गाथा ३९०१ ते ४२००

Wikibooks कडून

3901

काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥1॥
सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥
रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥2॥
तुका ह्मणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥3॥

3902

कीर्त्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥1॥
भH जाय सदा हरि कीतिऩ गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥
त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥2॥
नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये । मागाअ चालताहे संगें हरि ॥3॥
तुका ह्मणे त्याला गोडी कीर्त्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥4॥

3903

बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥1॥
आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥
नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥2॥
तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥3॥

3904

हरिचिया भHा नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥1॥
न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥
असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥2॥
तुका ह्मणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥3॥

3905

दसरा दिवाळी तो चि आह्मां सन । सखे संतजन भेटतील ॥1॥
आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥
धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥2॥
तुका ह्मणे काय होऊं उतराइऩ । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥3॥

3906

खिस्तीचा उदीम ब्राह्मण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥1॥
वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥
मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥2॥
आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥3॥
तुका ह्मणे देह जालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥4॥

3907

जगीं ब्रह्मक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥1॥
आंतेजा खिचडी घेताती मागून । गािळप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥
उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥2॥
तुका ह्मणे ऐसी कलयुगाची चाली । स्वाथॉ बुडविलीं आचरणें ॥3॥

3908

हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥1॥
हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥
डोिळयांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥2॥
बहु चित्त ओढे तयाचिये सोइऩ । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥3॥
बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥4॥
तुका ह्मणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥5॥

3909

जेणें माझें हित होइल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥1॥
मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥
तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥2॥
तुका ह्मणे मी तों राहिलों नििंश्चत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥3॥

3910

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥1॥
त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥
बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥2॥
शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥3॥
तुका ह्मणे तरि वत्तूऩिन निराळा । उमटती कळा ब्रह्मींचिया ॥4॥

3911

पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥1॥
भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥2॥
तुका ह्मणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥3॥

3912

सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥1॥
अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥2॥
तुका ह्मणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥3॥

3913

चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥1॥
देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥
मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता ह्मणों नये ॥2॥
वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥3॥
तुका ह्मणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥4॥

3914

मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में॥1॥
काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥
नाना छंद अंगीं बैसती विकार । छिळयेले फार तपोनिधि ॥2॥
तुका ह्मणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥3॥

3915

जेजे कांहीं मज होइऩल वासना । तेते नारायणा व्हावें तुह्मीं ॥1॥
काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥ध्रु.॥
तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥2॥
अवघें पिशुन जालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥3॥
तुका ह्मणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥4॥

3916

कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दYाानें देवा नाश केला ॥1॥
आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥
संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं ह्मणती एक ॥2॥
बुडविली भिH म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥3॥
न करावी कथा ह्मणती एकादशी। भजनाची नासी मांडियेली ॥4॥
न जावें देउळा ह्मणती देवघरीं । बुडविलें या परी तुका ह्मणे ॥5॥

3917

नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥1॥
संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥
न करिसी तरि हेंचि कोडें मज । भिH गोड काज आणीक नाहीं ॥2॥
करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥3॥
महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥4॥
तुका ह्मणे नाहीं मुिHसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥5॥

3918

होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥1॥
निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥2॥
तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनादऩन भेटे केवीं ॥3॥

3919

लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥1॥
सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥2॥
तुका ह्मणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥3॥

3920

कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥1॥
घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥2॥
पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥3॥

3921

कौडीकौडीसाटीं फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥1॥
पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥2॥
तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥3॥

3922

दाढी डोइऩ मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥1॥
उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥2॥
चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका ह्मणे त्यास यम दंडी ॥3॥

3923

होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥1॥
शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥2॥
तुका ह्मणे त्यासी नाहीं शिवभिH । व्यापार करिती संसाराचा ॥3॥

3924

लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥1॥
नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥2॥
तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥3॥

3925

ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाटीं घेती प्रतिग्रह ॥1॥
परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥2॥
जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका ह्मणे ॥3॥

3926

िस्त्रया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥1॥
यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥2॥
ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका ह्मणे ॥3॥

3927

न लगती मज शब्दब्रह्मYाान । तुझिया दर्शनावांचूनियां॥1॥
ह्मणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥
काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥2॥
तुका ह्मणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥3॥

3928

तुझा ह्मणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥1॥
अYाान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥
तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥2॥
तुका ह्मणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥3॥

3929

जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥1॥
सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाइऩच्या वरा पावें वेगीं ॥2॥
तुका ह्मणे तूं गा पतितपावन । घेइप माझा सीण जन्मांतर ॥3॥

3930

आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाइऩचा पति पावे चि ना ॥1॥
कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥2॥
तुका ह्मणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥3॥

3931

पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाइऩ जननी भेटे केव्हां ॥1॥
न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अिग्नचिया ॥2॥
तुका ह्मणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥3॥

3932

तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥1॥
अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥2॥
तुका ह्मणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥3॥

3933

आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥1॥
देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥2॥
निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें ह्मणोनि व्यर्थ गेला ॥3॥
तुका ह्मणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥4॥

3934

माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥1॥
तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥
पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥2॥
तुका ह्मणे अमृतसििद्ध । हरे क्षुधा आणि व्याधि ॥3॥

3935

तुझें अंगभूत । आह्मी जाणतों समस्त ॥1॥
येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥
ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥2॥
तुका ह्मणे भेदा । करुनि करितों संवादा॥3॥

3936

तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥1॥
ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥
बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥2॥
दंड लाहें केला । तुका ह्मणे जी विठ्ठला ॥3॥

3937

माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥1॥
धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥
करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥2॥
तुका ह्मणे माते । पांडुरंगे कृपावंते॥3॥

3938

जरि न भरे पोट । तरि सेवूं दरकूट ॥1॥
परि न घलूं तुज भार । हा चि आमुचा निर्धार ॥ध्रु.॥
तुझें नाम अमोलिक। नेणती हे ब्रह्मादिक ॥2॥
ऐसें नाम तुझें खरें । तुका ह्मणे भासे पुरें॥3॥

3939

सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥1॥
नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥
द्यावें तें चिं घ्यावें । ह्मणउनि घ्यावें जीवें ॥2॥
तुका ह्मणे उरी । मागें उगवितां बरी ॥3॥

3940

गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें॥1॥
त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ध्रु.॥
श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥2॥
तुका ह्मणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥3॥

3941

सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें॥1॥
स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥
सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं Yाानपणाची मस्ती ॥2॥
तुका ह्मणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥3॥

3942

आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान॥1॥
दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥2॥
तुका ह्मणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥3॥

3943

अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुिद्ध ॥1॥
काय ह्मणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥
जो स्मरे रामराम । तयासी ह्मणावें रिकामें ॥2॥
जो तीर्थव्रत करी । तयासी ह्मणावें भिकारी ॥3॥
तुका ह्मणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं॥4॥

3944

या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥1॥
गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥
सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥2॥
प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥3॥
पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी॥4॥
तुका ह्मणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥4॥

3945

उपजलों मनीं । हे तों स्वामीची करणी ॥1॥
होइल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥
येइल अभय जरि । तरि हे आYाा वंदिन शिरीं ॥2॥
भिHप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना॥3॥
यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥4॥
तुका ह्मणे आळीकरा । त्यासी योजावें उत्तरा ॥5॥

3946

माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून॥1॥
कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥
मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥2॥
तुका ह्मणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥3॥

3947

भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा॥1॥
सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥
काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥2॥
तुका ह्मणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥3॥

3948

जातीचा ब्राह्मण । न करितां संध्यास्नान ॥1॥
तो एक नांनवाचा ब्राह्मण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥
सांडुनियां शािळग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥2॥
नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥3॥
तुका ह्मणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥4॥

3949

जालों जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥1॥
करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥
जोंजों धरिली भीड । तोंतों बहु केली चीड ॥2॥
तुका ह्मणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥3॥

3950

आह्मां हें चि काम । वाचे गाऊं तुझें नाम ॥1॥
आयुष्य मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥
अमृताची खाणी । याचे ठायीं वेचूं वाणी ॥2॥
तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जिवाच्या जिवलगा ॥3॥

3951

मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥1॥
तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥
कैसें तुज लाजवावें । भH ह्मणोनियां भावें ॥2॥
नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥3॥
अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥4॥
तुका ह्मणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं॥5॥

3952

जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥1॥
आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥
कासया सांडूं मांडूं। भाव हृदयीं च कोंडूं ॥2॥
तुका ह्मणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा॥3॥

3953

जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥1॥
तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥
गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरडएावरि लोळे ॥2॥
प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥3॥
तुका ह्मणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥4॥

3954

तरलों ह्मणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥1॥
वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥
ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥2॥
तुका ह्मणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥3॥

3955

कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥1॥
तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥
वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥2॥
ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥3॥
मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥4॥

3956

सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥1॥
धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥
विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥2॥
तुका ह्मणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ॥3॥

3957

भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे॥1॥
अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥
नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥2॥
रििद्ध सििद्ध ज्या कामारी। तुका ह्मणे ज्याचे घरीं ॥3॥

3958

ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥1॥
येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥
गोडी िप्रयापाशीं । सुख उपजे येरासी ॥2॥
तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल॥3॥

3959

बाळ माते निष्ठ‍ होये । परि तें स्नेह करीत आहे॥1॥
तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आह्मां ॥ध्रु.॥
नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥2॥
भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥3॥
त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे॥4॥
नांवें घाली उडी । तुका ह्मणे प्राण काढी ॥5॥

3960

हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥1॥
बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥
मुरगािळला कान । समांडिलें समाधान ॥2॥
धन्य ह्मणे आतां । येथें नुधवा माथां॥3॥
अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥4॥

3961

किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥1॥
एका घाइप न करीं तुटी । न निघें दवासोइऩ भेटी ॥ध्रु.॥
सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥2॥
सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ॥3॥

3962

कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥1॥
बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥
परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥2॥
तुका ह्मणे विसावलों । येथें आलों धणीवरि ॥3॥

3963

साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥1॥
मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥
दासा नव्हे कर्म दान। तन मन निश्चळ ॥2॥
तुका ह्मणे आत्मनिष्ट । भागे चेष्ट मनाची॥3॥

3964

घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥1॥
आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥
सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥2॥
तुका ह्मणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥3॥

3965

आह्मां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥1॥
तुह्मांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥
दासांचें तें देखों नये । उणें काय होइल तें ॥2॥
तुका ह्मणे विश्वंभरा । दृिष्ट करा सामोरी ॥3॥

3966

अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तों वीट मानी॥1॥
नावडेसा जाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥
नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥2॥
तुका ह्मणे अभHासी । माता दासी जग झोडी ॥3॥

3967

आह्मी हरिचे हरिचे । सुर किळकाळा यमाचे ॥1॥
नामघोष बाण साचे । भाले तुळसी मंजुरेचे ॥ध्रु.॥
आह्मी हरिचे हरिचे दास । कलिकाळावरि घालूं कास ॥2॥
आह्मी हरिचे हरिचे दूत । पुढें पळती यमदूत ॥3॥
तुका ह्मणे आह्मांवरी । सुदर्शन घरटी करी ॥4॥

3968

देवाचिये पायीं वेचों सर्व शHी । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥1॥
न घेइप माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥
मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥2॥
तुका ह्मणे घेइप विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥3॥

3969

पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥1॥
नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥
विष्णुदासां गति नाहीं तरावया । ह्मणती गेले वांयां कष्टत ही ॥2॥
धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते कािळचा ॥3॥
तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥4॥

