जिंजरब्रेड (नाताळ)
जिंजरब्रेड हा नाताळसणाच्या निमित्ताने केला जाणारा मिठाईचा पदार्थ आहे.नाताळ सणाच्या पूर्वी १२ डिसेंबर या दिवशी कुटुंबांमध्ये सर्वानी एकत्र मिळून जिंजरब्रेड हाऊस तयार करणे याला विशेष महत्त्व आहे. [१]
कसा करतात
[संपादन]सुंठ पूड वापरून तयार केलेल्या बिस्कीटांसाठी पीठाचा जो गोळा भिजवला जातो [२]त्या गोळ्याला भिंतींचा, छपराचा आकार देऊन त्यापासून जिंजरब्रेडला घराचा आकार दिला जातो. आयसिंग, गोळ्या, चाॅकलेट यांचा वापर करून हा घराचा आकार सजविला जातो. नाताळ सणानिमित्त केला जाणारा हा पाश्चात्य मिठाईचा प्रकार आहे.
इतिहास
[संपादन]प्राचीन रोम मध्ये या पदार्थाचा इतिहास आढळतो. पदार्थांच्या इतिहासाचे अभ्यासक नोंदवतात की युरोपमध्ये ११ व्या शतकात खाद्यपदार्थ आणि पेय यामध्ये सुंठ पूड वापरायला सुरुवात झाली. सुंठ ही केवळ रुचकर नसून त्यामुळे पाव अधिक काळ टिकायलाही मदत होते. फ्रान्समधील एका आख्यायिकेनुसार असे मानले जाते की इ.स.९९२ मध्ये संत निकोपोलिस यांनी युरोपात ही पदार्थ आणला.फ्रान्स मधील लोकांना त्यांनी हा पदार्थ करायला शिकविले आणि नाताळ सणाच्या गोड पदार्थात जिंजर ब्रेडला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले.[३][१]
आकाराशी संबंधित इतिहास
[संपादन]युरोप मध्ये बेकरी उत्पादक व्यावसायिकातील काही निवडक उत्पादकच जिंजरब्रेड तयार करतात. हा पदार्थ तयार करण्याला व्यावसायिक प्रतिष्ठा लाभली आहे. इसवी सनाच्या सतराव्या शतकात केवळ व्यावसायिक निवडक बेकरी उत्पादकच नाताळ आणि ईस्टर संडे या सणांच्या शिवाय जिंजरब्रेड तयार करू शकत असत. युरोपमध्ये काही विशिष्ट दुकानेच जिंजरब्रेड विकू शकत असत. त्यांना बदाम, चांदणी, सैनिक, लहान मुले, घोडेस्वार, वाद्ये, तलवार आणि प्राणी असे विविध आकार दिले जात असत. रविवार प्रार्थनेच्या दिवशी चर्चच्या बाहेरील दुकानात या पदार्थाची विक्री केली जात असे. विशेष सणांना हा पदार्थ परस्परांना भेट म्हणून दिला जात असल्याने त्याचे सुशोभीकरण केले जाते. विवाहाच्या निमित्ताने हा पदार्थ आलेल्या उपस्थित नातेवाईक मंडळींना वाटला जातो.[४]
आधुनिक काळात
[संपादन]जिंजरब्रेड हा पदार्थ तयार करण्याची परंपरा आधुनिक काळातही सुरू असलेली दिसते.युरोपात विशेषकरून ही परंपरा दिसते.जर्मनीमधे नाताळ बाजार या ठिकाणी या पदार्थाची विशेष विक्री केली जाते.अनेक कुटुंबांमधे नाताळ सणाच्या निमित्ताने घरातच हा पदार्थ तयार केला जातो.आयसिंग, गोड गोळ्या, कँडी यांचा वापर करून सजावट केली जाते. गोठा , घर , कार्यालय, चर्च, संग्रहालय अशा कोणत्याही वास्तूचा आकार जिंजरब्रेडला दिला जातो.[५]
हे ही पहा
[संपादन]चित्रदालन
[संपादन]-
जिंजरब्रेड विक्री दुकान
-
पायऱ्या-आणि झाडे यांनी सुशोभित जिंजरब्रेड घर
संदर्भ
[संपादन]- ↑ १.० १.१ "Gingerbread House Day 2020: Step-by-Step Recipe And Design to Make Confectionery Shaped Like Cute Homes For the Festive Season (Watch Video) | 🍔 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2020-12-12. 2020-12-19 रोजी पाहिले.
- ↑ "Ring in Christmas early with these gingerbread cookies (recipe inside)". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-12-18. 2020-12-19 रोजी पाहिले.
- ↑ "What is the history of gingerbread? - eNotes.com". eNotes (इंग्रजी भाषेत). 2020-12-16 रोजी पाहिले.
- ↑ Volk, A. M. Steve (2018-10-24). The Baker’s Craft: A Short History (इंग्रजी भाषेत). iUniverse. ISBN 978-1-5320-6026-7.
- ↑ Harano, Lauren (2020-12-18). "Bake the World a Sweeter Place With These Gingerbread House Decorating Ideas". POPSUGAR Family (इंग्रजी भाषेत). 2020-12-19 रोजी पाहिले.