उकडलेल्या कैरीचे पन्हे

विकिबुक्स कडून

साहित्य: एक मोठ्ठी कैरी (साधारण ४५० ग्रॅम), दुप्पट साखर, चवी पुरते मीठ, वेलची पूड, केशर साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील घालू शकता.

कृती: १) कैरीचे साल काढून घ्यावे. सगळा हिरवा भाग काढावा. नंतर ती कैरी cooker मध्ये ३ शिट्या होईपर्यंत वाफवावी. २) कैरी गार झाली की त्याचा गर काढावा व mixer च्या भांड्यात घालावा. साखर आणि थोडेसे पाणी घालावे व mixer वर वाटून घ्यावे. ३) कैरीच्या paste मध्ये चवीनुसार मीठ घालावे. स्वादाला वेलची पूड घालावी आणि परत एकदा mixer वर वाटून घ्यावे. ४) हा झाला concentrated pulp तयार! fridge मध्ये हा pulp छान टिकतो. पन्हे बनवायचे असेल त्या वेळी २ मोठे चमचे pulp glass मध्ये घ्यावा आणि त्यात तिप्पट गार पाणी घालून चमच्याने ढवळावे. त्यात केशराच्या काड्या घालाव्यात आणि serve करावे.

काही महत्त्वाचे: १) कैरीची साल पूर्णपणे काढून घ्यावी. कैरीला जर साल राहिली तर ती mixer वर नीट वाटली जात नाही. २) कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे किंवा गूळाचे प्रमाण कमीजास्त करावे.