विकिबुक्स:सदस्यनाव बदला
Appearance
सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती या पानावर देण्यात आली आहे!
या पानावरील माहिती लक्षात घेऊन येथे दिलेल्या दुव्यांवर जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.
तुमचे सदस्यनाव बदलण्यासाठी या पानावर दिलेल्या सुचनांचे पालन करा. तुमचे सदस्यनाव हे तुमच्या सोयीसाठी आहे, त्यामुळे तुम्ही ते कधीही बदलू शकता आणि त्यात आवश्यक बदलही करू शकता. फक्त विकिमिडीया प्रकल्पांवर सदस्यनावात बदल करण्यासाठी काही नियम आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. पुर्वी सदस्यनाव बदलाची प्रक्रिया खूप जटील होती पण आता ती प्रक्रिया खूप सोपी झाली आहे त्यामुळे फक्त एक अर्ज भरून दिल्यास तुमच्या नावात योग्य तो बदल करता येतो.
वैश्विक सदस्यनाव बदलाविषयीचे धोरण (मूळ धोरण)
सदस्यनाव बदल होण्यासाठी खालील सर्व अटींची पुर्तता होणे आवश्यक आहे.
- नविन सदस्यनाव काळजीपूर्वक निवडलेले असावे, अनावश्यक, वारंवार केलेल्या आणि चुकीच्या नावाच्या विनंत्या नाकारल्या जातील. स्थानिक धोरणांविषयी वैश्विक सदस्यनाव बदल करणार्या रिनेमर/स्टीवर्ड यांना कल्पना असेलच असे नाही त्यामुळे तुमचे सदस्यनाव तुम्ही स्थानिक धोरणांविषयी तपासणी करावी.
- तुमच्या जुन्या सदस्यनावाशी नवे सदस्यनाव जोडलेले असावे. तुमच्या सदस्यनावाशी/खात्याशी तुमच्या वाईट वागणूकीचा इतिहास तोडण्यासाठी नाव बदलून दिले जात नाही.
- तुमचे नवीन नाव कुठल्याही विकि प्रकल्पावर आधीच वापरात नसावे, तरच तुम्हाला ते सदस्यनाव घेता येणार नाही. त्यामुळे Special:CentralAuth येथे तुम्हाला हवे असलेले सदस्यनाव भरून खात्री करून घ्या की ते कुणीही वापरत नाही.
सदस्यनाव बदलण्यासाठी सामान्य कारणे
सर्व सामान्यपणे खालील कारणे सदस्यनाव बदलासाठी योग्य मानली जातात.
- तुमचे खरे नाव लपवण्यासाठी.
- तुमच्या वैयक्तिक माहिती लपवण्यासाठी.
- आधीचे नाव जाहिरातबाजी करणारे असल्यास नवीन वैयक्तिक नाव देण्यासाठी.
- आधीच्या नाव सदस्यनाव धोरणाच्या विरुद्ध असल्यास नवीन योग्य नाव देण्यासाठी.
- जर सदस्यनाव तुम्हाला आवडत नसेल आणि नवीन सदस्यनाव तुमच्या आवडीचे द्यायाचे असल्यास.
या प्रकारचे नवीन सदस्यनाव अमान्य आहे
- फक्त आकड्यांचा वापर करून लिहिलेले.
- दोन किंवा जास्त वेगवेगळ्या भाषांमध्ये/लिपिंमध्ये लिहिलेले. (सुरेSh, Viनोद इ.)
- अनाकलनीय, अगम्य अक्षरे, उलट सुलट लिहिलेली तीच तीच अक्षरे असलेले. (अकर्ल्फ़ोअप्रलप इ.)
- अश्लिल, इतरांना अपमानकारक, इतरांच्या सदस्यनामाची नक्कल करणारे.
- जाहिरातबाजी, एकच सदस्यनाव अनेक लोक वापरतात असा अविर्भाव असणारे. (रिलायन्स, टाटा, पार्ले जी)
- संस्था, कंपन्या, सरकारी पदे किंवा अशाच अधिकारी कायद्याने सत्ता दाखविणारे अधिकार असलेली पदे असल्याचा अविर्भाव दाखवणारी नावे. (रिलायन्स, टाटा, पार्ले जी, कमिशनर, पंतप्रधान इ)