Jump to content

वांग्याचे भरीत

विकिबुक्स कडून
पाकिस्तानी वांग्याचे भरीत

मराठी खाद्य संस्कृतीतील एक महत्वाचा पदार्थ,भाजी म्हणुन खाल्ला जातो. भरीत करण्यासाठी बाजारात भरीताची वांगे विकत मिळतात,ही नेहमीच्या वांग्यापेक्षा आकारानी मोठी असतात.

  • वांग्याचे भरीत संपुर्ण महाराष्ट्रात केले जात असले तरी जळगांव व परिसरातील वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे.

साहित्य[संपादन]

  • एक भरीताचे वांगे, लसुन, हिरव्या मिरच्या, कांद्याची पात, कोथींबीर, शेंगदाणे, सुके खोबरे, तेल, जिरे, मोहरी, हिंग.

पुर्व तयारी[संपादन]

  • मोठे वांगे भाजुन घेताना त्यामध्ये लसूण आणि ओल्या मिरच्या चिरडून भराव्या.
  • खोबऱ्याचे काप करुन घ्या.

कृती[संपादन]

  • भाजलेल्या वांग्याची साल काढून टाका, लसूण आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यात बारीक करुन घ्याव्यात व त्यात वांग्याचा गर घालुन एकजीव करुन घ्यावा. आता कढईमधे तेल तापायला ठेवुन त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी. त्यात शेंगदाणे आणि खोबरे घालुन परतावे. खोबरे चांगले भाजले गेले की त्यात कांद्याची पात घालुन २-३ मिनीटे परतावे. त्यावर वांग्याचा गर, मीठ टाकुन व्यवस्थीत परतुन घ्यावे. वरुन कोथींबीर घालुन २-३ मिनीटे परतुन घ्यावे.

सजावट[संपादन]

आवश्यकते प्रमाणे...तुमची कल्पकता पणाला लावा..