आळूवडी
Appearance
आळूवडी | |
---|---|
वेळ | ४५ मिनिटे |
काठीण्य पातळी |
आळूवडी
आळूवडी हा महाराष्ट्रीय व गुजराती थाळीतील एक रुचकर गोड पदार्थ होय.
लागणारे साहित्य :
[संपादन]- आळूची पाने
- बेसन
- चिंचेचे पाणी
- तिखिट
- हळद
- मीठ
- साखर
- खाद्यतेल
- पांढरे तीळ
- ओवा
कृती :
[संपादन]- सर्व प्रथम आळूची पाने धुऊन, पानाच्या शिरा काढून घ्याव्या.(आळूची पाने हाताळताना हातना खाज येण्याची शक्यता असते काळजी घ्यावी.)
- एका भांड्यात २ वाट्या बेसन, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ कप चिंचेचे पाणी (ह्या ऐवजी लिंबाचा रस घेतला तरी चालेल), पांढरे तीळ, साखर, चवीपुरते मीठ, चिमूठभर ओवा मिश्रण एकजीव करुन घ्यावे, मिश्रणात १/२ कप पाणी घालावे.
- वरील मिश्रण हाताने पानाच्या मागे लावावे. एकावरएक अशी किमान २-३ पाने अश्याच प्रकारेकरुन गोल विडा करुन घ्यावा.
- एका पातेल्यात पाणी घ्यावे. त्यावर एक चाळणीत पातळ फडके घेऊन विडे ठेवावेत. आता एक झाकण ठेऊन साधारण (१५-२०मिनिटे) मोदकाप्रमाणे वाफवून घ्यावे.
- अलगद विडे काढून घ्यावेत, त्याचे गोल काप करुन घ्यावेत व कमी आचेवर तळून घ्यावेत.
- त्यावर कोथिंबिर, खोबर्याचा किस घालून पानात वाढावे.
- आळूवडी खाण्यास तयार आहे.