मिष्टी दोई

विकिबुक्स कडून

मिष्टी दोई (बांग्ला: মিষ্টি দই) हा एक गोड दह्याचा प्रकार असून हा पदार्थ खास बंगाली मिष्टान्न म्हणून ओळखला जातो.

पाककृती[संपादन]

साहित्य:-

  1. एक लिटर दुध (शक्यतो भारतीय गाईचे किंवा म्हशीचे)
  2. ३०० ग्रॅम साखर
  3. विलायची पूड

कृती :-

  • प्रथम एका पसरट भांड्यात दूध उकळायला ठेवणे. दूध उकळत असताना सतत ढवळत राहावे. अर्धे दूध उकळले की अंदाजे अर्धी साखर (१५०ग्रॅम) त्यात मिसळणे. आता हे दूध गॅस वरून खाली उतरवणे.
  • दुसरे पातेले गॅस वर ठेऊन त्यात उर्वरित साखर टाकणे. मंद आचेवर साखर काळजीपूर्वक ढवळणे. हळूहळू साखर पातळ होऊन तिचा रंग तपकिरी व्हायला लागतो. याला कॅरॅमल असे म्हणतात.
  • हे पातेले गॅस वरून खाली उतरवून त्यातील पातळ साखर दुधात ओतणे आणि चांगले ढवळणे. साखरेचे खडे झाले तरी ते हळूहळू विरघळेपर्यंत दूध सतत ढवळत राहावे. थोडे दूध साखरेच्या पातेल्यात ओतून ती साखर पण विरघळून घेणे.
  • आता दूध थंड करायला ठेवणे. हलके कोमट असताना त्यात अर्धा कप ताजे दही मिसळणे आणि चांगले फेटणे.
  • हे सर्व दूध ५ मातीच्या कपात किंवा साध्या कपात ओतून झाकून कपाटात ठेवणे. १२ तासात त्याचे गोड दही (मिष्टी दोई) तयार होते. यात पाहिजे असल्यास विलायची पूड घालून हे दही फ्रीजमध्ये ठेवणे. ३/४ तासात थंडगार सर्व करणे.
  • यात साखरेच्या कॅरॅमल ऐवजी ब्राऊन शुगर किंवा गुळाची काकवी पण वापरू शकता. फक्त काळजी एवढी घेणे की काकवी ही दूध कोमट-थंड झाल्यावर त्यात मिसळणे.