Jump to content

गोडांबा

विकिबुक्स कडून
गोडांबा
वेळ २०-२५ मिनिटे
काठीण्य पातळी

मुरंबा/गुळंबा/गोडांबा-एक आंबट-गोड पदार्थ

लागणारे साहित्य -[संपादन]

 • कैरीचा किस- १ वाटी,
 • बारिक चिरलेला गुळ -१ वाटी,
 • वेलची पुड - २ चमचे,
 • चवीपुरते मीठ

(हवे असल्यास घरचे तिखट-१ चमचा)

कृती-[संपादन]

 • सर्वप्रथम कढई मंद आचेवर ठेवावी,त्यात चिरलेला गुळ घालावा.
 • गुळाला पाणी सुटू लागल्यावर त्यात कैरीचा किस घालावा.
 • कैरी व गुळाचे प्रमाण साधारण एकसारखे असावे, आपण कमी गोड खात असल्यास एक चतुर्थांश गूळ कमी घालावा.
 • वरील मिश्रणात दोन चमचे वेलची पुड घालावी. चवीपुरते मीठ घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
 • थोडा तिखटपणा हवा असल्यास घरचे तिखट १चमचा घालावे.
 • साधारण ह्या कृतीस १०-१२ लागतील.
 • एका हवाबंद डब्यात काढुन फ्रिजमध्ये अर्धा ता सेट करायला ठेवावे.
 • आता गोडांबा तयार आहे. साधरण पोळी बरोबर किंवा पुर्ण जेवणाबरोबर आपण पानात वाढू शकतो.