वडा-पाव
वडा-पाव | |
---|---|
वेळ | मिनिटे |
वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते).
इतिहास
[संपादन]वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. त्यामुळेच सर्वत्र तो मुंबई वडापाव असाच प्रसिद्ध पावला. वडापाव हा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी चवीने खाल्ला जातो. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये देखील वडापावची लोकप्रियता भरपूर आहे. [१]
थोडक्यात कृती
[संपादन]ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत: वडा आणि पाव.[निःसंदिग्धीकरण आवश्यक]
वडा करण्याची सर्वसाधारण कृती:
- उकडलेला बटाटा कुस्करुन, त्यात मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, हळद, कढूुलिंब, वगैरे मिसळून, त्याला हिंग-मोहरीची फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या चण्याच्या पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात.
- सोनेरी रंग झाला की वडे तयार झाले असे समजावे. वडे कढईतून काढताना अतिरिक्त तेल नितळू द्यावे. स्वछ टीप कागदावर वडे काढल्यास अतिरिक्त तेल कागदात शोषले जाते.
- पाव सहसा घरात न बनवता बेकरीमधून आणला जातो. ह्या पावाची एक विशिष्ट चव असते.
वडापाव मिळण्याची लोकप्रिय ठिकाणे
[संपादन]हा क्रम फक्त नावानुसार आहे
- हॉटेल कुजविहार, ठाणे
- हॉटेल छबिलदास , दादर, मुंबई
- जोशी वडेवाले साखळी, पुणे
- जे जे गार्डन वडा पाव, कैंप, पुणे
- जयंत सामोसा , जुने सिडको, नाशिक
- रामेश्वर वडापाव सेंटर, कुर्ला , मुंबई
बाह्य दुवे
[संपादन]- ↑ "कसा लागला वडापावचा शोध...वाचा InfoMarathi » Info Marathi". Info Marathi (इंग्रजी भाषेत). 2019-08-11 रोजी पाहिले.