Jump to content

चकली

विकिबुक्स कडून
चकली
वेळ मिनिटे
भाजणीपासून बनवलेली चकली

चकली हा विशेषकरून दीपावलीमध्ये केला जाणारा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ चकली भाजणीपासून बनवतात.

चकली बनविण्यासाठी तांदूळ, पोहे, उडीद डाळ व चणाडाळ इत्यादी घटकपदार्थ भाजून चकलीची भाजणी बनवली जाते. या भाजणीत काही वेळा जिरेधणेही घातले जातात. काही ठिकाणी ही सर्व धान्ये धुवून वाळवतात आणि मग भाजतात. गरम पाण्यात तीळ , तिखट, मीठ, थोडी हळद आणि तेल किंवा लोणी घालून त्यात भाजणी घालून दोन तास झाकून ठेवली जाते. नंतर हलक्या हाताने मळून या गोळ्यांपासून सोर्‍या किंवा चकलीचे यंत्र वापरून चकल्या पाडतात व त्या गरम तेलात तळतात. खायला कुरकुरीत असणारा हा पदार्थ फराळ म्हणून ओळखला जातो.

चकली हि मैद्याची पण करतात. हि चकली पण चवीला छान लागते.

चित्रदालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत