ग्रंथालयशास्त्र
शिक्षण आणि पात्रता
[संपादन]आधुनिक शिक्षणात आधुनिक ग्रंथालय व माहिती शास्त्रज्ञास संगणक; तसेच आंतरजालाचा योग्य वापर , ग्रंथालयातील कामकाजासाठी योग्य संगणक प्रणाली वापरणे या तांत्रिक कौशल्यांबरोबरच वाचकांच्या माहितीच्या बदलत्या व गुंतागुंतीच्या गरजांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून माहितीचे संकलन व विश्लेषण करून ती तत्काळ पुरविणे ही कौशल्ये महत्त्वाची मानली जातात. या मध्ये बी.लिब. एस्सी. व एम.लिब.एस्सी. असे अभ्यासक्रम आहेत. ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स कोर्स) पारंगत होण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक असते. या नंतर ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)चा एका वर्षाचा कोर्स करून मास्टर कोर्स करता येतो. त्यानंतर आवडीनुसार उच्च शिक्षण पीएचडी किंवा एमफील घेता येते. यामध्ये डिप्लोमा आणि सटिर्फिकेट कोसेर्सही उपलब्ध असतात. यामध्ये लायब्ररी सिस्टिम मॅनेजमेण्ट, वगीर्करण पद्धती, बिबिलिओग्राफी, डॉक्युमेण्टेशन अशा गोष्टी शिकवल्या जातात.
पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम
[संपादन]साचा:जाहिरात पुणे विद्यापीठातील हा पदव्युत्तर अभ्यासक्रम हा एक इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम आहे. हा चार सत्रात पूर्न होतो. त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे.
स्वरूप
[संपादन]सत्र पहिले
- ग्रंथालये- इतिहास व प्रकार.
- ग्रंथालयशास्त्री मूलतत्वे- संप्रेषणाची या शास्त्रातील महत्त्व
- माहितीशास्त्र- आंतरविद्याशाखीय स्वरूप.
- माहितीचे स्रोत व वाचकांच्या गरजांचा अभ्यास
- संगणकशास्त्र- संगणकाची व इंटरनेटची ओळख, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर.
- ग्रंथालयाचे विविध विभाग व त्यांचे व्यवस्थापन या खेरीज प्रथम सत्रात इंग्रजी संवाद कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला जातो.
सत्र दुसरे
- ज्ञान साधनांचे वर्गीकरण व तालिकीकरण
(तात्विक व प्रात्यक्षिक)
- संदर्भ सेवा- विविध संदर्भ साधने व त्यांचा प्रत्यक्ष वापर
- माहिती केंद्रे व संस्था
- माहिती / ज्ञानाचे व्यवस्थापन व धोरण
- ग्रंथालयांचे संगणकीय जाळे (ङळलीरीू पशीुींज्ञी)
सत्र तिसरे
- संशोधन- प्रकार व पद्धती
- ग्रंथालय व माहितीशास्त्रातील आधुनिक संशोधन तंत्रे
- ग्रंथालयाचे संगणकीकरण
- इंटरनेटवरून माहिती शोधण्याची आधुनिक तंत्रे व कौशल्ये
- डिजिटल ग्रंथालये, कंटेंट मॅनेजमेंट, वेब पेज डिझाइनिंग इ.
सत्र चौथे
- माहितीचे परिप्रेषण, इंडेक्सिंग, अब्स्ट्रक्टिंग, शब्दकुलकोश
- आधुनिक ग्रंथालये / माहिती केंद्राचे व्यवस्थापन व्यवस्थापनाची मूलतत्वे, प्लानिंग, बजेटिंग, मार्केटिंग, मनुष्यबळ विकास इ.
- व्यवस्थापनाची आधुनिक तंत्रे-
- मॅनेजमेंट ऑफ चेंज, टीक्यूएम, सिक्स सिग्मा इ.
- पूर्व अभ्यासित ज्ञानाचा यथोचित वापर करून प्रकल्प / शोधनिबंध.
- या व्यतिरिक्त विविध माहिती प्रणाली, मल्टी मीडिया विकसन, ग्रंथालय व माहितीशास्त्रासाठी प्रशिक्षित शिक्षक विकसन यापैकी एक वैकल्पिक विषय.