गाथा ६०१ ते ९००

Wikibooks कडून

601

एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥1॥

अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥ अनुतापें स्नानविधि । यYासििद्ध देहहोम ॥2॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥3॥

602

त्रैलोक्य पािळतां उबगला नाहीं । आमचें त्या काइऩ असे ओझें ॥1॥

पाषाणाचे पोटीं बैसला ददुऩर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥ पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥2॥ तुका ह्मणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥3॥

603

बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥1॥

कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ध्रु.॥ टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घांटी ॥2॥ तुका ह्मणे तो केवळ पुंड । त्याजवरी यमदंड ॥3॥

604

दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥1॥

हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥ तुह्मी पापा भीतां । आह्मां उपजावया चिंता ॥2॥ तुका ह्मणे सेवा । किळकाळा जिंकी देवा ॥3॥

605

करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥1॥

वृित्त राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥2॥ तुका ह्मणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥3॥

606

मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥1॥

मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥ दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥2॥ तुका ह्मणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥3॥

607

सुख वाटे तुझे वणिऩतां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥1॥

व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ध्रु.॥ वृक्षाचिया माथां सोडिला ससाना । धनुष्यासि बाणा लावियेलें ॥2॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । धांवें गा श्रीपती मायबापा ॥3॥ उडोनियां जातां ससाना मारील । बैसतां विंधील पारधी तो ॥4॥ ऐकोनियां धांवा तया पिक्षयांचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥5॥ डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥6॥ ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥7॥ तुका ह्मणे तुझी कीतिऩ त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥8॥

608

नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनादऩना ॥1॥

देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥ भोगी भोगविता। बाळासवें तो चि पिता ॥2॥ कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥3॥

नाटाचे अभंग समाप्त 63 609

प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोडवीं कथा। मति सौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥1॥

तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें । मारग सिद्धाच्यानि पंथें। पावविसी तेथें तूं चि एक ॥ध्रु.॥ आरंभा आदि तुझें वंदन । सकळ करितां कारण । देव ॠषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥2॥ काय वणूप तुझी गती । एवढी कैची मज मती । दिनानाथ तुज ह्मणती । करी । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥3॥ मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं । तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका ह्मणे ॥4॥

610

प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वणिऩतां ॥1॥

तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घाग†या घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥2॥ नटारंभी थाटियला रंग । भुजा नाचवी हालवी अंग। सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥3॥ जया मानवतीदेव ॠषि मुनी । पाहातां न पुरें डोिळयां धनी । असुर जयाच्या चरणीं। आदीं अवसानीं तो चि एक ॥4॥ सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥5॥

611

विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥1॥

विठ्ठल कुळींचें दैवत। विठ्ठल वित्त गोत । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥2॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥3॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥4॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥5॥

612

बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥1॥

बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥ बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥2॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥3॥ जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥4॥ आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी। तुका ह्मणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुस†याची ॥5॥

613

मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥1॥

नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥ केला करविला नाहीं उपकार। नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार। वाहिला भार कुटुंबाचा ॥2॥ नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पािळला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥3॥ असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥4॥ आप आपण्या घातकर। शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर। उतरीं पार तुका ह्मणे ॥5॥

614

आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥1॥

जवळी विठ्ठल रखुमाइऩ । बहिणी बंधु बाप आइऩ । सकळ गोताची च साइऩ । पारिखें काइप ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥ जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दु†हावली ॥2॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥3॥ सोसिला होता सासुरवास। बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥4॥ करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोेले बोबडें पुढें तुका ॥5॥

615

सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुHी यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेिष्टला जीव माझा ॥1॥

माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥ काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥2॥ मज चालतां प्रयाणकाळीं। असतां न दिसती जवळी । मृित्तके मृित्तका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥3॥ आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥4॥

616

अगा ए सावऑया सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विYाापना । सांभाळी दीना आपुलिया ॥1॥

बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ध्रु.॥ जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥2॥ येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसे चि ना ॥3॥ जीवित्व वेचलों वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥4॥ माझा मीं च जालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्ग‍ु तुका ह्मणे ॥5॥

617

आतां मज धरवावी शुिद्ध । येथुनी परतवावी बुिद्ध । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥1॥

करिसील तरि नव्हे काइऩ । राइऩचा डोंगर पर्वत राइऩ । आपुले करुणेची खाइऩ। करीं वो आइऩ मजवरी ॥ध्रु.॥ मागील काळ अYाानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥2॥ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथें म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥3॥ करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा। सोडवीं भ्रमापासुनिया ॥4॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका ह्मणे ॥5॥

