अळीवाचे लाडू

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

साहित्य[संपादन]

कृती[संपादन]

२ नारळ खरवडून घ्यावेत, अळीवात बारीक खडे असतात, अळीव स्वच्छ निवडून नारळामध्ये मिसळून एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्यात ३-४ तास झाकून ठेवावे. अळीव नारळाच्या ओलसरपणामुळे फुलून आले की त्यात जिरलेला गूळ व साखर घालावी व गॅसवर मंद आचेवर शिजायला ठेवावे. मधून मधून ढवळावे, लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागते. गॅस बंद करून मिश्रण कोमट असतांना तूपाचा हात लावून लाडू वळावेत. वरील साहित्यात मध्यम आकाराचे १५ लाडू होतात. हे लाडू जास्त टिकत नसल्याने एकावेळी जास्त प्रमाणाचे करू नयेत.

संदर्भ[संपादन]

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/dinkacheyladoo