3970

वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥1॥
चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥
लुटालुटा पंढरपूर। धरा रखुमाइऩचा वर ॥2॥
तुका ह्मणे चला । घाव निशानी घातला॥3॥

3971

पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥1॥
प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥
सुदामा ब्राह्मण दरिद्रें पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥2॥
तुका ह्मणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥3॥

3972

निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥1॥
तैसा आह्मासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥
मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥2॥
दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥3॥
पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥4॥

3973

श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥1॥
भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥2॥
तुका ह्मणे आह्मां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥3॥

3974

सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥1॥
सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥
आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काइऩ ॥2॥
तुका ह्मणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥3॥

3975

जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥1॥
वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय कवणा ॥ध्रु.॥
हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥2॥
तुका ह्मणे तुझ्या चरणांची पाखर । असतां किळकाळ पायां तळीं ॥3॥

3976

क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥1॥
तृण नाहीं तेथें पडे दावािग्न । जाय तो विझोनि आपसया ॥2॥
तुका ह्मणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥3॥

3977

याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥1॥
ब्रह्महत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥2॥
तुका ह्मणे नव्हे चोरीचा व्यापार । ह्मणा रघुवीर वेळोवेळां ॥3॥

3978

पानें जो खाइऩल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥1॥
तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥
कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥2॥
जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥3॥
जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका ह्मणे ॥4॥

3979

कामांमध्यें काम । कांहीं ह्मणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होइऩल दुःखाचें ॥1॥
कळों येइऩल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥
जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥2॥
केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका ह्मणे कर्म । जाळोनियां तरसी ॥3॥

3980

तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥1॥
दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥
देव भH ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥2॥
तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥3॥

3981

कोठें गुंतलासी योगीयांचे ध्यानीं । आनंदकीर्तनीं पंढरीच्या ॥1॥
काय काज कोठें पडलीसे गुंती । कानीं न पडती बोल माझे ॥ध्रु.॥
काय शेषनशयनीं सुखनिद्रा आली । सोय कां सांडिली तुह्मी देवा ॥2॥
तुका ह्मणे कोठें गुंतलेती सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥3॥

3982

माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥1॥
अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥
मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥2॥
ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥3॥
माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥4॥
तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥5॥
तुका ह्मणे नारायणा। तुह्मां बहुत करुणा ॥6॥

3983

कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥1॥
तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाटीं व्याली ॥ध्रु.॥
वत्साचिये आसे। धेनु धांवेना गोरसें ॥2॥
तुका ह्मणे धरि । बाळ टाकिलें वानरीं ॥3॥

3984

भHांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥1॥
जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥2॥
तुका ह्मणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥3॥

3985

तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥1॥
सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥
उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥2॥
तुका ह्मणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥3॥

3986

अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सवाौत्तमु ॥1॥
जैसा तैसा लागे करणें अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥
अवघें चि मज गििळयेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥2॥
तुका ह्मणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥3॥

3987

मूतिऩमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप॥1॥
जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥2॥
तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥3॥

3988

धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥1॥
लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या॥ध्रु.॥
नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥2॥
भाविक हो येथें धरा रे आवांका । ह्मणे दास तुका शुद्धयाति ॥3॥

3989

अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहें समागमें अंगसंगें ॥1॥
अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥2॥
फळपाकीं देव देतील प्राणीयें । तुका ह्मणे नये सवें कांहीं ॥3॥

3990

संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥1॥
अवघीं च इंिद्रयें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥
शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥2॥
तुका ह्मणे सार हरिनामउच्चार । ये†हवी येरझार हरीविण ॥3॥

3991

सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे॥1॥
आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आह्मांसी सहज द्यावें आतां ॥2॥
तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥3॥

3992

भHांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥1॥
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा॥ध्रु.॥
सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें॥2॥
सर्वस्वें त्याचा ह्मणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥3॥
तुका ह्मणे भिHसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं॥4॥

3993

राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥1॥
लIमीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥2॥
तुझे नामीं प्रेम देइऩ अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं॥3॥
तुका ह्मणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥4॥

3994

हरी तुझें नाम गाइऩन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥1॥
अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देइप हें चि ॥2॥
तुका ह्मणे आतां देइप संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना॥3॥

3995

गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥1॥
संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥
साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपायामाजी गुंती ॥2॥
निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥3॥
तुका ह्मणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥4॥

3996

भाव धरिला चरणीं ह्मणवितों दास । अहिनिऩशीं ध्यास करीतसें ॥1॥
करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥2॥
धरिले निश्चळ न सोडीं ते पाय । तुका ह्मणे सोय करीं माझी ॥3॥

3997

तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥1॥
येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥2॥
माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥3॥
अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥4॥
तुका ह्मणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥5॥

3998

आतां तुज मज नाहीं दुजेपण । दाखवीं चरण पांडुरंगा ॥1॥
तुज रूप रेखा नाम गुण नाहीं । एक स्थान पाहीं गांव सिंव ॥ध्रु.॥
नावडे संगाति तुजा दुजयाची । आपुल्या भHांची प्रीति तुह्मां ॥2॥
परि आह्मांसाटीं होसील सगुण । स्तंभासी फोडून जयापरि ॥3॥
तुका ह्मणें तैसें तुज काय उणें । देइप दरुषण चरणांचें ॥4॥

3999

करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां॥1॥
जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥
शरणागतां देव राखे। येरां वाखे विघ्नाचे ॥2॥
तुका ह्मणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥3॥

4000

आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी॥1॥
सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥
अनाथाचा नाथ देव। अनुभव सत्य हा ॥2॥
तुका ह्मणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ॥3॥

4001

मुखें सांगे ब्रह्मYाान । जन लोकाची कापितो मान॥1॥
Yाान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥
कथा करितो देवाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥2॥
तुका ह्मणे तो चि वेडा। त्याचें हाणूनि थोबाड फोडा ॥3॥

4002

कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥1॥
सेटएा ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥ध्रु.॥
पाप न लगे धुंडावें॥ पाहिजे तरि तेथें जावें ॥2॥
जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥3॥
गाइऩ ह्मसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥4॥
तुका ह्मणे पाहीं । तेथें पुण्या रीघ नाहीं ॥5॥

4003

तुझी माझी आहे जुनी सोयरीक । आधीं बंधु लेंक मग जाले ॥1॥
वांटेकरी ह्मणून पुसती आतां । परि आहे सत्ता करीन ते ॥ध्रु.॥
लेंकीचें लेंकरूं नातु जाल्यावरी । मंगळा ही दुरि अंतरलों ॥2॥
बाइलेचा भाऊ पिसुना सोयरा । ह्मणउनि करा विनोद हा ॥3॥
आकुळीं तों करूं नये तें चि केलें । न बोलावें भलें तों चि आतां ॥4॥
न ह्मणसी लेंकी माउसी बहिणी । आह्मां केलें धणी पापाचें त्या ॥5॥
बहु पांचांजणी केली विटंबना । नये दाऊं जना तोंड ऐसें ॥6॥
तुका ह्मणे आधीं मूळ तें चि धरूं । मागील तें करूं उरी आतां ॥7॥

4004

मागें बहुत जाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥1॥
हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥
भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥2॥
तुका ह्मणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥3॥

4005

आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥1॥
सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥
करावीं व्यसनें। दुरी येउनि नारायणें ॥2॥
जवळील दुरी । जालों देवा धरीं करीं॥3॥
ह्मणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥4॥
तुका ह्मणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥5॥

4006

झंवविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥1॥
करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥
बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥2॥
तुका ह्मणे ठावें । ऐसें जालें अनुभवें॥3॥

4007

पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंता वरी बोल ॥1॥
भेइऩना करितां पापाचे डोंगर । दुर्जन पामर दुराचारी॥ध्रु.॥
नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥2॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥3॥

4008

आधीं देह पाहता वाव । कैचा प्रारब्धासी ठाव॥1॥
कां रे रडतोसी माना । लागें विठ्ठलचरणा ॥ध्रु.॥
दुजेपण जालें वाव। त्रिभुवनासि नाहीं ठाव ॥2॥
तुका ह्मणे खरे पाहें । विठ्ठल पाहोनियां राहें ॥3॥

4009

िस्त्रया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥1॥
ह्मणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥ध्रु.॥
सर्वदुःखासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥2॥
आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥3॥
देह लोभें नाडला । घाला यमाचा पडला॥4॥
तुका ह्मणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥5॥

4010

जेंजें होआवें संकल्पें । तें चि पुण्य होय पाप ॥1॥
कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥
सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥2॥
तुका ह्मणे सार । नांव जीवनाचे सागर ॥3॥

4011

ओले मातीचा भरवसा । कां रे धरिशी मानसा ॥1॥
डोळे चिरीव चांगले । वृद्धपणीं सरवया जाले ॥ध्रु.॥
नाक सरळ चांगलें । येउन हनवटी लागलें ॥2॥
तुका ह्मणे आलें नाहीं । तंव हरिला भज रे कांहीं ॥3॥

4012

तुह्मां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ॥1॥
आह्मां ह्मणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥
िस्त्रया पूजुनि सरे देती । भलते िस्त्रयेसि भलते जाती ॥2॥
श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस। अंगीकारी मद्यमांस ॥3॥
चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंHी ॥4॥
ह्मणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥5॥
ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥6॥
तुका सद्गुरुदास्य करी । सििद्ध पाणी वाहे घरीं ॥7॥

4013

त्या हरिदासांची भेटी घेतां । नकाऩ उभयतासी जातां॥1॥
माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥
देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥2॥
तुका ह्मणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥3॥

4014

देव गावा ध्यावा ऐसें जालें । परदेशी नाहीं उगलें ।
वडील आणि धाकुलें । नाहीं ऐसें जालें दुसरें तें ॥1॥
नाहीं लागत मुळीहूनि । सुहृदजन आणि जननी ।
लागल्या लागें त्यागें सांडूनि। लोभीये मांडणी संयोगाची ॥ध्रु.॥
शिव बाटला जीवदशे । बहुत ओतत आलें ठसें ।
हीन जालें भूषणाचें इच्छे । निवडती कैसे गुणागुण ॥2॥
आतां हे हुतांश तों बरें । अवघे एक च मोहरें ।
पिटिलियाविण नव्हे खरें । निवडें बरें जातिशुद्ध ॥3॥
तुका उतावेळ याजसाटीं । आहे तें निवेदीन पोटीं ।
आवडी द्यावी जी येथें लाटी । तुझी जगजेठी कीर्ती वाखाणीन ॥4॥

4015

भोगी जाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंिद्रयांचा लाग । आह्मांवरूनि चुकला ॥1॥
करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥
तळीं पिक्षणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं घाली बाळका ॥2॥
तुका ह्मणे ये आवडी । आह्मीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥3॥

4016

कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥1॥
दिवस गमा भरा पोट । कां गे नेटनेटावा ॥ध्रु.॥
दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥2॥
तुका ह्मणे झोंडगीं हो । काुंफ्दा कां हो कोरडी ॥3॥

4017

तुझें प्रेम माझ्या हृदयीं आवडी । चरण न सोडीं पांडुरंगा ॥1॥
कासया सिनासि थोरिवां कारणें । काय तुझें उणें होइल देवा ॥ध्रु.॥
चातकाची चिंता हरली जळधरें । काय त्याचें सरे थोरपण ॥2॥
चंद्र चकोरांचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥3॥
तुका ह्मणे मज अनाथा सांभाळीं । हृदयकमळीं िस्थर राहें ॥4॥

4018

आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥1॥
ठेवा जोडला मिरासी । ठाव जाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥
बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥2॥
तुका ह्मणे जालों बळी । आह्मी निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी आमचें ॥3॥

4019

न लगावी दिठी । माझी तुझे मुखवटी ॥1॥
आधीं पाउलें पाउलें । ते मी पाहेन तें भलें ॥ध्रु.॥
देइऩन हे काया । वरि सांडणें सांडाया ॥2॥
तुका ह्मणे देवा । बहु आवडसी जीवा ॥3॥

4020

कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥1॥
गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥
आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥2॥
तुका ह्मणे इंिद्रयांसी । ये चि रसीं रंगवूं ॥3॥

4021

नाम तारक भवसिंधु । विठ्ठल तारक भवसिंधु ॥1॥
नामधारक तया अरि मित्रु । समता त्यागुनियां क्रोधु ॥ध्रु.॥
नामधारक तया । कदापि न घडे विषयाचा बाधु ॥2॥
ज्या नामें तरले शुकादिक । नारद संत मुनिजन साधु ॥3॥
जाणूनियां जे नसरें । ते नेणति जैसा गज अंधु ॥4॥
सहज तुकया । नाम चि जपतां स्वरुपीं वेधु ॥5॥

4022

आह्मां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥1॥
तरी च हरिचेदास ह्मणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥
गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भुिH मुिH दोन्ही न मगों तुज ॥2॥
तुका ह्मणे देवा ऐसी यांची सेवा। द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥3॥

4023

पावलों हा देह कागतालिन्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥1॥
आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां॥ध्रु.॥
अंधऑयाचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥2॥
तुका ह्मणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥3॥

4024

कळे परि न सुटे गांठी । जालें पोटीं कुपथ्य ॥1॥
अहंकाराचें आंदणें जीव । राहे कींव केली ते ॥ध्रु.॥
हेंकडाची एकी च वोढी । ते ही खोडी सांगती ॥2॥
तुका ह्मणे सांगों किती । कांहीं चित्तीं न राहे ॥3॥

4025

सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥1॥
ऐसे तंव तुह्मी नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेत ॥ध्रु.॥
फांटा जाला त्यासी नाहीं वोढा वारा । वेरसा चि खरा हाटो गुण ॥2॥
तुका ह्मणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां अंगीं ॥3॥

4026

आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥1॥
आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहीं । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ध्रु.॥
लाचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥2॥
तुका ह्मणे आह्मी केली जे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥3॥

4027

तिळ एक अर्ध राइऩ । सीतबुंद पावे काइऩ । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥1॥
ह्मणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । सावचित्त तों ॥ध्रु.॥
तीथॉ न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे कासी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥3॥
येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका ह्मणे तो येथें ॥3॥

4028. विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥1॥

विठ्ठलविठ्ठल भावें ह्मणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥
बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥2॥
तुका ह्मणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥3॥

4029

भोळे भिHभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ॥1॥
भाव नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया मी खेदा काय सांगों ॥ध्रु.॥
गणिकेसारिकीं नामें उद्धरीलीं । सYाानें पडिलीं खटाटोपीं ॥2॥
तुका ह्मणे काय शुद्ध माझी जाति । थोर केली ख्याती हरिनामें ॥3॥

4030

आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥1॥
दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥
एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥2॥
तुका ह्मणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड॥3॥

4031

पंढरीचें बा भूत मोटें । आल्या गेल्या झडपी वाटे॥1॥
तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥2॥
तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥3॥

4032

बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥1॥
सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥
उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥2॥
सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥3॥
तुका जाला वाणी । चुकवुनि चौ†यासीच्या खाणी ॥4॥

4033

काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना ।
प्राथिऩतां ही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥1॥
आतां धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी ।
न दिसे कोणी आवरी। आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥
न राहे एके ठायीं एकी घडी। चित्त तडतडा तोडी ।
घालूं पाहे बा हे उडी या भवडोहीं ॥2॥
आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं ।
तुका ह्मणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी॥3॥

4034

पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा॥1॥
सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥
ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥2॥
पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥3॥
चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण॥4॥
तुका ह्मणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥5॥

4035

पापांचीं संचितें देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥1॥
पेरी कडू जिरें मागे अमृतफळ । आकाऩ वृक्षफळें कैसीं येती ॥ध्रु.॥
सुख अथवा दुःख भोग हो देहेचा । नास हा Yाानाचा न करावा ॥2॥
तुका ह्मणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥3॥

4036

लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥1॥
ऐसी भHाची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥
माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥2॥
तुका ह्मणे नाड । नाहीं शरणागता आड ॥3॥

4037

आपुलेंसें करुनी घ्यावें । आश्वासावें नाभींसें ॥1॥
ह्णउनि धरिले पाय । आवो माय विठ्ठले ॥ध्रु.॥
कळलासे सीन चिंता । शम आतां करावा ॥2॥
तुका ह्मणे जीवीं वसें । मज नसें वेगळे ॥3॥

4038

तुजविणं कांहीं । िस्थर राहे ऐसें नाहीं ॥1॥
कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥
मोकलिली आस। सर्वभावें जालों दास ॥2॥
तुका ह्मणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥3॥

4039

खोंकरी आधन होय पाकसििद्ध । हें तों घडों कधीं शके चि ना ॥1॥
खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥2॥
पालथे घागरी रिचवितां जळ । तुका ह्मणे खळ तैसे कथे ॥3॥

4040

नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥1॥
अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण॥ध्रु.॥
आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥2॥
एकासी आड पडोनि होंकरी । एकासी देखोनि लपवी भाकरी ॥3॥
एकासी धड न बोले वाचा । एकासी ह्मणे मी तुझे बांदीचा ॥4॥
तुका ह्मणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु॥5॥