618

जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाइऩन गुण तयाचे ॥1॥

जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥ जो या असुरांचा काळ । भHजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥2॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥3॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥4॥ जयाचे नाम पाप नासी । लIमी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥5॥

619

काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुह्मी सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥1॥

काय हें खंडइऩल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । ह्मणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥ काय हो िस्थर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाइऩल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥2॥ काय ऐसें पुण्य होइऩल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कृवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥3॥ काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥4॥ ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका ह्मणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥5॥

620

तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥1॥

संतसंगति देइप चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥2॥ मज भाव प्रेम देइऩ कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं । विनंती माझी परिसावी हे ॥3॥ आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपित्तराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भHीविण मायबापा ॥4॥ जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं व्यथा मायबापा ॥5॥

621

सेंदरीं हें देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥1॥

आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देइऩल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुिद्ध अधरा ॥ध्रु.॥ दासीचा पाहुनरउखतें। धणी देइऩल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शिHहीन ॥2॥ काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥3॥ विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड। ऐसियास भांड ह्मणे देव तो ॥4॥ तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनादऩनष । तुका ह्मणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥5॥

622

विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥1॥

कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥ बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें जालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होइऩल भेटी जन्मासी ॥2॥ जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारंबळे भूकतान ॥3॥ एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य। न करिती नित्य नामस्मरण ॥4॥ तुका ह्मणे न वेंचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचितां फुकाचे चि बोल। केवढें खोल अभागिया ॥5॥

623

आले हो संसारा तुह्मी एक करा । मुिHमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥1॥

नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥2॥ नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥3॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोइप । अिग्नस्तंभीं बाही कवटाळविती ॥4॥ देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती। लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥5॥ तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥6॥ ह्मणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भिHरस तुका ह्मणे ॥7॥

624

न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा। तुज मी नाहीं घालीत गोवा । भीड केशवा कासयाची ॥1॥

उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥2॥ दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशिH टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥3॥ ह्मणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥4॥ तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजें एथूनि वचन । हा चि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं ह्मणे तुका ह्मणे ॥5॥

625

आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥1॥

न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥2॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥3॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारिस्थती । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥4॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका ह्मणे ॥5॥

626

आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥1॥

शरण आलों नेणतपणें । भाव आणि भिH कांहीं च नेणें । मतिमंद सर्वYाानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥ मन िस्थर नाहीं माझिये हातीं। इंिद्रयें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युHी । शांति निवृित्त जवळी नाहीं ॥2॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥3॥ राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका ह्मणे यास तुझें उचित ॥4॥

627

देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु। जीवनसििद्ध साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥1॥

शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥ भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥2॥ नेणें भाव परि ह्मणवीं तुझा । नेणें भिH परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥3॥ तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां। न भीं सर्वथा तुका ह्मणे ॥4॥

628

कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥1॥

प्रथम केला गभाअ वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥2॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा। वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥3॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौ†याशीं घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥4॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी। तुका ह्मणे करीं कृपा आतां ॥5॥

629

सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥1॥

ह्मणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥2॥ ऐसा हा कळला निर्धार। मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाहए अभ्यंतर मजजवळा ॥3॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुिHमुिH जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आह्मांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥4॥ जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आह्मां आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका ह्मणे ॥5॥

630

देवा तूं आमचा कृपाळ । भिHप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥1॥

तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥2॥ आह्मां भय चिंता नाहीं धाक जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥3॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वणूऩ कीर्ती तया सुखा ॥4॥ तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका ह्मणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आह्मां ॥5॥

631

न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बिळवंता सांपडलों ॥1॥

बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघडएा नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ध्रु.॥ तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां । जाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥2॥ अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया टाकइऩल छाय । उरइऩल हाय रातिकाळीं ॥3॥ होइऩल संचिताची सत्ता। अंगा येइऩल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां। बहुत चिंता प्रवर्तली ॥4॥ ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका ह्मणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥5॥

632

आतां धर्माधमाअ कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥1॥

येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी। मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीतिऩ हे जगे वाणिजेते ॥2॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥3॥ येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥4॥ केली आराणुक सकळां हातीं। धरावें धरिलें तें चित्तीं । तुका ह्मणें सांगितलें संतीं। देइप अंतीं ठाव मज देवा ॥5॥

633

बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥1॥

दिलीं इंिद्रयें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥2॥ ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांइऩ होऊं उतराइऩ। येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आइऩ पांडुरंगे ॥3॥ फेडियेला डोिळयांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥4॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा। तुका ह्मणे भिडा भHीचिया ॥5॥

634

अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोिळलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥1॥

किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मिळलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार। गेला अंतपार ऐसें नाहीं ॥ध्रु.॥ विविध कर्म चौ†याशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥2॥ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । यें भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥3॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळीं दूर होती खलाळीं ॥4॥ ह्मणोनि नासावें अYाान । इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनादऩन । धरूनि चरण तुका विनवी ॥5॥

635

ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥1॥

जनादऩना जगजीवना। विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ध्रु.॥ चक्रपाणी गदाधरा । असुरमदऩना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥2॥ मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाटएकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥3॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा। करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥4॥ कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय जीवावेगळे न करी तुका ॥5॥

636

होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥1॥

धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥ मज तों पडियेली होती भुली। चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृिष्ट उघडली बरें जालें ॥2॥ आतां हा सििद्ध पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव । ऐसी तुह्मां भाकीतसें कींव । कृपाळुवा जगदानिया ॥3॥ कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं। केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥4॥ कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥5॥

637

तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा। भवतारका जी सुजाणा । एक विYाापना पायांपाशीं ॥1॥

काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भHीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥ न लवीं आणीक कांहीं पिसें। माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥2॥ तुज समपिऩली काया । जीवें भावें पंढरीराया। सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥3॥ चतुर तरीं चतुरां रावो । जाणता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव। आरुष भाव परि माझा ॥4॥ होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल । आदरा ऐसें पाविजे मोल । तुका ह्मणे साच फोल तूं जाणसी ॥5॥

638

कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥1॥

पाप बिळवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥2॥ काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन। कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥3॥ आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥4॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका ह्मणे आतां होइप प्रगट ॥5॥

639

मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूतिऩमंत । ह्मणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भH ऐसा दिसें ॥1॥

ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आश लागलोंसें ॥ध्रु.॥ कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आह्मां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुस†याचा ॥2॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥3॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अYााना समजावीं ॥4॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका ह्मणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥5॥

640

बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुह्मां समर्पण ॥1॥

दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ध्रु.॥ बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥2॥ तुह्मासि पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥3॥ रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश । अतां कैचा आह्मां दोष । तूं जगदीश कैवारी ॥4॥ आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका ह्मणे ॥5॥

641

आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव जाला चित्ताठायीं ॥1॥

भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥ आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥2॥ वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥3॥ करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥4॥ बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका ह्मणे डोळां लेइलों तें ॥5॥

642

तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीनाथ ॥1॥

भुिHमुिH जयाच्या कामारी । रििद्धसििद्ध वोळगती द्वारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥2॥ जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥3॥ सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पिक्षश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥4॥ मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका ह्मणे स्वामी माझा । पावे भिHकाजा लवलाहीं ॥5॥

643

हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें ह्मणावें । करितों जीवें निंबलोण ॥1॥

बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ध्रु.॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥2॥ मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती । ह्मणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥3॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥4॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका ह्मणे मज संत हांसती ॥5॥

644

बरवें जालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥1॥

न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संताची अंदणी दासी। केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥ जीवनीं राखिला जिव्हाळा । जालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥2॥ जयाचें जया होइऩल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥3॥ आस निरसली ये खेपे। अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥4॥ अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका ह्मणे आपें आप एकाएकीं ॥5॥

645

अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभHी। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुिद्ध जाणोनियां ॥1॥

बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां कळांचें हे वर्म। निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥ जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥2॥ येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें। आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥3॥ न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥4॥ वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य । मुHा आत्मा परिपूर्ण । तुका ह्मणे सगुण भोऑया आह्मां ॥5॥

646

श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनादऩना । आनंदघना अविनाशा ॥1॥

सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥ चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥2॥ कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या िक्षती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥3॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना। वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥4॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी। भवबंधनीं सोडवावें ॥5॥

647

आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तो चि हृदयांत घालूं आतां ॥1॥

विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥2॥ बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥3॥ होय आवडी सानें थोर । रूप सुंदर मनोहर । भिHिप्रय लोभापर । करी आदर याचकपणें ॥4॥ तें वर्म आलें आमुच्या हाता । ह्मणोनि शरण निघालों संतां । तुका ह्मणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥5॥

648

माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भिH तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥1॥

धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥2॥ नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंिद्रयांसी ॥3॥ तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे ह्मणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥4॥ ह्मणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । जालों नििंश्चत तुका ह्मणे ॥5॥

649

तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥1॥

आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देइप जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥ माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥2॥ माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढएा आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥3॥ आळवीन करुणावचनीं। आणीक गोड न लगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥4॥ आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका ह्मणे साहे केलें अंतरीं ॥5॥

650

हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥1॥

सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥ भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होइऩल जाण सत्य भाव ॥2॥ नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥3॥ पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होइऩल परी । होइऩल गुसिळलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥4॥ न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका ह्मणे दशा भोगीं वैराग्य ॥5॥

651

मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥1॥

लक्ष चौ†याशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥2॥ पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥3॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि ह्मणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥4॥ क्षण एक मन िस्थर करूनी । साव होइप डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥5॥

652

दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥1॥

ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भHांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भHांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥2॥ सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥3॥ राखे दारवंटा बळीचा। रथी जाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥4॥ भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका ह्मणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥5॥

653

हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भHीची ॥1॥

धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृित्तकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लगे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥ वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गि†हे राबवीती ॥2॥ बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥3॥ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रििद्धसििद्ध देशटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥4॥ जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका ह्मणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥5॥

654

बहुत जाचलों संसारीं । वसें गभाअ मातेच्या उदरीं । लक्ष चौ†याशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥1॥

जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥ न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरीं तडफडी ॥2॥ काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥3॥ ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥4॥ आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥5॥

655

जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥1॥

जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥2॥ जोडोनि धन न घलीं माती । ब्रह्मवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥3॥ दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥5॥ मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं। पुढें संचित जाइऩल ग्वाही । तुका ह्मणे ते ही यमआYाा ॥5॥

656

ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत । आह्मां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥1॥

उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वांयां थोरपण जनांमध्यें ॥ध्रु.॥ अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥2॥ शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना । पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥3॥ आतां पुढें बोलणें तें काइप । मज तारिसी तरी च सही । वचन आपुलें सिद्धी नेइप । तुका ह्मणे तइप मज कळसी ॥4॥

657

चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥1॥

शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान। खंडी नारायण दुःख चिंतनें ॥ध्रु.॥ सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत । ह्मणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥2॥ ह्मणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमित्त ॥3॥ येणें मज भोगविल्या खाणी। नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझे भ्रमणीं । जाली बोडणी विटंबना ॥4॥ पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड। आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥5॥

658

चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥1॥

उदार तरी लIमीयेसी । जुंझार तरी किळकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥ जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अवळाभुलवणा ॥2॥ गांढएा तरी भावाचा अंकित । बराडी तरी उिच्छष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥3॥ खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा। लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥4॥ उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका ह्मणे बोलिलों साच। नाहीं अहाच पूजा केली ॥5॥

659

काय आह्मी भिH करणें कैसी । काय एक वाहावें तुह्मांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥1॥

कसें करूं इंिद्रयां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥2॥ काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं । कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥3॥ काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा । काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥4॥ तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका ह्मणे ॥5॥

660

शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥1॥

शरीर उत्तम चांगलें। शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥ध्रु.॥ शरीर विटाळाचें अळें । मायामोहपाशजाळें। पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥2॥ शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥3॥ शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥4॥ शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । नव्हे वोखटें ना चांग । तुका ह्मणे वेग करीं हरिभजनीं ॥5॥

661

इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥1॥

न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥2॥ जनमित्र होइप सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥3॥ करिसी देवाविण आस । अवघी होइऩल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥4॥ धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका ह्मणे ॥5॥

662

संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥1॥

किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवताअ भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥ वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥2॥ अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥3॥ ऐसीं उलंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥4॥ सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका ह्मणे भ्रष्ट जालों देवद्रोही ॥5॥

663

विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥1॥

विठ्ठल स्मरणा कोंवळा। विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥ उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥2॥ रुचीचे प्रकार। आणिताती आदरें । कोठें ही न पडे अंतर । थोरां थोर धाकुटएा धाकुटा ॥3॥ करितां बळ धरितां नये । झोंबतां डोळे मनें च होय। आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥4॥ पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका ह्मणे चित्तें चित्त मेळवूनी ॥5॥

664

ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥1॥

न पुरे डोिळयांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥ रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥2॥ गुणगंभीर चतुर सुजाण। शूर धीर उदार नारायण। व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥3॥ ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥4॥ जयाची वाणी सुमनमाळा। परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥5॥ कान्होबा0नाट अभंग 7 665

अगा ये वैकुंटनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनादऩना जगव्यापका । अगा पाळका भHांचिया ॥1॥

अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बिळबंध वामना। अगा निधाना गुणनिधी ॥ध्रु.॥ अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा । अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥2॥ अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वणूप ॥3॥ अगा अंबॠषिपरंपरा। निलारंभ निविऩकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ॥4॥ अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥5॥ अगा चतुरा सुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमदऩना । राखें शरणा तुकयाबंधु ॥6॥

666

उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥1॥

शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥2॥ श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुिद्रका माळ । दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥3॥ कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥4॥ सुंदरपणाची साम्यता । काय वणूप ते पावे आतां । तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥5॥

667

एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥1॥

नको दुजी बुिद्ध आणीक । रििद्धसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥ मना येइऩल तो जन्म देइप । भलते कुळीं भलते ठायीं । तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनीं तूं न वजें ॥2॥ इतुलें करीं भलत्या परी । भलत्या भावें तुझें द्वारीं । राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥3॥ नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी पंढरीनाथा । तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥4॥

668

कइप देखतां होइऩन डोळीं । सकळां भूतीं मूतिऩ सांवळी। जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥1॥

ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होइऩन । प्रेमसागरीं बुडइऩन । होइऩल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥ ऐसा कइप येइऩन दैवास । दृश्य नासोनि जाइऩल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥2॥ कइप नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होइऩल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥3॥ प्रसन्न दया क्षमा शांति । कइप नवविधा होइऩल भिH । भोगीन वैराग्यसंपित्त । मनोरथ कळती तइप पुरले ॥4॥ तुकयाबंधु ह्मणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग । ह्मणोनि घातलें साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥5॥

669

तूं बिळया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी ह्मणउनी । आतां करीन मी असेल तें ॥1॥

तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर । महावीरां वीर धनुर्धर । मी तों पामर काय तेथें ॥ध्रु.॥ कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजीं स्थापिला ॥2॥ उपकर्म करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥3॥ किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु ह्मणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥4॥

670

देवा मी चांडाळ चांडाळ । ह्मणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥1॥

जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥2॥ भिH दया अथवा कथा। कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥3॥ काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचें तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥4॥ निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भिक्षलें ॥5॥ पािळलें नाहीं पितृवचन। सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसें अनोविन । दासीगमन आदिकरूनी ॥6॥ कायामनें वाचाइंिद्रयांशीं । सकळ पापांची च राशी । तुकयाबंधु ह्मणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥7॥

671

काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥1॥

भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥2॥ न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळें चि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥3॥ चेतवूनि इंिद्रयें सकळ। आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुिद्ध केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥4॥ आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु ह्मणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥5॥ नाटाचे अभंग समाप्त 63


672

काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥1॥

कोपला पाटील गांवचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥ आतां येणें चवी सांडिली ह्मणती । निवाडा करिती दिवाणांत ॥2॥ भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥3॥ तुका ह्मणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥4॥

673

संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥1॥

संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥ संतासी देखोनि करितो ढवाऑया । भावें धुतो चोऑया दासीचिया ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥3॥

674

एक प्रेमगुज ऐकें जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसें ॥1॥

एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदें चरत होती वनी ॥ध्रु.॥ अवचिता तेथें पारधी पावला । घेऊनियां आला श्वानें दोन्ही ॥2॥ एकीकडे त्याणें चिरिल्या वाघुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे ॥3॥ एकीकडे तेणें वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥4॥ चहूंकडोनियां मृगें वेढियेलीं । स्मरों तें लागलीं नाम तुझें ॥5॥ रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पावें आतां ॥6॥ कोण रक्षी आतां ऐसिये संकटीं । बापा जगजेठी तुजविण ॥7॥ आइकोनि तुह्मी तयांचीं वचनें । कृपाअंतःकरणें कळविळलां ॥8॥ आYाा तये काळीं केली पर्जन्यासी । वेगीं पावकासी विझवावें ॥9॥ ससें एक तेथें उठवुनी पळविलें । तया पाठीं गेली श्वानें दोन्ही ॥10॥ मृगें चमकोनी सत्वर चाललीं । गोविंदें रिक्षलीं ह्मणोनियां ॥11॥ ऐसा तूं कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भHांसी जीवलग ॥12॥ ऐसी तुझी कीर्ती जीवीं आवडती । रखुमाइऩच्या पती तुका ह्मणे ॥13॥

