टोमॅटोची कोशिंबीर

विकिबुक्स कडून

टोमॅटोची कोशिंबीर हा खाद्यपदार्थ आहे.

इतिहास[संपादन]

भारतीय साहित्यात सुमारे अठराव्या शतकापासून कोशिंबीरीचे उल्लेख आढळतात. महाराष्ट्र राज्यात कोशिंबीर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. ही गोड, तिखट किंवा मिश्र चवीचीही बनवली जाते. काहीवेळा कोशिंबीरीस मोहरी वापरून फोडणी ही दिली जाते. मिश्र चवीची कोशिंबीर करण्याची पद्धती खालील प्रमाणे आहे. या कृतीमध्ये टोमॅटो परतला जात नाही तर गरम फोडणीचे तेल चिरलेल्या टोमॅटोवर घातले जाते. यामुळे टोमॅटो शिजत नाही पण फोडणी मात्र बसते.

साहित्य[संपादन]

बारीक चिरलेले ३ टोमॅटो

बारीक चिरलेला १ कांदा

तिखट

मीठ

साखर

तेल

मोहरी

हिंग

हळद

भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट

कृती[संपादन]

  • एका पसरट कुंड्यात / पातेल्यात कांदा आणि टोमॅटो एकत्र करून घ्या.
  • त्यात चवीनुसार तिखट, मीठ, साखर घाला. दाण्याचा कूट घाला.
  • एका कढल्यात/लोखंडी पळीत / छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून घ्या.
  • ही फोडणी कांदा, टोमॅटोच्या मिश्रणावर घाला.

इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]