4041

पिंडपोशकाच्या जळो Yाानगोष्टी । झणी दृिष्टभेटी न हो त्याची ॥1॥
नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ॥ध्रु.॥
पोहों सिणलें नये कासे लावितो आणिका । ह्मणावें त्या मूर्खा काय आतां ॥2॥
सिणलें तें गेलें सिणलियापासीं । जाली त्या दोघांसी एक गति ॥3॥
तुका ह्मणे अहो देवा दिनानाथा। दरुषण आतां नको त्याचें ॥4॥

4042

संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥1॥
पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥
कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाविती विरHी ॥2॥
आशापाशीं बांधोनि चित्त । ह्मणती जालों आह्मी मुH ॥3॥
त्यांचे लागले संगती । जाली त्यांसी ते चि गति ॥4॥
तुका ह्मणे शब्दYाानें । जग नाडियेलें तेणें॥5॥

4043

दोष करूनि आह्मी पतित सिद्ध जालों । पावन मागों आलों ब्रीद तुझें ॥1॥
आतां पतिता तारावें कीं ब्रीद हें सोडावें । यांत जें पुरवे तें चि सांगा ॥ध्रु.॥
उद्धार तुमच्यानें नव्हे हो श्रीहरि। सोडा झडकरी ब्रीद आतां ॥2॥
तें ब्रीद घेउनी हिंडों दारोदारीं । सांगूं तुझी कीर्ती रे पांडुरंगा ॥3॥
देवें हारविलें ब्रीद हें सोडिलें । पतितें जिंकिलें आह्मीं देवा ॥4॥
तुका ह्मणे आह्मीं उठलों दैन्यवरि। विचारा श्रीहरी तुह्मी आतां ॥5॥

4044

राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥1॥
काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥
चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देइऩन हा बळी जीव पायीं ॥2॥
तुका ह्मणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥3॥

4045

देव धरी नाना सोंगें । नाम श्रेष्ठ पांडुरंग ॥1॥
तो हा गविळयाचे घरीं । नाम सारितो मुरारि ॥ध्रु.॥
धन्य यशोदेचें प्रारब्ध । नाचे अंगणीं गोविंद ॥2॥
ऐशा भHांसाटीं देवें । नाना धरियेलीं नांवें ॥3॥
होय दासांचा जो दास । तुका ह्मणे विठ्ठलास॥4॥

4046

आइत्या भाग्या धणी व्हावे । केनें घ्यावें न सरे तें॥1॥
केणें आहे पंढरपुरीं । उधाराचें लाभीक ॥ध्रु.॥
बाखराची करुनी रीती । भरा पोतीं लवलाहीं ॥2॥
तुका ह्मणे संतांपाडें । करूं पुढें वाखती ॥3॥

4047

जन्मोजन्मीं दास । व्हावें हे चि माझी आस ॥1॥
पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥
संतसमागम । अंगीं थिरावलें प्रेम ॥2॥
स्नान चंद्रभागे । तुका ह्मणे हें चि मागें ॥3॥

4048

कां गा कोणी न ह्मणे पंढरीची आइऩ । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥1॥
तेव्हां माझ्या मना होइल समाधान । जाइल सर्व शीण जन्मांतरिंचा ॥2॥
तुका ह्मणे माझी होशील माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥3॥

4049

वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला॥1॥
विठोबासी शरण जावें । निजनिष्ट नाम गावें ॥ध्रु.॥
सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥2॥
अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हा चि हेत ॥3॥

4050

मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥1॥
न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली ॥ध्रु.॥
न पवे धांवणें न पवे चि लाग । न चलती माग धरावया ॥2॥
भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥3॥
तुका ह्मणे नेदी हाका मारूं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥4॥

4051

धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥1॥
कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं ॥ध्रु.॥
आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥2॥
तुका ह्मणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥3॥

4052

गरुडावरि बैसोनि येतो जगजेठी । त्याचे चरणीं मिठी घालूं चला ॥1॥
सांवळें रूपडें देखिलें लोचनीं । शंख चक्र दोन्ही शोभताहे ॥ध्रु.॥
पीतांबर झळके हे चि त्याची खूण । वाकी रुणझुण करिताती ॥2॥
गरुडाचा चपेटा असे नेटें । कस्तुरीमळवट शोभताहे ॥3॥
पदक एकावळी शोभताहे कंठीं । तुका ह्मणे मिठी घालूं चला ॥4॥

4053

नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥1॥
नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं ॥ध्रु.॥
तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ ह्मणा त्यासी ॥2॥
तुका ह्मणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांडे पु†या ॥3॥

4054

जाली हरिकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥1॥
वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेइप रे तूं आतां धणीवरि ॥ध्रु.॥
प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें होतीं रंगलीं विटलीं तीं ॥2॥
तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । ह्मणउनि पुढती आणियेलें ॥3॥

4055

संकिल्पला तुज सकळ ही भाव । कोण एक ठाव उरला तेथें ॥1॥
इंिद्रयव्यापार जेंजें कांहीं कर्म । करितों ते धर्म सकळ तुझे ॥ध्रु.॥
माझें हित फार लागला विचार । तुज सर्व भार चालवणें ॥2॥
जो कांहीं लौकिक करिसी तो तुझा । अपमान पूजा कांहींतरि ॥3॥
तुका ह्मणे मी तों राहिलों नििंश्चत । तुज कळे हित तैसें करीं ॥4॥

4056

भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥1॥
जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥
उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥2॥
तुका ह्मणे चित्त । होय आवडी मििश्रत॥3॥

4057

ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया॥1॥
तेथें बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥
चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृिष्ट ॥2॥
तुका ह्मणे सांगों काय । एकाएकीं हरिवृित्तमय ॥3॥