675

आशाबद्ध वHा । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥1॥

वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ध्रु.॥ बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥2॥ माप तैसी गोणी । तुका ह्मणे रितीं दोन्ही ॥3॥

676

विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥1॥

विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥2॥ विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥3॥ विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥4॥ विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥5॥

677

बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटािळलों ॥1॥

एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥ जालीं दोनी नामें एका चि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥2॥ तुका ह्मणे दाखविल्या मुHाफळीं । शिंपले चि स्वस्थळीं खुंटलिया ॥3॥

678

बरवा बरवा बरवा रे देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥1॥

पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥ अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वणिऩतां लक्षण रे देवा ॥2॥ मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु ह्मणे महिमा नेणें रे ॥3॥

679

सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें हें अंगणीं वैष्णवांच्या ॥1॥

वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥ भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥2॥ नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥3॥ तुका ह्मणे मोक्ष भHाचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥4॥

680

तीथॉ केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥1॥

जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥ योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥2॥ तुका ह्मणे विठ्ठलपायीं। अनंत तीथॉ घडिलीं पाहीं ॥3॥

681

कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥1॥

नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥ नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या ह्मैसी गाइऩ व्हाव्या ॥2॥ हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक वरी साच भाव ॥3॥ तुका ह्मणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥4॥

682

रामा अयोध्येच्या राया । दिनानाथा रे सखया ॥1॥

पाप ताप विघ्न हरीं । दिनानाथा सुख करीं ॥ध्रु.॥ भिलटीचिया रे उिच्छष्टा । स्वीकारिसी रे तूं भ्रष्टा ॥2॥ मी तों सलगीचें मूल । तुका ह्मणे तू सखोल ॥3॥

683

तुजवरी ज्याचें मन । दरुषण दे त्याचें ॥1॥

कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥ अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥2॥ तुका ह्मणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥3॥

684

विश्वव्यापी माया । तिणें झाकुिळलें छाया ॥1॥

सत्य गेलें भोऑयावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥ आपुलें चि मन । करवी आपणां बंधन ॥2॥ तुका ह्मणे देवा । तुह्मी कोडीं हीं उगवा ॥3॥

685

पोटीं जन्मती रोग । तरि कां ह्मणावे आप्तवर्ग ॥1॥

रानीं वसती औषधी । तरि कां ह्मणाव्या निपराधी ॥2॥ तैसें शरीराचें नातें । तुका ह्मणे सर्व आप्तें ॥3॥

686

नव्हे शब्द एक देशी । सांडी गवशी कोणाला ॥1॥

जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥ मोकलिलें जावें बाणें। भाता जेणे वाइलें ॥2॥ आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥3॥

687

गायनाचे रंगीं । शिH अद्भुत हे अंगीं ॥1॥

हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥ अंगीं प्रेमाचें भरतें । नाहीं उतार चढतें ॥2॥ तुका ह्मणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥3॥

688

माप ह्मणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥1॥

देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥ देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥2॥ हातीं सूत्रदोरी । तुका ह्मणे त्याची थोरी ॥3॥

689

कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥1॥

नेलें वा†या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥ कोणाची हे सत्ता। जाली वाचा वदविता ॥2॥ तुका ह्मणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥3॥

690

सकिळकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥

अहो श्रोते वHे सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥ फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥2॥ तुका ह्मणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥3॥

691

कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥1॥

अणुरेणु सूIमस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥ फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥2॥ दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृिष्ट कृष्णलोक ॥3॥ तुका ह्मणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥4॥

692

जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥1॥

भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥ आह्मी दुजें नेणों कोणा। हें चि मना मन साक्ष ॥2॥ तुका ह्मणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥3॥

693

स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥1॥

परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥ रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रह्मांडें हीं ॥2॥ तुका ह्मणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥3॥

694

तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥1॥

सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥ अव्यHा अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सचिद नारायणा ॥2॥ रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥3॥ तुका ह्मणे जरी दाविसी आपणा । तरि च नारायणा कळों येसी ॥4॥

