Jump to content

मिरचीचे लोणचे

विकिबुक्स कडून
मिरचीचे लोणचे
वेळ ३० मिनिटे
काठीण्य पातळी

हिरव्या मिरचीचे लोणचे हा भोजनातील एक तोंडी लावण्याचा पदार्थ आहे.

हिरव्या मिरचीचे लोणचे


कृती

[संपादन]

साहित्य : 1/2 किलो हिरवी मिरची, 1 वाटी मोहरीची डाळ, पाव चमचा मेथीची (कच्ची) पूड, 3/4 चमचा हळद, 1 चमचा हिंग, दीड ते दोन वाट्या मीठ, 6 लिंबाचा (रस), 1/2 वाटी तेल.

कृती : सर्वप्रथम एका ताटात किंवा परातीत मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. कढईत तेल कडकडीत तापवावे. तेल तापले की ते परातीतल्या पदार्थांवर ओतावे व झाऱ्याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा. मिरच्या धुऊन फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. नंतर त्याचे तुकडे करावे. त्यात 2 चमचे बाकी ठेवून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच डाळीचा मसाला घालावा. बरणीत 2 चमचे मीठ घालावे. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून एक चमचे मीठ घालावे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी 6 लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा

  • लाल मिरची लोणचे

हिरव्या मिरची प्रमाणे लाल मिरच्या वापरून त्यांचेही लोणचे केले जाते.

लाल मिरच्यांचे लोणचे