4058

कोणा ही केंडावें हा आह्मां अधर्म । जोजो पावे श्रम तोतो देव ॥1॥
ह्मणउनि चित्ता सिकविलें वोजें । आतां हें चि दुजें न बोलावें ॥ध्रु.॥
हालविलें जरि परउपकारें । जिव्हे पाप खरें उपाधीचें॥2॥
तुका ह्मणे जीव प्रारब्धा आधीन । कोण वाहे सीण करुणा शोभे ॥3॥

4059

देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥1॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥
पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥2॥
तुका ह्मणे वाणी । शुद्ध जनादऩनीं जनीं ॥3॥

4060

काय उणें मज पांडुरंगा पायीं । रििद्धसििद्ध ठायीं वोळगती ॥1॥
कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आह्मी ॥ध्रु.॥
स्वर्गसुखें आह्मीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥2॥
तुका ह्मणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥3॥

4061

माझें मागणें तें किती । दाता लIमीचा पति ॥1॥
तान्हेल्यानें पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी ॥ध्रु.॥
कल्पतरु जाला देता । तेथें पोटाचा मागता ॥2॥
तुका ह्मणे संतां ध्यातां । परब्रह्म आलें हाता ॥3॥

4062

अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥1॥
तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥
बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥2॥
तुका ह्मणे नाव । जनासाटीं उदकीं ठाव ॥3॥

4063

जन्मोजन्मींची संगत । भेटी जाली अकस्मात ॥1॥
आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतीचा तुटेना ॥ध्रु.॥
माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥2॥
तुका ह्मणे अंतीं । तुझी माझी एक गति ॥3॥

4064

सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥1॥
न कळे हा निर्धार ब्रह्मादिकां पार । कायसा विचार माझा तेथें ॥2॥
तुका ह्मणे आतां धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥3॥

4065

काय फार जरी जालों मी शाहाणा । तरी नारायणा नातुडसी ॥1॥
काय जालें जरी मानी मज मन । परि नातुडति चरण तुझे देवा ॥ध्रु.॥
काय जालें जरी जालों उदासीन । परि वर्म भिन्न तुझें देवा ॥2॥
काय जालें जरी केले म्यां सायास । ह्मणवितों दास भH तुझा ॥3॥
तुका ह्मणे तुज दाविल्यावांचून । तुझें वर्म कोण जाणे देवा ॥4॥

4066

जातां पंढरीच्या मागॉ । काय वणूप सुखा मग ॥1॥
घडे लाभ लक्षकोटि । परब्रह्मीं होइल भेटी ॥ध्रु.॥
नाम गर्जत येती संत । त्यांच्या दर्शनें होइऩजे मुH ॥2॥
जो अलIय ब्रह्मादिकां । आला संनिध ह्मणे तुका ॥3॥

4067

सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥1॥
तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥
जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि नेम अहिनिऩशीं ॥2॥
तुका ह्मणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥3॥

4068

मोल घेऊनियां कथा जरी करीं । तरी भंगो हरी देह माझा ॥1॥
माझी कथा करा ऐसें ह्मणें कोणा । तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥ध्रु.॥
साहए तूं जालासी काय उणें तुपें । आणीक भूतांपें काय मागों ॥2॥
तुका ह्मणे सर्व सििद्ध तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥3॥

4069

जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि Yाान ब्रह्म होय ॥1॥
कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥
जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य चक्षु ॥2॥
तुका ह्मणे देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥3॥

4070

पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरिसील सत्ता सकळ ही ॥1॥
कां जी आह्मांवरी आणिकांची सत्ता । तुह्मासी असतां जविळक ॥2॥
तुका ह्मणे पायीं केलें निवेदन । उचित हें दान करीं आतां ॥3॥

4071

रात्री दिवस आह्मां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाहए जग आणि मन ॥1॥
जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥2॥
तुका ह्मणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥3॥

4072

होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥1॥
आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । अविट तें सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥
होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥2॥
सांडोवा पायरी । वाहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥3॥
लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका ह्मणे देइप । धाक नाहीं जन्माचा ॥4॥

4073

माझिया जीवाचा मज निरधार । न करीं उत्तर जनासवें ॥1॥
आपुलें कारण साधों जी विचार । करावा हा धीर धरूनियां ॥ध्रु.॥
काय कराविया आणिका या युिH । काय नव्हे भिH विठोबाची ॥2॥
एक पुढें गेले वाट दावूनियां । मारग तो वांयां कोण सांडी ॥3॥
तुका ह्मणे माझी विठोबासी चिंता । भेइऩना सर्वथा न घडे तें ॥4॥

4074

कासया व्हावें जीतांचि मुH । सांडुनियां थीतें प्रेमसुख ॥1॥
वैष्णवांचा दास जाला नारायण । काय त्या मिळोन असे काम ॥ध्रु.॥
काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि बैसोन धीरु धरीं ॥2॥
सुख आह्मांसाटीं केलें हें निर्माण । निद।व तो कोण हाणे लाता ॥3॥
तुका ह्मणे मज न लगे सायोज्यता । राहेन या संतां समागमें ॥4॥

4075

आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग॥1॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती॥2॥
तुका ह्मणे जीवा थोर जालें सुख । नाठवे हे भूक तान कांहीं ॥3॥

4076

लाडें भाकितों करुणा । तूं रे उदाराचा राणा ॥1॥
करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ ॥ध्रु.॥
नाहीं चिंता रे आह्मांसी । तूं चि भार चालविसी ॥2॥
आह्मी जालों उदासीन । तूं चि करिसी जतन ॥3॥
आह्मां नाहीं जीवनास । तूं चि पुरविसी घास ॥4॥
तुका ह्मणे भलते सवें । जातां मागें मागें धांवे ॥5॥

4077

आह्मां हें सकळ । तुझ्या पायांचें चि बळ ॥1॥
करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥
जयाचा जो भोग। सुख दुःख पीडा रोग ॥2॥
तुका ह्मणे देवा । तुझे पायीं माझा ठेवा ॥3॥

