Jump to content

थालीपीठ

विकिबुक्स कडून

{

थालीपीठ
वेळ मिनिटे

{बदल}}

चित्र:Thalipit.JPG
काकडीचे थालीपिठ

थालीपीठ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. थालीपीठाचे प्रकार पुढील प्रमाणे - भाजणीचे थालीपीठ , शिंगाड्याचे थालीपीठ, साबुदाण्याचे थालीपीठ, तांदळाचे थालीपीठ, काकडीचे थालीपीठ , गव्हाचे थालीपीठ सगळ्या प्रकारच्या धान्याची पीठे,सुक्क्या भाज्या,उरलेलं अन्न हे सगळ एकत्र करूनही उत्तम थालीपीठ बनवता येते. सगळीे वेेगवेगळी पाीठे एकत्र करूनही थालीपीठ बनवता येते. असा हा थालीपीठ पदार्थ मराठी लोकांची ओळख करून देतो.

गव्हाचे थालीपीठ

[संपादन]

साहित्य

[संपादन]
थालीपीठ
  1. गव्हाचे पीठ (कणिक)
  2. तेल(गोडेतेल)
  3. तिखट
  4. हळद
  5. मीठ
  6. कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले(सर्व ऐच्छिक)
  7. धणे कूट/जिरे कूट/काळा मसाला/मिरपूड (हवे असल्यास आवडीप्रमाणे)

पूर्व तयारी

[संपादन]

प्रथम कांदा/मेथी/पालक/मुळा/हिरव्या मिरच्या/आले ‍इत्यादी वापरावयाचे असल्यास, नीट धुवून बारीक चिरून घ्यावे.

कृती

[संपादन]

कणिक घेऊन त्यात भरपूर मोहन (गोडेतेल)घालावे. वरील सर्व वस्तू आवडीप्रमाणे त्यात टाकाव्या. मग पाण्याने कणीक अशा प्रकारे भिजवावी की त्याचा तव्यावर गोळा थापता आला पाहिजे. तव्यावर थोडे तेल घालून त्यावर गोळा थापा. वरून थोडा पाण्याचा हात लावून सारखे करा. मंद आचेवर शिजू द्या नंतर उलथवून(?) पुन्हा थोडे तेल घाला व शिजू द्या.

सजावट

[संपादन]

खायला देताना सोबत लोणच्याचा रस्सा(?)/टोमॅटो सॉस द्या.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ

साहित्य

२५० ग्राम उकळलेली/शिजवलेली रताळी

१०० ग्राम उपवासाची भाजणी

५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

अर्धा चमचा जिरेपूड

चवीप्रमाणे साधे/सैंधव मीठ

आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल

कृती:

प्रथम उकळलेल्या/शिजवलेल्या रताळ्यांची साल काढून घ्यावी. एका परातीत/बाउलमध्ये साल काढलेली रताळी कुस्करून एकजीव करून घ्यावी. . आता एकजीव केलेल्या रताळ्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे. वरील मिश्रणात सामावेल तशी उपवासाची भाजणी घालत जाऊन, मिश्रणाचा एकसंघ गोळा होईपर्यंत मळावे. मळलेल्या मिश्रणाचे लिम्बापेक्षा किंचित मोठे गोळे करावे आणि पोळपाटावर प्लास्टिक टाकून त्यावर थोडे तूप/तेल लावून थालीपीठ थापावे . गरम तव्यावर तूप/तेल टाकून थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला द्यावे.

इतर माहिती

[संपादन]

सर्व कडधान्ये, तांदुळ, गहू, ज्वारी एकत्र भाजून पीठ दळून आणावे व वरील साहित्य घालून थालीपीठ करावे. पौष्टीक लागते.(?)

बाह्य दुवे

[संपादन]