गाजर हलवा

विकिबुक्स कडून
गाजर हलवा
वेळ मिनिटे
गाजर हलवा

गाजर हलवा हा एक भारतीय खाद्यपदार्थ आहे. यासाठी गाजर आणि दूध वापरले जाते.हा एक गोड पदार्थ आहे.

साहित्य:-

  • किसलेले गाजर: २ कप
  • दूध: ३ कप
  • वेलदोडा पुड: १/२ टी स्पून
  • साखर: १/२ कप (चविनुसार)
  • तूप: २ टेबल स्पून
  • बारीक कापलेले काजू आणि बदाम: २ टेबल स्पून , बेदाणे: १ टेबल स्पून


कॄती:

  • एका जाड बुडाच्या भांड्यामधे दुध गरम करायला ठेवा. अधून मधून दूध हलवत रहा. हे दुध जितके जास्त आटवता येईल तितके आटवायचे आहे.
  • गाजर किसून घ्या.
  • एका वाटीत दुध घेऊन त्यात काजु, बदाम, बेदाणे भिजायला ठेवा.
  • एका भांड्यामधे तूप गरम करा. ह्या तुपात किसलेले गाजर ४-५ मिनिटे परतून घ्या.
  • गाजर थोडे शिजल्यावर त्यात आटवलेले दूध घाला. दूध आटेपर्यंत हे गाजर शिजवा.
  • नंतर त्यात साखर, काजू, बदाम, बेदाणे, वेलदोडा पुड घाला आणि सगळे नीट एकत्र करा व हा हलवा अजून ४-५ मिनिटे शिजवा.