4078

प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥1॥
दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥2॥
तुका ह्मणे तया दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥3॥

4079

संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥1॥
येणें होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश कांहीं ॥ध्रु.॥
घेइऩल तयासी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥2॥
सांगितली सोय करुणासागरें । तुह्मां कांहो बरें न वाटतें ॥3॥
तुका ह्मणे तेणें उपकार केला । भोऑया भाविकाला तरावया ॥4॥

4080

आह्मां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥1॥
आह्मांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥
काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥2॥
नाहीं शीण आह्मां जालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥3॥
तुका ह्मणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुह्मी ॥4॥

4081

तांबगी हें नाणें न चले ख†या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥1॥
करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥
हिरयासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥2॥
देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥3॥
तुका ह्मणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥4॥

4082

चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥1॥
ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥
हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥2॥
तुका ह्मणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥3॥

4083

आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुट ॥1॥
नाहीं कोणासवें बोलणें लागत । नििंश्चतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥
लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥2॥
तुका ह्मणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥3॥

4084

आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥1॥
ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥
क्लेशाची चित्तीं राहाते कांचणी । अग्नींत टाकोनी ठाव जाळी ॥2॥
तुका ह्मणे येणें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥3॥

4085

अYाानाची भिH इिच्छती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥1॥
अYाानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥
अYाानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥2॥
अYाानाचें Yाान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥3॥
तुका ह्मणे जळो ऐसियांचे तोंड । अYाानाचें बंड वाढविती ॥4॥

4086

गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥1॥
अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥
ऐसिया डांभिकां कैची हरिसेवा । नेणे चि सद्भावा कोणे काळीं ॥2॥
तुका ह्मणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥3॥

4087

आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥1॥
फुकाचा चाकर जालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥ध्रु.॥
दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग ॥2॥
तुका ह्मणे ऐसें आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥3॥

4088

अनंत लक्षणें वाणितां अपार । संताचें तें घर सांपडेना ॥1॥
जये घरीं संत राहती आपण । तें तुह्मां ठिकाण आतुडेना ॥ध्रु.॥
ठिकाण धरूनी पाहवे ते संत । उगा च अकांत करूं नये ॥2॥
संत होऊनियां संतांसी पाहावें । तरि च तरावें तुका ह्मणे ॥3॥

4089

संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥1॥
हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥
जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥2॥
ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥3॥
तुका ह्मणे आह्मीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥4॥

4090

पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥1॥
मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥
शांति क्षमा अंगीं विरिH सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥2॥
तुका ह्मणे नाहीं वर्णा अभिमान । अवघे जीवनमुH लोक ॥3॥

4091

देखीचें तें Yाान करावें तें काइऩ । अनुभव नाहीं आपणासी ॥1॥
इंिद्रयांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥
युHीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥2॥
नाव रेवािळतां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥3॥
तुका ह्मणे बुिद्ध आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥4॥

4092

नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥
न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥
असावें म्यां सदा विषयीं विरH । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥2॥
करोनियां साहए पुरवीं मनोरथ । व्हावें कृपावंत तुका ह्मणे ॥3॥

4093

आपुल्या पोटासाटीं । करी लोकांचिया गोष्टी ॥1॥
जेणें घातलें संसारीं । विसरला तो चि हरी ॥ध्रु.॥
पोटा घातलें अन्न । न ह्मणे पतितपावन ॥2॥
मी कोठील आणि कोण । हें न कळे ज्यालागून ॥3॥
तुका ह्मणे नरस्तुति । करितो भाट त्रिजगतीं॥4॥

4094

स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥1॥
सेकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥ध्रु.॥
सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं Yाानपणाची मस्ती ॥2॥
तुका ह्मणे गाढव लेखा। जेथें भेटेल तेथें ठोका ॥3॥

4095

जगीं कीतिऩ व्हावी । ह्मणोनी जालासी गोसावी॥1॥
बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥
चित्तीं नाहीं अनुताप। लटिकें भगवें स्वरूप ॥2॥
तुका ह्मणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥3॥

4096

प्राHनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥1॥
उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राह्मणीं वंदूं नये ॥ध्रु.॥
कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र ह्मणोन घेऊं नये ॥2॥
यातिहीन जाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥3॥
भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥4॥

4097

बोलिलों उत्कषॉ । प्रेमरस दाशत्वें ॥1॥
साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥
समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥2॥
तुका ह्मणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥3॥

4098

विचा केला ठोबा । ह्मणोनि नांव तो विठोबा ॥1॥
कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥
शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग जाला ॥2॥
तुका ह्मणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥3॥

4099

भ्रतारअंगसंगें सुखाची वेवस्था । आधीं तों सांगतां नये कोणा ॥1॥
तथापि सांगणें कुमारिकेपाशीं । ते काय मानसीं सुख मानी ॥ध्रु.॥
तैसा आत्मबोध आधीं बोलों नये । बोलासी तो काय सांपडेल ॥2॥
तथापि सांगणें बहिर्मुखापाशीं । तो काय संतोषासी मूळ होय ॥3॥
तुका ह्मणे संत सुखाचे विभागी । ब्रह्मानंद जगीं साधुरूपें ॥4॥

4100

कलयुगामाजी थोर जालें बंड । नष्ट लोक लंड जाले फार ॥1॥
न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले ॥ध्रु.॥
सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वारा । ऐसिया पामरा तारी कोण ॥2॥
विश्वास तयाचा बैसेना कोठें ही । स्तुति निंदा पाहीं जीवीं धरी ॥3॥
तुका ह्मणे कैसें केलें नारायणें । जाणावें हें कोणें तयाविण ॥4॥

4101

आपुली बुटबुट घ्यावी । माझी परताप द्यावी ॥1॥
आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बइऩल चुकल