मालपुआ रबडी
Appearance
मालपुआ रबडी | |
---|---|
वाढ | २ |
वेळ | ३तास |
काठीण्य पातळी |
मालपुआ रबडी हा एक गोड खाद्यपदार्थ आहे.तो मालपुआ व रबडी या दोन पाककृतींचे एकत्रिकरण आहे.
मालपुआ साहित्य
[संपादन]१ वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक, पाव वाटी बारीक रवा, पाव लिटर दूध, ४ चमचे पिठीसाखर, अर्धा चमचा वेलची पूड, बदामाचे काप आवश्क्तेनुसार, तेल किवा तूप.
रबडी साहित्य
[संपादन]१ लिटर फॅट दूध, अर्धी वाटी साखर, २ थेंब केवडा इंसेन्स, वेलची पूड, गुलाब पाकळ्या.
कृती
[संपादन]रवा, मैदा, कणीक, व पिठीसाखर एकत्र करा. दूध घालून घट्टसर भिजवा. २-३ तास झाकून ठेवा. खोलगट तव्यावर किवां नॉन स्टिक पॅनवर तूप लावून त्यावर तयार मिश्रण १ डावभर घाला. तूप सोडून दोन्ही बाजूंनी बदामी रंगावर मालपुवे भाजावे. दुध आटवून पाव लिटर राहील एवढे करा. त्यात साखर, बदाम काप, काजू, पिस्ता पण घाला. वेलची व इंसेन्स घाला. तयार मालपुव्यावार रबडी घालून गुलाब पाकळ्या घालून सजवा.