Jump to content

सांभार वडी

विकिबुक्स कडून
सांभार-वडी

नागपुरात सांभार-वडी विशेष प्रसिद्ध आहे. सांभार (कोथिंबिरीला नागपुरात सांभार म्हणतात) वापरून सारण केले जाते. बेसन आणि मैदा याची छोटी पोळी तयार करून तिच्यावर सारण ठेवतात आणि पोळीची चौकोनी घडी घालतात. ही घडी तळली की सांभरवडी बनते. हा पदार्थ एका विशिष्ट प्रकारच्या कढीसोबत स्वादिष्ट लागतो.

आकार

[संपादन]

सांभार-वडीचा आकार साधारपणे १० सेंमी x ६ सेंमी इतका असतो. जाडी साधारणपणे २ सेंमी इतकी असते.

पाककृती

[संपादन]

साहित्य

[संपादन]

कोथिंबीर, सूके खोबरे, खसखस, मिरची पेस्ट, सफेद तीळ, भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, तेल, बेसन, मैदा, मीठ इ.

कृती

[संपादन]

सारण- प्रथम कढईत तेल गरम करून त्यात सूके खोबरे भाजून घ्यावे मग त्या खसखस, तीळ, मिरची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट टाकून ते मिश्रण परतून घ्यावे. पाती- बेसन व मैदा एकत्र करून त्यात चवीपूरते मीठ टाकून त्यावर मोहन टाकावे व हे मिश्रण मळून घ्यावे. या पीठाच्या पाती कराव्यात. या पातीत सारण भरून त्या चित्रात दाखविल्याप्रामाणे बंद कराव्यात आणि तापल्या तेलात बूडवून तळून काढाव्यात.

सांभार-वडी लोकप्रिय असणारे प्रांत

[संपादन]

नागपूर, भंडारा, चंद्रपूर