Wikibooks:मुखपृष्ठ विशेष अंक ३

Wikibooks कडून

[संपादन] "शुध्द बीजापोटी| फळे रसाळ गोमटी||"

"शुध्द बीजापोटी| फळे रसाळ गोमटी||" बालमन हे कोवळे असते त्यावर जे संस्कार आपण करू तेच संस्कार त्याचा भावी काळ ठरवीत असतात. हे वय सुसंस्कारित करणें हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच वयांत जाणिवेंतून 'श्रवण' घडले तरच बालमन सुसंस्कारित होईल.

"सुसंगती सदा घडो | सुजन वाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो | विषय सर्वथा नावडो ||" सुसंगती लाभण्यासाठी जा सदगुरूशी शरण. सदगुरूंमुळे आपल्याला श्रवणाचा लाभ घडतो. त्यांतूनच आपल्या अंत:करणात सर्वांविषयी प्रेमभाव जागृत होतो. आपली कर्तव्ये काय आहेत याची आपणास ओळख होत. सदगुरूंविषयी सादर समर्पणाची भूमिका बालपणापासूनच निर्माण झाली की तो बालक आई वडिलांनाही आदरपूर्वक वागवील, गुरूजनांचा, आचार्यांचा अनादर करणार नाही. आलेले आतिथी, पाहुणे, आपल्यापेक्षा वयाने व मानानें वडीलधारी असणा-या मंडळीना तो प्रेमानें जिंकेल. या वयातच हे संस्कार ' बालभक्ती मार्गदर्शनाच्या ' स्वरूपात घाडणार आहेत. मार्गदर्शन करणारा सदगुरू आहे.

बालमनावर विषयांचा पगडा एकदा बसला की त्यातून ते सगुण बाहेर पडणे मुष्किल! म्हणून सदगुरूंची उपासना या वयात झाली आणि सदविचार व सदाचाराची बीजे या वयांतच पिंडात पेरली तर --- "शुध्द बीजापोटी| फळे रसाळ गोमटी||" पिंडामध्ये पेरणीच सत्वगुणाच्या संवर्धनाची केली तर सत्वगुणें उत्त्मगती प्रत्येकाला मिळ्णार हे निश्चित आहे. आपल्याला जे जे सगुण भेटेल, ते भगवंत स्वरूप आहे ही संकल्पना रूजण्यासाठी बालवयांतच सदबुध्दीची जागृती केली पाहिजे. सत्कर्म आचाराचा पाया बालमनामध्ये याच वयात दृढ़ झाला तर त्यांचा भावी काळ ऐश्वर्यसंपन्न नीति-संपन्न व चारित्र्यसंपन्न होणार आहे यावर विश्वास ठेवून, सदगुरू आज्ञेने नित्यनेमाने उपासना करून आपले जीवन कृतार्थतेने व कृतज्ञभावाने सदगुरूंस सादर समर्पण करण्याची प्रतिज्ञा घेवू या.

मुलांना शिकवण

बरें सत्य बोला यथातथ्य चाला | बहू मानिती लोक तेणें तुम्हांला | धरा बुध्दि पोटीं विवेकी मुलें हो | बरा गुण तो अंतरामाजि राहो ||१||
बरे दांत घांसोनि तोंडा धुवावें | कळहीन घाणेरडे बा नसावे | सदा सर्वदा यत्न सांडू नको रे | बहूसाल हा खेळ कामा न ये रे ||२|| 
दिसांमाजि कांहीतरी तें लिहावें | प्रसंगे अखंडीत वाचीत जावें | वयें श्रेष्ट रे दास्य त्यांचें करावे | बरें बोलणे सत्य जीवीं धरावें ||३||
बहु खेळ खोटा सदालस्य खोटा | समस्तांसि भांडेल जो तोचि खोटा | बहुतां जणांलागि जीवें झिजावें | भलें सांगती न्याय तेथें भिजावे ||४||
हिशेबीं सदा न्याय सांडूं नका रे | कदाचीत अन्याय होतां धका रे | जनी सांडितां न्याय रे दु:ख होतें | महासूख तेंही अकस्मात जातें ||५||
प्रचीतीविणें बोलणे व्यर्थ वायां | विवेकेंविणें सर्वहि दंभ जाया | बहू सज्जला नेटका साज केला | विचारेंविणे सर्वही व्यर्थ गेला ||६||
वरी चांगले अंतरी गोड नाहीं | तया मानवाचें जिणे व्यर्थ पाहीं | वरी चांगले अंतरी गोड आहे | तयालागि कोणी तरी शोधिताहे ||७||
सदा अंतरी गोड तें सांडवेना | कदा अंतरी वोखटे तें खपेना | म्हणोनी बरा गूण आधीं धरावा | महाघोर संसार हा नीर्सावा ||८||
भला रे भला बोलती तें करावें | बहुता जनांच्या मुखें यश घ्यावें | पुढे शेवटी सर्व सोडूनि द्यावे | मरावें परी कीर्तिरूपें उरावें ||९||
बरा वोखटा सर्व संसार झाला | अकस्मात येंईल रे येमघाला | म्हणोनी भले सांगती सत्य चाला | जनी दास तो शीकवीतो मुलांना ||१०||

--Vipinpalkar ०३:४७, १८ नोव्हेंबर २००८ (UTC)

वैयक्‍तिक साधने