Jump to content

जिलबी

विकिबुक्स कडून
जिलबी
जिलब्यांचे जवळून टिपलेले दृश्य
वेळ ४५ मिनिटे
काठीण्य पातळी
जिलेबी

जिलेबी किंवा जिलबी (अनेकवचन: जिलेब्या, जिलब्या; अरबी: زلابية , झलाबिया; उर्दू: جلیبی ; नेपाळी: जिल्फी/जेरी ; पंजाबी: ਜਲੇਬੀ ; पश्तो: جليبي ; फारसी: زولبیا , झुल्बिया; बंगाली: জিলাপী जिलापी; मल्याळम: ജിലേബി ; सिंधी: جلیبی ; सिंहला: පැණි වළලු ; हिंदी: जलेबी ; ) हा इराण, तसेच भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये प्रचलित असलेला मिठाईवर्गीय खाद्यपदार्थ आहे. डाळीचे (बेसनाचे) किंवा गव्हाचे आंबवलेले पीठ गोलगोल वेटोळ्यांसारख्या आकारात तेलात सोडून, तळून घेऊन व नंतर साखरेच्या पाकात बुडवून जिलब्या बनवल्या जातात.जलेबी, ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय गोड आणि लोकप्रिय अन्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते. हे खोल फ्राईंग मैदा पीठ (साध्या पीठ किंवा सर्व हेतू पीठ) पिठात  गोलाकार आकारात तयार केले जाते, जे नंतर साखर पाकामध्ये भिजवले जाते. ते विशेषतः भारतीय उपखंड आणि इराणमध्ये लोकप्रिय आहेत.

जिलब्या गरमागरम असताना किंवा निवल्यानंतर, अश्या दोन्ही अवस्थांमध्ये खाल्ल्या जातात. काहीसा चिवटसर, परंतु काही अंशी कुरकुरीत असा संमिश्र पोत असलेल्या या पदार्थास हाताच्या पंजाएवढ्या विस्ताराच्या अनेक वळ्या किंवा वेटोळी असतात. तेलात तळल्यावर पिठाचा रंग तांबूस-केशरी होतो. या वेटोळ्यांच्या बाह्यावरणावर साखरपाकाचा थर असतो. पदार्थाचा वास व स्वाद खुलवायला या साखरपाकात काही वेळा गुलाबपाणी, केवड्याचा सुगंध, तसेच लिंबाचा रस यांसारखे अन्य घटकपदार्थ मिसळले जाऊ शकतात.

लहान जिलाबी मिळते. जिलबी मठ्ठा बरोबर पण खातात.

जलेबी हे पाकिस्तानमधील एक जुने आणि पारंपारिक खाद्य आहे. लोक धार्मिक आणि विवाह उत्सवांमध्ये याचा आनंद घेतात.

महाराष्ट्रात खूप ठिकाणी २६ जानेवारी व १५ ऑगस्ट ला जिलबि आणि पापडी खातात.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत