Jump to content

बटाट्याच्या काचऱ्या

विकिबुक्स कडून

बटाट्याच्या काचऱ्या (Potato Wafers) म्हणजे बटाट्याचे तळलेले सडपातळ काप. हे किंचित तिखट-मीठ लावून खातात.

बटाट्याच्या काचऱ्या, तिखट-मीठ लावून

साहित्य

[संपादन]
तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, काळा मसाला किंवा लाल तिखट, धणे-जिरे पूड. २-३ बटाटे, एक छोटा कांदा. मीठ चवीनुसार, एक छोटा चमचा साखर.

कृती

[संपादन]

प्रथम बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यावी. कांदा आणि बटाटा बारीक चिरून घ्यावा. नॉनस्टिक पॅन घेवून त्यात तेल टाकावे.तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग घालावे. त्यानंतर कांदा घालून परतावा. कांदा भाजून झाला की त्यात हळद, एक छोटा चमचा तिखट, धणे-जिरे पूड घालावी.हे सर्व मिश्रण निट परतून घ्यावे.त्यानंतर त्यात बटाटा घालावा.मीठ,साखर घालून १० मिनिटे झाकण लावून शिजू द्यावे.

संदर्भ

[संपादन]

[] हा आहे बटाटा चिप्स चा रंजक इतिहास

  1. https://www.maayboli.com/node/61841