695

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥1॥

बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाइऩ नो ॥ध्रु.॥ हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥2॥ तुका ह्मणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥3॥

696

आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥1॥

पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥ पडिलें वळण इंिद्रयां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥2॥ तुका ह्मणे नेत्रीं केलें ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥3॥

697

मी तों सर्वभावें अनधिकारी । होइल कैसी परी नेणों देवा ॥1॥

पुराणींचे अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥ इंिद्रयांचीं आह्मी पांगिलों अंकितें । त्यांचे रंगीं चित्त रंगलेंसे ॥2॥ एकाचें ही मज न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥3॥ तुका ह्मणे मज तारीं पंढरीराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥4॥

698

लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आह्मांस दृष्टीपुढें ॥1॥

कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥ व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निविऩकार ॥2॥ रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुला मानसीं शिव ध्याय ॥3॥ अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥4॥ अचेत चेतलें भHाचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका ह्मणे ॥5॥

699

कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥1॥

कैसी भिH करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥ कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥2॥ कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी िस्थती मती दावीं मज ॥3॥ तुका ह्मणे जैसें दास केलें देवा। तैसें हें अनुभवा आणीं मज ॥4॥

700

निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥1॥

या रे गौिळयांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥ पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥2॥ तुका ह्मणे भार । माथा टाका अहंकार ॥3॥

701

मन वोळी मना । बुिद्ध बुद्धी क्षण क्षणां ॥1॥

मी च मज राखण जालों । ज्याणें तेथें चि धरिलों ॥ध्रु.॥ जें जें जेथें उठी। तें तें तया हातें कुंटी ॥2॥ भांजिली खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥3॥

702

ब्रह्म न लिंपे त्या मेळें । कर्माअकर्मा वेगळें ॥1॥

तो चि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥ शोच अशौचाचे संधी । तन आळा तना चि मधीं ॥2॥ पापपुण्यां नाहीं ठाव । तुका ह्मणे सहज भाव ॥3॥ 703

काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥1॥

तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥ रिगतां धांवा पेंवामध्यें । जोडे सििद्ध ते ठायीं ॥2॥ काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥3॥ वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥4॥ तुका ह्मणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥5॥

704

तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥1॥

तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें नव्हे ॥ध्रु.॥ त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥2॥ तें ही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥3॥ तुका ह्मणे एक चि आहे । सहजिं पाहें सहज ॥4॥

705

बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥1॥

नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वटे खरें ॥ध्रु.॥ विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तो चि एक सोसी ॥2॥ तुका ह्मणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥3॥

706

होइऩन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥1॥

हा चि माझा नेम धर्म । अवघें विठोबाचें नाम ॥ध्रु.॥ हे चि माझी उपासना । लागन संतांच्या चरणा ॥2॥ तुका ह्मणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥3॥

707

सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥1॥

त्यांची सरली वेरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥ हरी आला हाता । मग कैंची भय चिंता । तुका ह्मणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥3॥

708

मोक्ष तुमचा देवा । तुह्मी दुर्लभ तो ठेवा ॥1॥

मज भHीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥ आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥2॥ तुका ह्मणे भेटी । पुरे एक चि शेवटीं ॥3॥

709

नामपाठ मुHाफळांच्या ओवणी । हें सुख सगुणीं अभिनव ॥1॥

तरी आह्मी जालों उदास निर्गुणा । भHांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥ द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव । काय ठाया ठाव पुसोनियां ॥2॥ तुका ह्मणे आतां अभयदान करा । ह्मणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥3॥

710

भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥1॥

तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥ मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥2॥ तुका ह्मणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥3॥

711

नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥1॥

असें तुमचा रजरेण । संतां पायींची वाहाण ॥ध्रु.॥ नाहीं स्वरूपीं ओळखी । भिHभाव करीं देखीं ॥2॥ नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥3॥ नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काइऩ ॥4॥ कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥5॥

712

सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥1॥

जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीतिऩ जेणें ॥ध्रु.॥ भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥2॥ तुका ह्मणे भोळा । जिंकुं जाणे किळकाळा ॥3॥

713

सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥1॥

आह्मी तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥ आला भोग अंगा। न लवूं उसीर त्या त्यागा ॥2॥ तुका ह्मणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥3॥

714

करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥1॥

बरवा अंगीं राहे भाव । तो गे तो चि जाणा देव ॥ध्रु.॥ दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥2॥ तुका ह्मणे मन । तेथें सकळ