पेढा

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

पेढा हा खवा आणि साखर यापासून गोल आकाराचा बनवला जातो.त्यात केशर, खाण्याचा रंग, जायफळ इत्यादी पदार्थही घालतात. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, पुणे, सातारा, कोल्हापूर ही गावे पेढ्यासाठी प्रसिद्ध आहेत.

सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात म्हणून "कंदी पेढे" तर कोल्हापूरचे पेढे हे "फिके पेढे" (तुलनेने मध्यम गोड) म्हणून प्रसिद्ध आहेत. पुण्यामधे "चितळे बंधू", कोल्हापुरात "दगडू बाळा भोसले" हे पेढ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. खव्यापासून बनवलेले आणि मलईपासून बनवलेले असे दोन प्रकारचे पेढे इथे मिळतात. खव्यापासून बनविलेल्या पेढ्यास नुसते 'पेढा' तर मलईपासून बनविलेल्या पेढ्यास 'मलई पेढा' असे म्हणतात. शिवाय साखर लावलेला साखरी पेढा, धारवाडी पेढा, कुरुंदवाडचां पेढा हा खव्या पासून बनवलेला व कोरडा पेढा असतो.तो अनेक दिवस टिकतो. साखरपुडा,लग्न, बारसे, परीक्षेतील यश अशा आनंदाच्या प्रसंगी आप्तेष्ट, मित्रमंडळी यांना पेढे वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.