दडपे पोहे

विकिबुक्स कडून

साहित्य[संपादन]

  • जाड पोहे
  • बारीक चिरलेला कांदा
  • बारीक चिरलेला टोमेटो
  • खरपूस भाजलेले शेंगदाणे
  • फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद

पूर्व तयारी[संपादन]

जाड पोहे भिजवून त्यातले पाणी पुर्ण काढून घ्यायचे आहे. आणि पोहे निथळत ठेवायचे.

कृती[संपादन]

पोहे भिजवावे .. भिजेपर्यंत कांदा टोमॅटो चिरून घ्यावा .. दाणे छान खरपूस भाजून घ्यावे .. पोहे भिजल्यावर .. तेल तापवावे त्यात मोहरी जिरा घालावे मोहरी नीट फुटली कि मग जिरा टाकावे नाहीतर मोहरी कडू लागते .. नंतर त्यात कडीपत्ता हिंग टाकावे हे करताना गॅस बारीक ठेवावा नाहीतर फोडणी करपेल ... हळद मिरची टाकावी .. पोह्यात हे सगळं मिक्स करून घ्यावे मीठ टाकावे चवी साठी थोडी साखर टाकावी .. पाणी टाकावे .. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व करावे ... त्या बरोबर चहा असेल तर मज्जा वेगळी ... एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल ''