अडकित्ता

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

अडकित्ता हे दुहेरी तरफेचा वापर असलेले, सुपारी कातरण्याचे वा फोडण्याचे हत्यार, हे एक सुपारी कापण्याचे प्राथमिक प्रकारचे सोपे हस्तचालित यंत्र आहे. हे यंत्र पितळेचे किंवा लोखंड अथवा स्टीलचे असते.[१] लातूर तालुक्यातील मौजे तांदुळजा येथील कारागिरांचे अडकित्ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तांबूल सेवन करणा-या साहित्यातील अडकित्ता हा महत्त्वाचा भाग असून सुपारी कातरण्यासाठी अडकित्त्याचा वापर होतो. ग्रामीण भागात बैठकीमध्ये पाहुण्यांसाठी पानपुडा ठेवला जातो. त्यामध्ये पान, बडिशेप, लवंगा, सुपारी, कात यांबरोबर सुपारी कातरण्यासाठी अडकित्ता देखील असतो. साचा:चित्रहवे अडकित्त्याला दोन पाती असतात. त्यातील वरची पाती धारदार असते आणि खालच्या पाटीवर सुपारी ठेवली जाते. आजच्या काळात पानात दिसणारी सुपारी कमी झाल्याने अडकित्त्याचा वापर कमी झाला आहे. [२]

संदर्भ[संपादन]

  1. "संग्रहालय | थिंक महाराष्ट्र!". www.thinkmaharashtra.com. 2020-01-02 रोजी पाहिले.
  2. https://www.esakal.com/maharashtra/story-adkitta-murud-village-latur-district-327332