Jump to content

मिसळ पाव

विकिबुक्स कडून

मिसळ पाव कडधान्यांची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. यात पुणेरी मिसळ,नाशिक मिसळ, दही मिसळ,नादखुळा मिसळ,गुजराती मिसळ,फराळी मिसळ इत्यादी प्रकारही केले जातात.

मिसळ पाव रस्सा

इतिहास[संपादन]

हा पदार्थ इसवी सन १९५० साली महाराष्ट्रात नाशिक-पुणे-कोल्हापुर येथे एसटी ने प्रवास करताना उदयास आला.

कोल्हापुरी मिसळ पाव


मिसळ


साहित्य: १) मटकी(मोड आलेली) पाव किलो १०) काळा मसाला १ चमचा २) कांदे ४ ११) लाल तिखट २ चमचे ३) टोमॅटो २ १२) मीठ

कांदा

४) ओला नारळ १३) गूळ ५) कोथिंबीर १४) चिंचेचा कोळ ६) आले १ इंच १५) फरसाण पाव किलो ७) लसूण ६-७ १६) बारीक शेव १०० ग्रॅम ८) चिवडा १०० ग्रॅम १७) खारे दाणे मूठभर ९) ब्रेड १


पूर्वतयारी:
१. दोन मोठे कांदे उकडून सोलून कापून घ्यावेत. दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत.
२. मोड आलेली मटकी कुकरमेध्ये वाफवून घ्यावी. लसूण वाटून घ्यावी.
३. बटाटे उकडून त्याच्या फोडी कराव्यात. लिंबाएवढा चिंचेचा कोळ करून घ्यावा.

रस्सा

कृती:

१. एक पातेलीत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेला निम्मा कांदा गुलाबी रंगावर परतावा.
२. कांद्यावर आलं, लसूण वाटलेले, काळा मसाला, २ चमचे लाल तिखट घालून खमंग परतावा.

३. वाफवलेली मटकी कांद्यावर टाकावी. बटाटयाच्या फोडी त्यात घालून त्यात ६-७ वाटया पाणी घालावे.

४. उसळीत कोळलेली चिंच, मीठ, गूळ घालून रस्सा चांगला उकळून घ्यावा. रस्सा पातळ आंबटगोड व झणझणीत तिखट हवा. ह्यालाच सॅंपल असे म्हणतात.

५. मिसळ करताना खोलगट डिशमध्ये २ मोठे चमचे फरसाण, थोडे खारे दाणे, १ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा व १ टे.स्पून बारीक चिरलेला टोमॅटो घालावा.

६. त्यावर १ टे.स्पून बारीक शेव, ओला नारळ, कोथिंबीर घालावी. खायला देताना दुसऱ्या बशीत ब्रेडच्या स्लाईस द्यावा.

कांदा पोहे व इतर पदार्थ

दक्षता:
१. ह्या मिसळीचे सॅंपल खूप पातळ व तिखट करतात. आवडत असल्यास कांदा लसूण मसाला १ टे.स्पून घालावा. मिसळ झणझणीत लागते.
२. सॅंपल जरा जास्त करावे म्हणजे ब्रेड त्याबरोबर खाता येते.
३. फरसाण आणताना १०० ग्रॅम जाड गाठी शेव वेगळी आणावी व ती सॅंपल उकळताना त्यात घालावी. सॅंपल दाटसर व चविष्ट होते.
४. मिसळीचे सर्व जिन्नस तयार ठेवावेत व आयत्यावेळी खोलगट बशीत तयार करून खाण्यास द्यावी.

टीप:
१. चिवडा नसेल तर वाटीभर कांदापोहे घालावेत.


मिसळ पाव