Jump to content

पाट्रोडे

विकिबुक्स कडून
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.
अळूची पाने

पाट्रोडे हा एक मुळ भारतीय खाद्यपदार्थ आहे. त्याची अनेक नावे आहेत. त्याला पत्र, पाथ्रोडो, पाथ्रोडे, पाथ्राडो, पातोडे, टींपा, वडया, अळुवडी, या नावाने भारतीय विविध भाषेतील लोक म्हणतात. महाराष्ट्रात त्याला अळू वडी म्हणतात.

अळू वडी हा महाराष्ट्र राज्यातील कोंकण विभागाचे मालवण भागातील खाध्य पदार्थ आहे.[] तांदळाचे पीठ आणि आवडणारे मसाल्याचे पदार्थ ( हळद मीठ, जिरे, लवंग, तिखट, साखर वगैरे ) एकत्रित करून अळुचे पान पसरून त्यात हे सारण भरतात. त्याचे वेटोळे करतात आणि वाफवतात.

कोंकण भागात अळूचे पान दुमडून व घडी घालून ते वाफऊन करतात. इतर विभागात हे वाफऊन झाल्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे करतात आणि ते तळून घेतात त्यावेळी ती डिश खाण्यासाठी तयार होते.[] पाट्रोड या शब्दात खरे तर दोन शब्द आहेत. एक ‘पत्र’ आणि ‘वडे’। पत्र म्हणजे अनेक भारतीय भाषेत पान, आणि वडे म्हणजे सारण भरून बुजविणे.

अळूवडी करण्याची पद्धत

[संपादन]
  • प्रकार - १
    • साहीत्य

अळू वड्यांसाठीची असलेली ४-५ अळूची पाने
(भाजीचा अळू आणि वडीचा अळू हे वेगवेगळे असतात)
१ कप बेसन पीठ
१ चमचा तांदूळ पीठ
१/४ कप चिंच (घट्ट कोळ)
२ चमचा किसलेला गुळ
१/४ चमचा हळद,
२ चमचा लाल तिखट,
एक एक चमचा धणे – जिरे पूड,
चवीपुरते मीठ,
तळण्यासाठी तेल
इत्यादी.

    • कृती

बेसन पीठ, तांदूळ पीठ, चिंच कोळ, गुळ, हळद, लाल तिखट, धणे – जिरे पूड, १ चमचा तेल आणि चवीपुरते मीठ घालून एकत्र घट्ट करावे. गरज पडल्यास थोडे पाणी घालावे. मिश्रण जास्त पातळ व जास्त घट्ट करु नये. पाने धुऊन, पुसून आणि देठ कापून घ्यावे. आता या पानांवर एकसमान मिश्रण लावून घ्यावे. देठाच्या बाजू कडून लहान बाजू कडे पानांची गुंडाळी करावी. आता हे तयार उंडे मोदकाप्रमाणे उकडून घ्यावेत. गार झाले की चकत्या कापून तळावेत.[]

  • प्रकार - २
    • साहीत्य

तांदूळ,
बंगाली हिरवा मसूर,
हळद,
लाल मिरची पूड,
तेल/तूप
इत्यादी.

    • कृती

तांदूळ भिजवून आणि बंगाली हिरवा मसूर, हळद आणि लाल मिरची पूड आणि आमसूलचे सार त्यात मिसळून हे मिश्रण मिक्सरवर बारीक करावे. वाफवून घेतलेले अळूचे पान पसरून त्यावर बटर व थोडी हळद माखावी. या वर वरील मिश्रण सम प्रमाणात पसरवून लावावे. आता या पानाची गुंडाळी करून वाफवावे आणि त्या नंतर त्याचे तुकडे करावेत. नंतर हे तुकडे तेलात किंवा तूपात तळावेत आणि खावयास ध्यावेत. किंवा मसाल्याची ग्रेवी बनवून यात हे अळूवडीचे तळलेले तुकडे मिसळावेत.

  • प्रकार - ३

अळू इडली हा एक थोडा वेगळा प्रकार आहे. त्यात ही अळू पाने कापून बारीक केली जातात आणि ती इडलीच्या भांड्यात शिजवितात आणि इडलीबरोबर देतात.

कोणती काळजी घ्याल

[संपादन]

अळु वडी खाल्यानंतर कधी कधी घश्यात खवखवते आणि ते खवखवणे कांही तासही असू शकते. अळूमध्ये असलेल्या कॅल्शियम ओक्सालेट मोनोहायड्रेट मुळे अळू खवखवतो. खाताना त्या तुकड्यावर तुम्ही खोबरेल तेल किंवा तूप घेतले तर खवखवणार नाही.[] किंवा खवखवणे सुरू झाल्यास खारी लस्सी, आमसूलचे सार किंवा चिंचेचे चारू पिणे किंवा दही खाणे. शक्यतो अळूचे पदार्थ बनवताना त्यात चिंचेचं कोळ, आमसूल किंवा कच्ची कैरी घातली जाते. यामुळे अळू खवखवत नाही. हा नियम आर्वी, सुरण, चुका आदित्यादीचे पदार्थ बनवताना पण लागू होतो.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "पाट्रोडे - मालवणी खाध्य पदार्थ".
  2. "पाट्रोडेची रेसिपी".
  3. "अळूवडी तयार करण्याची पद्धत".
  4. "पाट्रोडे खाल्यामुळे तोंडाची खाज टाळण्यासाठी वापरात येणारी सावधगिरी".