पातोळ्या

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

पातोळ्या हे महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील आणि गोवा राज्यातील पक्वान्न आहे.[१] [२]पातोळ्या या हळदीच्या पानावर ठेवून वाफविल्या जातात.[३] कोकणात गणेशोत्सव काळात केले जाणारे हे पक्वान्न आहे.[२][४][५]

पातोळ्या(कोकणातील एक पक्वान्न)

साहित्य आणि कृती[संपादन]

हळदीची पाने

तांदूळ पीठ

खोवलेला नारळ

गूळ

मीठ

तेल

तूप

वेलची पूड

कृती-

 • पाणी उकळत ठेवून त्यात मीठ व तेल घालावे.
 • पाण्याला उकळी आल्यावे त्यात पाण्याच्या सम प्रमाणात तांदूळ पिठी घालावी आणि झाकण ठेवावे.
 • वाफ आल्यावर धग बंद करावी.
 • उकड कोमट असताना मळून घ्यावी.
 • नारळाचा चव आणि गूळ, वेलची पूड कढईत घ्यावे आणि मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यावे.
 • हे मिश्रण फार घट्ट करू नये, सैलसर ठेवावे.
 • हळदीच्या पानाला तेल अथवा तूप लावून त्यावर उकडीचा गोळा थापून पसरवून घ्यावा.
 • त्यावर तयार सारण पसरवून घ्यावे आणि हळदीचे पान एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे दुमडून घ्यावे.
 • नंतर ही पाने वाफवून घ्यावीत आणि गरम पातोळे तुपासह खायला द्यावे. [१]

संदर्भ[संपादन]

 1. १.० १.१ "खाद्यवारसा : पातोळ्या". Loksatta. 2018-06-08. 2020-09-11 रोजी पाहिले.
 2. २.० २.१ "Ganesh Chaturthi Special | Konkani Patoli Recipe | Patole Recipe | The Foodie". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 2020-09-11 रोजी पाहिले.
 3. News, Maharashtra (2020-08-28). "... म्हणून मी स्वयंपाक करते!". Maharashtra Today (इंग्रजी भाषेत). 2020-09-11 रोजी पाहिले.
 4. Kamath, Prabha (2019-11-25). Prabha's Kitchen: A Treasure Trove of Konkani Cuisine (इंग्रजी भाषेत). Notion Press Media Pvt. Limited. ISBN 978-1-64587-522-2.
 5. "Patoli: a dish that captures the fragrance of the Konkan coast". Condé Nast Traveller India (इंग्रजी भाषेत). 2020-08-15. 2020-09-13 रोजी पाहिले.