Jump to content

रसगुल्ला

विकिबुक्स कडून
'रसगुल्ला

रसगुल्ला हा भारतीय पदार्थ आहे.हा पदार्थ मुख्यतः पश्चिम बंगालओडिसात लोकप्रिय आहे.[] रसगुल्ला बंगालमध्ये रोसोगोल्ला किंवा रोशोगुल्ला म्हणून ओळखला जातो तर ओडिसात रसगोला म्हणून प्रसिद्ध आहे.[] रोशगुल्ला, रोसोगुल्ला, रसगोल्ला आणि रसभरी वा रसबरी(नेपाळी) ह्या नावांनी सुद्धा हा पदार्थ ओळखला जातो.

अभ्यासक असे मानतात की ओरिसा येथे केला जाणारा खीर मोहन नावाच्या पदार्थामध्ये रसगुल्ला याचे मूळ मानले जाते. जगन्नाथपुरी येथील देवीला रसगुल्ला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. १२ व्या शतकात गोधनाची समृद्धता असताना नसलेले दूध फेकून दिले जात असे. मंदिरातील एका पुरोहिताने स्थानिकांना या नसलेल्या दुधाचे पनीर करण्यास शिकविले आणि त्यापासून रसगुल्ला तयार करण्यात येऊ लागला.[]

पाककृती

[संपादन]
भुवनेश्वर येथील रसगुल्ला

रसगुल्ला तयार करण्यासाठी पनीर हा मुख्य पदार्थ आवश्यक असतो.[] दुधामध्ये लिंबाचा रस, दही अथवा व्हिनेगर इत्यादी आंबट पदार्थ घालून दूध नासविण्याची प्रक्रिया केली जाते. यामध्ये दुधातील पाणी वेगळे होते. हे पाणी काढून टाकून शिल्लक राहिलेला चोथा फडक्यात घट्ट बांधून, वजन ठेवून दाबून ठेवला जातो. त्यातील सर्व पाणी निथळून गेले की उरलेल्या चोथ्याचे पनीर तयार होते.[] पनीरचे गोळे करून ते साखरेच्या पाकात सोडले जातात आणि रसगुल्ला तयार केला जातो.

हेदेखील पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. Dalal, Tarla. Mithai (इंग्रजी भाषेत). Sanjay & Co. ISBN 978-81-86469-38-5.
  2. Books, L. L. C. Oriya Cuisine: Rasgulla, Oriya Cuisine, Pitha, Hilsa, Kheer, Jalebi, Chhenna Poda, Puri, Pakhal, Kalakand, Chhena Gaja, Rasabali, Ras (इंग्रजी भाषेत). General Books LLC. ISBN 978-1-155-81251-9.
  3. author/lokmat-news-network (2017-11-20). "रसगुल्ला वादा पलिकडची माहिती हवी असेल तर हे वाचा!". Lokmat. 2021-05-10 रोजी पाहिले.
  4. "चवदार पाककृती...दुधातल्या (विष्णू मनोहर)". eSakal - Marathi Newspaper. 2021-05-10 रोजी पाहिले.
  5. लाईव्ह 24, अहमदनगर. "Marathi Recipes : रसगुल्ला रेसिपी मराठी". Ahmednagar Live24 (इंग्रजी भाषेत). 2021-05-10 रोजी पाहिले.