कलाकंद
Appearance
कलाकंद | |
---|---|
वेळ | २०-२५ मिनिटे |
काठीण्य पातळी |
कलाकंद हा भारतातील, विशेषत: देशाभरात विविध भागात, विविध बदल करुन तयार केला जाणारा खाद्यपदार्थ आहे. भारतीय उपखंडात पाकिस्तान व बाग्लांदेशात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. बेळगावी कुंदा आणि बेळगावी कलाकंद प्रसिद्ध आहेत.
लागणारे साहित्य -
[संपादन]- ३/४ कप फाटलेले दुध
- ८ चमचे दुधाची भुकटी
- १/२ कप मलई
- १/४ कप साखर
- १०-१२ बदाम, पिस्ते
- १/२ चमच वेलची पूड
- चांदीचा वर्ख
कृती-
[संपादन]- एका भांडयात फाटलेले दुध, साखर,मलई आणि वेलची पूड यांचे मिश्रण करुन घ्यावे.
- वरिल मिश्रण १०-१५ मिनिटे मंद आचेवर ढवळत राहावे.
- मिश्रण खाली लागणार नाही तसेच मिश्रण उतू जाणार नाहीयाची काळजी घ्यावी.
- मिश्रण चांगले घट्ट होऊ द्यावे.
- आता एका बशीत थापून, ठंड होण्याकरता ठेऊन द्यावे.
- बर्फीच्या आकारत कापून घ्या, सजावटीसाठीवरुन चांदीचा वर्ख, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे तुकडे घालावेत.
- कलाकंद खाण्यास तयार आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |