चहा

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search
भारतीय चहा

'चहा' हे एक पेय आहे. चहा विविध प्रकारे केला जातो. गरमपेय पाणी आणि चहाची पावडर यांचे मिश्रण उकळून तयार केले जाते. त्यात दुध, साखर तसेच घातली जाते.

जगभरात खूप मोठ्याप्रमाणात चहा हे पेय प्यायले जाते. प्रत्येक भागात थोडे फार बदल पहायला मिळतात. एकूणच चहाची वाळवलेली पाने फक्त दुधात/ फक्त पाण्यात उकळणे ही मुख्य कृती आहे. ह्या जोडीला साखर,लिंबाचा रस किंवा दुध,साय घातली जाते. यातील सर्वसामान्य भारतीय पद्धतीच्या चहाची कृती पाहू.

चहा
वेळ १०-१५ मिनिटे
काठीण्य पातळी

लागणारे साहित्य[संपादन]

  • १ कप पाणी
  • १ कप दुध
  • १ चमच चहा पूड
  • २ चमचे साखर

कृती[संपादन]

  • सर्व प्रथम एका लहान पातेल्यात १ कप पाणी,२ चमचे साखर व १ चमच चहा पूड घालावी.
  • मध्यम आचेवर हे मिश्रण ५-७ मिनिटे उकळून घ्यावे.
  • या मिश्रणात १ कप दुध घालावे.
  • मिश्रण उकळू द्यावे.
  • चहा उतू जाणार नाही, याची काळजी घ्या.
  • चहा पिण्याकरता तयार आहे.