कांदे पोहे
कांदे पोहे | |
---|---|
वेळ | मिनिटे |
कांदे पोहे किंवा पोहे हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा बहुतेक वेळा संध्याकाळी किंवा कुणी पाहुणे आले तेव्हा नाश्ता म्हणून खाल्ला जातो.
साहित्य :
- जाड पोहे
- चिरलेले कांद्याचे काप
- चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- हळद
- मोहरी, जिरे
- खाद्यतेल / गोडेतेल
- मीठ
- शेंगदाणे
पूर्व तयारी :
पोहे करण्या अगोदर पोहयांचे दोन प्रकार असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे.
१} जाड पोहे
२} पातळ पोहे
पाककृती
[संपादन]पोहे निवडून व पाण्याने भिजवून रोळी मध्ये काढून घ्यावे म्हणजे पाणी निथळून जाईल. जाड पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}जास्त मारावा लागतो. आणि पातळ पोहे भिजवण्यासाठी पाण्याचा हबका{प्रमाण}कमी मारावा लागतो.
कढई मध्ये तेल टाकुन त्यात मोहरी/जिरे टाकावे. तडतडल्यानंतर त्यात चिरलेले कांद्याचे काप टाका व नंतर थोड्यावेळाने त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका. मिरच्या थोड्या पांढुरक्या झाल्यावर नंतर हळद व भिजवलेले पोहे टाका. हळदीचा समान रंग येईपर्यंत परता.
सजावट :
खायला देताना कोथिंबीर व खोबऱ्याचा किस टाकुन द्यावे. आणि त्यावर मिरची चे बारीक काप टाकुन घ्या.
इतर माहिती:
- कांद्याचे प्रमाण थोडे कमी करून त्यात उकडलेले/कापा करून थोडे तळलेले बटाटे घातल्यास हे आलूपोहे होतात.
- पोहे तयार करताना तुमच्या आवडीनुसार त्यात शेंगदाणे, बटाटा किंवा हिरवा वाटणे ही घालू शकता. कांद्याबरोबर या गोष्टी परतून घ्या.