कैरीची डाळ

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

साहित्य: चणा/हरभरा डाळ, मीठ, तेल, मोहरी, जिरे, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, इत्यादी

कैरीची डाळ हा अगदी सोपा आणि चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. यासाठी प्रथम हरभरा/चणा डाळ तीन ते चार तास भिजत घालायची. डाळ चांगली भिजली का याची खात्री करून झाल्यावर हि डाळ मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यायची. दुसऱ्या बाजूला कैरी सोलून किसून घ्यावी. वाटलेली डाळ आणि कैरी एकत्र करून घ्यावे.यात चवीनुसार मीठ घालावे. गॅसवर कढई मध्ये गोडे तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे घालावे. मोहरी तडतडली कि त्यात मिरचीचे तुकडे आणि गोडलिंब घालावा. गरम गरम फोडणी एकत्र केलेल्या डाळ आणि कैरीच्या मिश्रणावर घाला. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी. कैरीची डाळ तयार.