Jump to content

भजे

विकिबुक्स कडून
भजे
वेळ मिनिटे
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.
भजे

भजे (अनेक वचन भजी) हा एक खाद्यपदार्थ आहे. बर्‍याच भाजा तसेच बरीच पीठे वापरून भजी करता येतात. गूळ वापरून केलेल्या गोड भज्यांना गुलगुले म्हणतात.

साहित्य

[संपादन]
  1. हरबर्‍याच्या डाळीचे पीठ (बेसन)
  2. हळद
  3. तिखट
  4. मीठ
  5. खाद्य तेल
  6. कांदा/बटाटा/मुळा/घोसावळे/कारले/केळे इत्यादींचे काप; पालक आदी पालेभाजीचे पान, आख्खी मिरची, वगैरे.

पूर्व तयारी

[संपादन]
चित्र:Pune bhaji.jpg
कांद्याची भजी

काप केलेले कांदे/बटाटे हरबर्‍याच्या पिठात बुडवून तळल्यावर भजी बनतात. कांद्या-बटाट्याऐवजी अन्य भाज्याही चालतात. ही भजी नुसती किंवा चटणीशी लावून खातात.

बटाटा भजी लेखन

[संपादन]

बेसनाऐवजी मुगाची भिजवून वाटलेली डाळ घेतल्यास ते मूग भजी होतात.

पालक भजी प्रकृतीस चांगली