स्त्रीवाद[संपादन]

दलित स्त्रीवाद (Dalit Feminism) ही एक राजकीय विचारसरणी आहे. १९९६ साली गोपाळ गुरु यांच्या दलित वुमेन टॉक डिफरेन्टली (Dalit women talk differently) या लेखाद्वारे दलित स्त्रीवादाची चर्चा सुरु झाली.[५] यापूर्वीदेखील १९९० पासूनच दलित स्त्रियांच्या वेगळ्या संघटनांमधून वेगळ्या दलित स्त्रीवादाची मांडणी चळवळीच्या पातळीवर होत होती. मुख्यप्रवाही स्त्रीवाद आणि दलित चळवळ यांनी दलित स्त्रियांच्या प्रश्नाकडे सिद्धान्ताच्या, विश्लेषणाच्या व कृतीच्या पातळीवर दुर्लक्ष केले हा तात्कालिक संदर्भ होता. त्याचप्रकारे फुले-आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाचा ऐतिहासिक संदर्भही या चर्चेच्या पार्श्वभूमीला होता.[६]

पार्श्वभूमी[संपादन]

फुले आंबेडकरी चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता.जोतीराव फुल्यांनीव सावित्रीबाई फुल्यांनी स्त्रीशिक्षणाची सुरुवात करुन (१८४८) दलित स्त्रियांनाही शिक्षणाची कवाडे खुली केली. यातीलच एका शाळेतील विद्यार्थीनी मुक्ता साळवे हिने आम्हां महारामांगांचा धर्म कोणता?या निबंधातून दलित स्त्रीचे मातृत्वाचे अनुभव उच्चवर्णीय स्त्रियांच्या अनुभवांपेक्षा भिन्न आहेत अशी मांडणी केली. आंबेडकरी चळवळीतूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रिया या जातिव्यवस्थेची प्रवेशद्वारे आहेत यातून जातस्त्रीप्रश्न यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला.मात्र आंबेडकरोत्तर रिपब्लिकन पक्षाचे राजकारण, दलित पँथर, नामांतर चळवळ आदी दलित चळवळींनी दलित स्त्रीचा प्रश्न स्त्रीप्रश्न आहे असे मानून त्याकडे दुर्लक्ष केले. या चळवळींचा केंद्रबिंदू नेहमी दलित पुरुष होता. स्त्रीवादी चळवळीने ७०च्या दशकापासून भारतात अधिक राजकीय कृती करण्यास सुरुवात केली. हुंडाविरोधी आंदोलने, बलात्कारविरोधी आंदोलने, घरगुती हिंसाचारविरोधी चळवळी यातून भारतातील स्त्रीवाद चळवळ सिद्धान्त व व्यवहाराच्या पातळीवर विकसित होत होता. या स्त्रीवादी चळवळीने दलित स्त्रीचा प्रश्न हा जातीचा प्रश्न आहे असे मानून त्याकडे दुर्लक्ष केले. या चळवळीचा केंद्रबिंदू नेहमी उच्चवर्णीय स्त्री होती.

दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी[संपादन]

भूमिदृष्टी सिद्धान्त Standpoint Theory हा सिद्धान्त मार्क्सवादी हेगेलवादी तत्त्वज्ञानातून आलेला असून या सिद्धान्तानुसार समाजातील सर्वात शोषित समूहाच्या दृष्टीकोनातूनच सत्याचे आकलन होऊ शकते यालाच भूमिदृष्टी असे म्हणतात. अशी भूमिदृष्टी जन्मतः प्राप्त होते असे नाही तर ही एक जाणीव असून ती ऐतिहासिक ल ढ्यांतून विकसित होते. शर्मिला रेगे यांनी या सिद्धान्ताची मांडणी दलित स्त्रीच्या बाबतीत केली आहे.[७] दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी ही फुले आंबेडकरी ऐतिहासिक लढ्यांमधून विकसित झालेली आहे. ती भारतातील सध्या अस्तित्वात असलेल्या भूमिदृष्टीपैकी सर्वात मोठी मुक्तिदायी भूमिदृष्टी असल्याने स्त्रीवादी चळवळीने त्याचा स्वीकार करावा असे रेगे यांचे मत आहे.

दलित स्त्रीवादी संघटना[संपादन]

दलित स्त्रीवादी साहित्य[संपादन]

मराठी[संपादन]

 • आम्हीही इतिहास घडवला- ऊर्मिला पवार, मीनाक्षी मून
 • आयदान(आत्मचरित्र)- ऊर्मिला पवार
 • धादांत खैरलांजी(नाटक)- प्रज्ञा दया पवार
 • जिणं आमचं- बेबीताई कांबळे

इंग्रजी[संपादन]

 • अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनू- शर्मिला रेगे

बंगाली[संपादन]

 • चंडालीनी कोबिता (कवितासंग्रह)- कल्यानी ठाकुर
 • चंडालीनी ब्रिबिती (निबंधसंग्रह)- कल्यानी ठाकुर

काळा स्त्रीवाद व दलित स्त्रीवाद[संपादन]

काळा स्त्रीवाद व दलित स्त्रीवाद यांमध्ये अनेक बाबतीत साम्य व काही बाबतीत भिन्नत्व असलेले दिसते. भूमिदृष्टी सिद्धान्ताचा दोन्हींनी स्वीकार केलेला दिसतो. परंतु काळ्या स्त्रीवादामध्ये वंशवादविरोधी चळवळीतून येणारी मातृभूमीची आस ही बाब भिन्न असलेली दिसते.

संदर्भ सूची[संपादन]


संदर्भ[संपादन]

 1. http://marathimaitree.blogspot.com/2009/03/blog-post_22.html#more
 2. रेगे शर्मिला, मार्क्सवादी स्त्रीवाद् : एक संकल्पनात्मक् आढावा, वाटसरू१६ ते ३१ डिसेंबर २००४/वर्ष ४ थे अंक १६ वा.
 3. सेन, अमर्त्य. 2003. डेवलपमेंट ॲज फ्रीडम. केंब्रिज प्रकाशन, यू.के. पु।198.
 4. Google's cache of http://www.miloonsaryajani.com/node/234. It is a snapshot of the page as it appeared on 14 Dec 2009 20:25:40 GMT.
 5. http://www.epw.in/commentary/dalit-women-talk-differently.html
 6. पवार, ऊर्मिला आणि मून, मीनाक्षी(२०००).आम्हीही इतिहास घडवला.सुगावा प्रकाशन,पुणे
 7. http://www.epw.in/review-womens-studies/dalit-women-talk-differently-critique-difference-and-towards-dalit-feminist-st